आरोग्य

0
22

भात खाऊनही वजन राहू शकते नियंत्रणात
आपल्या आहारातील अनेक पदार्थांबाबत आपल्या मनात गैरसमज असतात, भात हा
त्यातलाच एक. भातामुळे लठ्ठपणा येतो किंवा भातामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असा
आपल्याकडे समज आहे. मात्र भारतात आजही दक्षिण भागात किंवा कोकणासारख्या भागात
भात हेच मुख्य अन्न आहे. याठिकाणी कायम तांदूळाचे पदार्थ खाल्ले जातात. पूर्वीच्या काळीही
मोठ्या प्रमाणात भात खाल्ला जायचा. पण अशा कायम भात खाण्याने या लोकांना काही त्रास
होत नाही हे दिसून येते.
लठ्ठपणा हे अनेकांचं भात न खाण्याचं प्रमुख कारण आहे. भातातील एक संयुग तुमचं हृदय
निरोगी राहण्यासाठी मदत करतं. म्भाताबरोबर आपण भाजी, आमटी खात असल्याने भातातून
थेट शरीरावर होणारे परिणाम होत नाहीत. अनेकदा आहारतज्ज्ञही भात खा पण तो प्रमाणात खा
असे सांगतात. त्यामुळे भात पूर्ण बंद करणे हा लठ्ठपणा किंवा रक्तातील साखर कमी करण्याचा
उपाय नव्हे असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे भात आरोग्यासाठी चांगला नसतो हे
विधान वादग्रस्त आहे असे म्हणता येईल.