पाककला

0
26

डाळ-मुळ्याचे पराठे

साहित्य : हरभरा डाळ २ टेबल स्पून
(भिजवून वाटून), मुळा १ कप (किसून),
हिरवी मिरची १ (बारीक चिरून), मिरची
पूड अर्धा टी स्पून, गव्हाचे पीठ १ कप,
तूप १ टेबल स्पून (मोहनासाठी) तेल पराठे
भाजण्यासाठी, मीठ चवीनुसार.
कृती : किसलेल्या मुळ्यात एक टी
स्पून मीठ मिसळून ५ मिनिटे ठेवा. नॉनस्टिक
पॅन गॅसवर ठेवून त्यात एक टीस्पून तेल गरम
करून चिमूटभर हिंग टाकून वाटलेली हरभरा
डाळ टाकून थोडे परता. मुळ्याचा किस पिळून
घ्या व कढईतील डाळीत टाकून व्यवस्थित
भाजून घ्या. पिठामध्ये मोहन, ओवा व मीठ
टाका. मुळ्याचे पाणी व साधे पाणी मिसळून
कणीक मळून घ्या व पंधरा मिनिटे राहू द्या.
नंतर कणकेच्या छोट्या गोळ्या बनवा. गोळी
लाटून त्यात मुळ्याचे मिश्रण भरून लाटी
बंद करून पुन्हा लाटून कुरकुरीत पराठा
भाजून घ्या. मुलांना लंच बॉसमध्ये हे पराठे
लोणच्यासोबत द्या.