रसिक ग्रुपच्या पुरस्कारांची घोषणा! गुढीपाडव्याला होणार वितरण

0
49

सौरभ बोरा, महेश सूर्यवंशी, प्रा.मिलिंद जोशी, आ.संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, दिनेश आहेर व गणेश भुतारे मानकरी

नगर – सामाजिक व सांस्कृतिकसह विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्याद्वारे महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीमत्वांना तसेच  अहिल्यानगरच्या जडणघडणीत, विकासात मोलाची भर घालत नावलौकिक वाढवण्यासाठी भरीव योगदान देणार्‍या व्यक्तींना रसिक ग्रुपच्या वतीने दरवर्षी ‘रसिक गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येते. गेल्या २२ वर्षांपासून अखंडितपणे या पुरस्कारांचे समारंभपूर्वक वितरण केले जाते. यावर्षी तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानचे खजिनदार महेश सूर्यवंशी, व्याख्याते व मसापचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, आमदार संग्राम
जगताप, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व गणेश भुतारे
यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याचे वितरण ३० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त होणार्‍या
‘रसिकोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमात होणार आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.
यावर्षीचा स्व.शांतीकुमार फिरोदिया स्मृती रसिक गौरव हा राज्यस्तरीय पुरस्कार नगरचे पुत्र व जगातील सर्वात
मोठ्या व श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरचे सलग तीनवेळा विश्वस्तपद भूषवणारे सौरभ बोरा यांनी
धार्मिक व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. तसेच पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
देवस्थानचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांना धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल स्व.प्रदीप गांधी स्मृती
गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष व व्याख्याते प्रा.मिलिंद जोशी
यांचा साहित्य चळवळ वृध्दिंगत करत या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरव पुरस्काराने सन्मानित करणात येत
आहे. याबरोबरच आमदार संग्राम जगताप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात सुरु  केलेल्या कामांमुळे शहराच्या विकासात
मोलाची भर घातल्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तसेच अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त
यशवंत डांगे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी  दिलेल्या योगदानाबद्दल व शहराच्या
सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी रखडलेल्या नाट्य संकुलच्या कामास गती दिल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव
पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.  या सोहळ्यात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस
निरीक्षक दिनेश आहेर यांनी कर्तव्य बजावत अनेक गुन्ह्यांचा शोध लावत गुन्हेगारांवर वचक ठेवत जिल्ह्यात कायदा
व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार
आहे. तसेच उत्कृष्ट कल्पना शक्तीने मंडप सजावट करणारे गणेश भुतारे यांनाही यावेळी गौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात येणार आहे. या सोहळ्यात सावेडीच्या जॉगिंग पार्क मधील झाडांची निगा राखत सौंदर्य वाढवून पर्यावरण
क्षेत्रात निरपेक्षपणे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते जीवन खरात यांचा सुप्रभात ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात येणार
आहे, अशी माहिती दिपाली देऊतकर, सुदर्शन कुलकर्णी यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभाचे नियोजन
ग्रुपचे तेजा पाठक, निखिल डफळ, समीर पाठक, प्रशांत अंतापेलू, श्रीकृष्ण बारटक्के, स्नेहल उपाध्ये, प्रसन्न एखे, बाळकृष्ण गोटीपामुल, तुषार बुगे, मीनाक्षी पाटील, शारदा होशिंग, ऋषिकेश येलुलकर, ओंकार अंतापेलु करीत आहेत.