दैनिक पंचांग रविवार, दि. १४ एप्रिल २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, शके
१९४६ क्रोधीनामसंवत्सर, चैत्र शुलपक्ष,
आर्द्रा २५|३५
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आपणास गरज असेल तेव्हा कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग
मोकळा होईल. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल

वृषभ : मित्रांचे सहकार्य मिळेल. कार्यात सहकार्यांचा सहयोग मिळेल. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे
ओढतील. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा.

मिथुन : आपल्या एखाद्या जवळच्या मित्राला संताप येईल, असे कही बोलू नका. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ मिळेल. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.

कर्क : कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील.
इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा.

सिंह : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. अनपेक्षित खर्च होण्याची शयता. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील.

कन्या : प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य वागण्याचा प्रयत्न करा एखादी प्रणयपूर्ण संध्याकाळ आपल्यासाठी आनंदायक असेल. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील.

तूळ : आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. शत्रूंपासून सावध राहा. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका.

वृश्चिक : व्यापार-व्यवसायात देवाणय्घेवाण टाळा. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

धनु : शत्रूंपासून सावध राहा. व्यापारय्व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. मुले त्रास देऊ शकतात. महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल.

मकर : आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक आणि अर्थपूर्ण होण्याची शयता आहे. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.

कुंभ : एखाद्या कल्पक, सर्जनशी कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या येण्याची शयता. नोकरदार मंडळींनो
काळजीपूर्वक काम करा.

मीन : काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

‘मीठा जहर’ म्हणजे काय?

‘मीठा जहर’ म्हणजे काय?

गोड बोलून विश्वासघात करणे, म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. अशीच एक वनस्पती आहे. जिचे मूळ गोड लागते, पण खाल्ल्यास प्राणावर बेतते. या विषाला त्यामुळेच ‘मीठा जहर’ असे म्हणतात. अ‍ॅकोनिटम नॅपेल्स नावाचे हे झाड हिमालयाच्या प्रदेशात आढळून येते. तसे या झाडाचे सर्वच भाग विषारी असतात; परंतु मूळ जास्त विषारी असते. मुळात अ‍ॅकोनिटीन हा अत्यंत विषारी असा घटक असतो. हे एक शोभेचे झाड आहे. पानात वा इतर पदार्थात मिसळून हे विष खायला देतात. यामुळे ओठ, घसा, जीभ बधिर होणे, लाळ सुटणे, पोटात दुखणे, उलट्या होणे, खूप घाम येणे, चक्कर येणे, दृष्टी व वाचा यावर दुष्परिणाम होणे, हातापायातील त्राण जाणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. अखेर हृदयाच्या स्नायूवर परिणाम होऊन किंवा श्वसन थांबून मृत्यू होतो. १ गॅ्रम वजनाइतके मूळ वा २५० मि.ग्रॅ. इतके अ‍ॅकोनाईट खाल्ल्यास सुमारे सहा तासात मृत्यू होतो. वन्य प्राण्यांना मारण्यासाठी बाणाला लावायच्या विषात याचा उपयोग केला जातो. तसेच खून करण्यासाठी गुन्हेगार याचा वापर करतात. स्वस्त व सहजगत्या उपलब्ध असल्याने विषप्रयोगासाठी याचा जास्त वापर केला जातो. पोटात गेलेले विष टॅनिक अ‍ॅसिडचे द्रावण प्यायला देऊन वा पोटॅशियम परमँगनेटचे द्रावण प्यायला देऊन पोटाच्या बाहेर काढतात. हृदय व श्वसनसंस्था यांचे कार्य सुरळीत चालावे, यासाठी उपचार करावे लागतात. कृत्रिम श्वसन यंत्र व प्राणवायूचा पुरवठा यांचाही उपयोग करतात. असे आहे हे ‘मीठा जहर’; चवीला गोड, पण भयंकर.

हे आहेत ऊर्जादायी देणारे पदार्थ

हे आहेत ऊर्जादायी देणारे पदार्थ
* गुळ, मध, बाजरी, मका, राजगिरा, शिंगाडा भरपूर उष्णता देतात. हळीव, डिंक यातून
उर्जा मिळतेच आणि हाडांचं आरोग्य सुधारतं.
* खजूर, सुकं अंजीर, मनुका, खारीक उष्णता आणि खनिजं, व्हिटामिन्स, फायबर्स
देतात. सुरण, रताळी, बटाटे अशी कंदमूळं आवश्य खावीत.

