मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
13

बोका आणि उंदीर

एका बिळात एक उंदीर राहत असतो तो एकदा आजारी पडला. दिवसभर तो बिळातच पडून राहू लागला. बरेच दिवस झाले उंदीर बाहेर आला नाही, हे पाहून बोकोबा त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्याकडे आला आणि बिळाबाहेर बसत खोटा कळवळा दाखवीत मानभावीपणे म्हणाला, “काय उंदरोबा, आजारी पडला की काय? आता कशी आहे तुझी प्रकृती? बाबा, काय औषधपाणी लागलं. सवरलं, तर मला सांग. मी लागतील ती औषधं तुला आणून देईन. शेजार्‍याने शेजार्‍याच्या उपयोगी पडणे, हाच खरा शेजारधर्म. संकटकाळात, आजारपणात एकमेकांना साहाय्य करणं, यासारखा सदगुण शोधून सापडणार नाही. “तेंव्हा उंदरोबा, जरा बाहेर या, म्हणजे तुमची प्रकृती कशी आहे, हे मला समजेल. म्हणजे मी वैदुबुवांना तुमच्या प्रकृतीचे वर्णन करून सांगताच ते तुमच्या आजारावर रामबाण औषध देतील. ते घेताच तुम्ही खडखडीत बरे होऊन उड्या मारू लागाल.” बोकोबाचे हे संभाषण उंदीर आत बसूनच ऐकत होता. तो बाहेर न येता आतूनच म्हणाला, “वा मित्रा, शेजारी असावा तर तुझ्यासारखा! किती कळवळ्याने बोललास! मित्रा, शेजारधर्माला जागून माझी जी विचारपूस केलीस, त्याबद्दल मी आभारी आहे. पण आता इथून एकदाचा निघून गेलास, म्हणजे मी लवकर बरा होईन आणि हो, पुन्हा इकडे येण्याची तसदी घेऊ नकोस.” तात्पर्य ः कारण नसताना एकाएकी जेव्हा आपले शत्रू आपल्याविषयी प्रेम दाखवू लागतात, तेव्हा खुशाल समजावे, यात त्याचा काहीतरी कावा असावा.