सोयाबीन रस्सा

0
62

सोयाबीन रस्सा

साहित्य : सोयाबीन (बारीक वड्या) २ वाट्या, किसलेले सुके खोबरे १ वाटी,
उभा चिरलेला कांदा १ मोठा, लसूण पाकळ्या १५२०, मिरी दाणे ५६, लवंगा ५६, आले-
मध्यम तुकडा, कोथिंबीर १२ वाटी, लाल तिखट- चवीनुसार, मीठ-चवीनुसार.

कृति : सर्वप्रथम एका सोयाबीनचे दोन तुकडे असे सर्व तुकडे करून घ्यावे.
कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून  किसलेले खोबरे, आले, लसूण, कांदा, लवंगा, मिरे
भाजून घ्यावे. खोबर्‍याचा रंग बदलला की, गॅस बंद करून सर्व जिन्नस वाटून घ्यावे.
कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी साखर घालावी. साखर घातल्याने तेलाचा छान तवंग
येतो. नंतर त्यात लाल तिखट आवडीनुसार घालावे. हा रस्सा जरा झणझणीतच चांगला
लागतो. तेल तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घालून खूप परतावे. खोबरे तेल सुटेपर्यंत
परतावे. नंतर त्यात तुकडे केलेले सोयाबीन घालून थोडे परतावे. उकळलेले पाणी घालून
सोयाबीन शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे. शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. गरम
गरम भाकरीबरोबर वाढावे. सोबत कांदा चिरून द्यावा.