चॉकलेट पुडिंग
साहित्य : चोवीस मारी बिस्किटे, पाच
टी स्पून लोणी, एक कप दूध, तीन टे. स्पून
फळांचा रस, चार टे. स्पून ड्रिंकिंग चॉकलेट,
तीन टे. स्पून पिठीसाखर, दोन टे. स्पून
जिलेटीन, शोभेसाठी थोडे भाजलेले काजूचे
काप व मलई.
कृती : थोड्या कोमट पाण्यात
जिलेटीन विरघळून घ्यावे. नंतर त्यात फळांचा
रस घालून सारखे करावे. लोणी फेसून घ्यावे.
नंतर त्यात साखर, ड्रिंकिंग चॉकलेट घालून
हलके होईपर्यंत पुन्हा फेसावे. जिलेटीनचे
मिश्रण गार झाले की ते एगबिटरने घुसळून
वरील मिश्रणात घालावे.
दुधात एकेक बिस्किट बुडवून एका
प्लेटमध्ये ओळीने मांडावे. प्रत्येक बिस्किटावर
चॉकलेटचे मिश्रण ओतावे (पहिल्या थरात
साधारण आठ बिस्किटे). पुन्हा बिस्किटांचा
एक थर देऊन चॉकलेटचे मिश्रण ओतावे.
उरलेले मिश्रण कडेने गोल ओतावे. शोभेसाठी
वर काजू व साखर घातलेली मलई पसरावी.
नंतर ही बशी फ्रीजमध्ये ठेवून चांगले घट्ट होऊ
द्यावे.