—, शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन कृष्णपक्ष, श्रवण २०|१२
सूर्योदय ०६ वा. २४ मि. सूर्यास्त ०६वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा. हितशत्रुंपासून पिडा संभवते. लांब रहा. आज अध्यात्माकडे कल राहिल.
वृषभ : जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शय आहे. जुने मित्र व नातेवाईक यांच्या
सहवासामुळे दिवस आनंदात व्यतीत होईल.
मिथुन : धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल.
कर्क : वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल.
सिंह : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल.
कन्या : व्यवसायासाठी उत्तम वेळ. नवीन कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
तूळ : आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रांमध्ये अजून काही विशेष कार्ये होणार नाही. वाहने जपून चालवावीत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल.
धनु : एखादी व्यक्ती निष्कारण आपल्याला त्रास देईल मात्र शत्रू प्रभावहीन पडतील. वैवाहिक सुख वाढेल. तब्येत सांभाळा. उधारी वसुल होईल. तुमची वैचारिक आणि मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल
मकर : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी देईल. कुटुंबातील लोकांबरोबर गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडतील व मन दुःखी होईलप्रतिस्पर्ध्यांवर तुम्ही मात कराल.
कुंभ : आपला निष्काळजी दृष्टीकोण आज चांगला ठरणार नाही. व्यापारात नुकसान मोठे होईल. आजचा दिवस मिश्रफल देणारा आहे. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील.
मीन : घर बदलण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. शत्रू प्रभावहीन ठरतील. आजचा दिवस तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर