सल्ला

0
21

* चिंच पाण्यात कुस्करून ते पाणी
गाळून त्यात साखर घालून प्यायल्याने उष्माघातात आराम वाटतो.
* ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या
संशोधकांनी एक हजार लोकांवर प्रयोग करून
असे स्पष्ट केले आहे की, स्मरणशक्ती कमी
करणारा मेजर फॅटर म्हणजे ‘ट्रान्स फॅट्स’
हा प्रकार बिस्किटात आढळून येतो. यामुळे
राग येणं, लठ्ठपणा तसेच हृदयाचे विकार
होऊ शकतात. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त
बिस्कीट खाण्याची सवय आरोग्यासाठी
धोकादायक आहे. ‘डेली मेल’ या वेबसाईटवर
प्रकाशित झालेल्या शोधानुसार बिस्किटांच्या
अतिसेवनामुळे स्मरणशक्ती कमी होत जाते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.