‘हार्टफुलनेस अहिल्यानगर’ आयोजित ‘एकात्मक अभियानास’ प्रतिसाद

0
43

नगर – दैनंदिन जीवनात येणार्‍या ताणय्तणावापासून मुक्त होऊन स्वतःच्या हृदयाशी संवाद साधून एक आगळावेगळा एकात्मक होण्याचा अनुभव उपस्थित नगरकरांनी घेतला. हार्टफुलनेस अहिल्यानगर केंद्र आणि भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय यांच्यावतीने एकात्मक अभियानांतर्गत धर्माधिकारी मळा परिसरातील आयुर्वेद व्यासपीठाच्या धन्वंतरी उद्यान सभागृहात आयोजित या ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी
अध्यक्षा माजी नगरसेविका पुष्पा बोरुडे, माजी नगरसेविका सौ. वंदना ताठे, माजी नगरसेवक रवींद्र बारस्कर, आंतरराष्ट्रीय
ख्यातीचे गायक पवन नाईक, हार्टफुलनेस संस्थेचे प्रशिक्षक डॉ. दत्तात्रेय गिरगे, सुनील बल्लाळ, वैद्य मंदार भणगे, डॉ.सौ. अर्चना गिरगे, विष्णू पालीवाल, संयोजक महेश लेले याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे पुष्पा बोरुडे यांनी
बोलताना आपल्या धावपळीच्या युगात मनशांती हरवत चालली असताना आज आयोजित हे ध्यान शिबिर स्वतःचा आत्मिक
शोधाकडे घेऊन जाणारे असल्याचे सांगितल. रवींद्र बारस्कर यांनी मनोगतात शारीरिक सुदृढतेबरोबरच मानसिक शांतीकडे
प्रयत्नपूर्वक लक्ष देणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने हार्टफुलनेसने आयोजित केलेले शिबिर महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. गायक पवन नाईक यांनी बोलताना स्वतःचा आत्मिक शोध घेऊन अंतरात्म्याशी संवाद साधण्याची कला ही ध्यानातून येते. अनेक संतांनी आपल्याला परमेश्वरा जवळ पोहोचण्यासाठी हा मार्ग सांगितला आहे. आजच्या या
शिबिरातून स्वतःचा शोध घेण्याचा चैतन्यमय प्रवास सुरू झाला असल्याचे सांगितले.

वैद्य मंदार भणगे यांनी प्रास्ताविकात भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय व हार्टफुलनेस या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेने महाराष्ट्रातील गावागावात व घराघरात ध्यान पोहोचावे या प्रमुख उद्देशाने एकात्मक अभियानाचे आयोजन
केले आहे. या शिबिरास प्रतिसाद मिळाला असून यापुढेही विनामूल्य असणार्‍या या प्रशिक्षणात सगळ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

डॉ.दत्तात्रेय गिरगे, सुनील वल्लाळ, सौ. अर्चना गिरगे, वैद्य मंदार भणगे, विष्णू पालीवाल, अमोल आंदे, सौ.रिना
खरमाळे, शुभांगी केंगे यांनी उपस्थितांना ध्याना विषयी प्रशिक्षण दिले. हे ध्यान शिबिर सर्वांसाठी मोफत असून आपल्या
परिसरात, कॉलनी, सोसायटी, गावे, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा येथे आयोजन केल्यास प्रशिक्षक तिथे येऊन मोफत  मार्गदर्शन करतील, अशी माहिती प्रशिक्षक दत्तात्रय गिरगे यांनी दिली. अधिक माहितीसाठी ९४०५०५३५४०, ९४२३४६३९८५, ९८२२६९२०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी हार्टफुलनेस केंद्राचे प्रमुख डॉटर ऋषिकेश उदमले, भरत आठरे, महेश लेले, केंद्रातील अभ्यासी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. सौ. सुपर्णा लेले यांनी आभार मानले.