सुविचार

घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुखशांती टिकाऊ नसते. – ग्रेविल

सोयाबीन रस्सा

सोयाबीन रस्सा

साहित्य – सोयाबीन (बारीक वड्या)
२ वाट्या, किसलेले सुके खोबरे १ वाटी,
उभा चिरलेला कांदा १ मोठा, लसूण पाकळ्या
१५२०, मिरी दाणे ५६, लवंगा ५६, आले-
मध्यम तुकडा, कोथिंबीर १२ वाटी, लाल
तिखट- चवीनुसार, मीठ-चवीनुसार.
कृति – सर्वप्रथम एका सोयाबीनचे
दोन तुकडे असे सर्व तुकडे करून घ्यावे.
कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालून किसलेले
खोबरे, आले, लसूण, कांदा, लवंगा, मिरे
भाजून घ्यावे. खोबर्‍याचा रंग बदलला की,
गॅस बंद करून सर्व जिन्नस वाटून घ्यावे.
कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी साखर
घालावी. साखर घातल्याने तेलाचा छान तवंग
येतो. नंतर त्यात लाल तिखट आवडीनुसार
घालावे. हा रस्सा जरा झणझणीतच चांगला
लागतो. तेल तापल्यावर त्यात वाटलेली पेस्ट
घालून खूप परतावे. खोबरे तेल सुटेपर्यंत
परतावे. नंतर त्यात तुकडे केलेले सोयाबीन
घालून थोडे परतावे. उकळलेले पाणी घालून
सोयाबीन शिजू द्यावे. चवीनुसार मीठ घालावे.
शिजल्यावर वरून कोथिंबीर घालावी. गरम
गरम भाकरीबरोबर वाढावे. सोबत कांदा
चिरून द्यावा.

वास्तू

प्रगती होण्यासाठी
* मुख्य दरवाजाच्या चौकटीवर आतील
व बाहेरील बाजूस समोरासमोर येईल अशा
पध्दतीने गणपतीचे चित्र लावणे प्रगतीकारक
ठरते.
* स्टडी रूम – स्टडी रूम पूर्व, उत्तर
वा उत्तर पूर्व या दिशेला असावी. या दिशा मन
एकाग्र करण्यात मदत करतात. स्टडीरूममध्ये
कधीही बीम खाली बसून अभ्यास करू नये.
यामुळे अनावश्यक दडपण येते.

फोड, पुरळ झाल्यास

फोड, पुरळ झाल्यास पिंपळाच्या
पानावर तूप लावून, गरम करून लावा वा
कडुलिंबाच्या पानांचा लेप करून लावा. फोड,
पुरळ बसून जातील.

चेहर्‍यावरील त्वचा

केळाचा गर चेहर्‍यावर लावावा व
वाळल्यानंतर हाताने घासून मसाज करावा.
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा व्यवस्थित
धुवावा. यामुळे चेहर्‍याची त्वचा उजळते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

इंग्रजी माध्यमात पदवीधर झालेल्या सुनेने सासुला विचारलं:
’तडफड’ म्हणजे नेमके काय असतं ?
सासु शांतपणे उठली,
आणि वायफायचा स्विच बंद केला.
म्हणाली…घे अनुभव.

दैनिक पंचांग शनिवार, दि. १३ एप्रिल २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
चैत्र शुलपक्ष, मृग २४|४९
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.

राशिभविष्य

मेष : आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील.

वृषभ : आपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. आनंदाची बातमी मिळेल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल.

मिथुन : अधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. घराच्या विषयांमध्ये वेळ उत्तम. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारय्व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

कर्क : आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आपल्या आर्थिक
मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल.

सिंह : महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. महत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल.

कन्या : आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. मुलांसाठी
आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे.

तूळ : आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. आरोग्याची काळजी घ्या. अधिक व्यग्र राहील. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा.

वृश्चिक : आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. वाहने काळजीपूर्वक चालवा. अनावश्यक चिंता टाळा. मनोरंजनासाठी वेळ काढाल. आजचा दिवस छान जाईल.

धनु : हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. आपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात.

मकर : एखाद्यापासून आपण प्रेरीत व्हाल. आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या.

कुंभ : आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी
वेळ काढाल. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू शकतो. आर्थिक बाबतीत उन्नती होईल. योजनाबद्धरीत्या आपले काम करण्याचा प्रयत्न करा.

मीन : योजनाबद्धरीत्या आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा.
एखाद्यापासून आपण प्रेरीत व्हाल. आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर