व्यायाम शरीरासाठी उपयुत
व्यायामाने शरीरातील स्नायूंना पुष्टी मिळते त्यांची ताकद वाढते. त्यामुळे सांध्यांच्या
हालचली नीट होतात. त्याचबरोबर जादा वाढणारी चरबी कमी होणे महत्त्वाचे असते.
वजन जास्त असेल तर वयाबरोबर जीर्ण होणार्या सांध्यांना हे वजन पेलवत नाही व
सांधेदुखी, गुढघेदुखी, कंबरदुखी हे विकार सुरू होतात. अर्थात घेतला जाणारा व्यायाम
नियमीत असावा. चक्रासनाने विशेषकरून कंबरदुखी नाहीशी होते. त्याचप्रमाणे दिवसभरात
७-८ ग्लास पाणी पिणे शरीरासाठी गरजेचे आहे.