जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का?

0
43

जवळच्या नात्यातील व्यक्तीशी लग्न केल्यास काही दुष्परिणाम होतात का?

एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणार्‍या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणार्‍या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धान्तानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात वर्चस्व गाजवणारे (ऊेाळपरपीं) व दबावाला बळी पडणारे (ीशलशीीर्ळींश), असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणार्‍या गुमसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणार्‍या गुणसूत्राची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुण दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणार्‍या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो. एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणार्‍या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर, गुणसूत्रांमधील दबावाला बळी पडणार्‍या गुणसूत्रांचे गुण मुलबाळांत येतात. वेडसरपणा, कोड, रक्ताचे विकार, मधुमेह, मज्जासंस्थेचे विकार असे अनेक रोग, अशा प्रकारे लग्न केलेल्या व्यक्तींच्या मुलांना होऊ शकतात. त्यामुळे काका-पुतणी, मामा-भाची, बहीण-भाऊ अशी लग्ने होऊ देऊ नयेत; हेच खरे.