मधाने मिटवा मुरम
मध अॅण्टीबायोटिक असल्यामुळे मुरमे
नाहीशी करतो. याचा कसलाही साईड इफेट
नसतो. यामुळे त्वचा मुलायम होते. हा फक्त
पाच मिनिटे चेहर्यावर लावून साध्या पाण्याने
चेहरा धुवावा.
एका वधू-वर सूचक मेळाव्यात मुलगा व मुलगी बोलत असतात
मुलगा : भावी लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत?
मुलगी : त्याचा मस्त बंगला असावा त्याच्याकडे फोरव्हिलर असावी तो एकुलता
एक असावा…म्हणजे आई, वडील, भाऊ, बहिण नसावे…
मुलगा : अजुन काही अपेक्षा
मुलगी : मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा…
मुलगा : अगं बाई, जर तो समजूतदार असेल तर तुझ्याशी लग्न कशाला करेल
विहिरीत जीव नाही देणार का?
–, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, अनुराधा १०|१०
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : सामान्य स्थितीत मध्यम स्वरूपाची कार्ये पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात. कार्यात अडचणी येण्याची शयता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
वृषभ : प्रेम व रोमांसच्या प्रकरणांमध्ये यश मिळेल. मित्र आपणास मदत करतील व काही आवश्यक कार्ये पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल.
मिथुन : कामात अडचणी येण्याची शयता आहे. काळजीपूर्वक कार्य करा. मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील.
वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील.
कर्क : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. मातृपक्षाकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारचे जोखिम टाळा.
सिंह : प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील. व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : व्यवहारिक दक्षता वाढवा. सामान्य सहयोग मिळेल. देवाण घेवाणीत त्रास. नियोजित कामात अडचणी येण्याची शयता. कामावर प्रभाव पडेल. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शयता.
तूळ : जास्त सहयोग मिळेल. कार्यकुशलतेचा लाभ मिळेल. पारिवारिक लाभ घ्या. नोकरीत विशेष सावधगिरी बाळगा.
विश्वासात राहू नये. अनिश्चिततेचे वातावरण. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल.
वृश्चिक : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.
धनु : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल.
मकर : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष् टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.
कुंभ : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.
मीन : उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
काचा खाल्ल्यास काय होते?
काचा हा काय खायचा पदार्थ आहे? सर्वसामान्य माणूस तर काचा खाऊ शकत नाही. तसे कोणी केले तर त्याचा विक्रमवीर म्हणून सत्कारच होईल जीवावर बेतेल ते वेगळेच! काचा खाल्ल्या तर (म्हणजे अगदी चावून चावून!) घशात, जठरात व पोटात तीव्र अशा जळजळल्यासारख्या वेदना होतात. मळमळ, उलट्या होतात. उलटीमध्ये रक्त असते. संडासच्या जागी दुखते व संडासवाटे रक्त येते. काचांमुळे जठर वा आतडे फाटल्यास खूप रक्तस्राव होतो व व्यक्ती मरते. कधी कधी अशा जखमांतून जंतूसंसर्ग झाल्याने त्यापासूनही व्यक्ती मरू शकते. काचेत सिलिका असते. क्ष-किरण सिलीकातून आरपार जायला अडचण येते. त्यामुळे जठरात वा आतड्यात काचेचे तुकडे असल्याचे निदान त्यांच्या फिकट अशा छायाकृतींमुळे करता येते. चुकून काच खाल्ली असेल तर भात वा केळी असे पदार्थ देऊन त्यानंतर सौम्य विरेचक द्यावे. लक्षणानुरूप इतरही औषधे द्यावी लागतात. खूप बारीक केलेली काच मात्र कमी त्रासदायक ठरते. त्यामुळेच बहुदा काचा खाऊन दाखविण्याचा प्रयोग करणारे लोक काचा खूप वेळ चावून त्या अगदी पावडरसारख्या करून मग गिळत असावेत!
डोकेदुखी होण्यामागची कारण
उन्हाळ्यात घामावाटे खनिजांचे होणारे
उत्सर्जन, तहान भागविण्यासाठी आईस्क्रीम
किंवा कृत्रिम शीतपेयांचा केलेला अतिरिक्त
वापर, समतोल आहाराचा अभाव, अपुरी
झोप, सतत दडपणाखाली असलेला मेंदू,
मानसिक ताणतणाव, वेळी-अवेळी खाणे,
तेलकट, मैद्याच्या पदार्थाचा आहारात असलेला
समावेश या कुपथ्याने शरीरात विजातीय घटक
साठतात याचा परिणाम म्हणजे डोकेदुखी
होय.
आलू-मटार पॅटीस
साहित्य : उकडून सोललेल्या
बटाट्याचा लगदा २ वाट्या, मटार दाणे १
वाटी, चवीप्रमाणे मीठ, ३ हिरव्या मिरच्या
जाडसर वाटून, थोडी चिरलेली कोथिंबीर, १
टी स्पून आले-लसूण वाटून, ओल्या नारळाचा
खव, बे्रड क्रंब्ज (ब्रेडचा चुरा).
कृती : मटार दाणे वाफवून घ्यावेत.
तेल तापवून त्यात जिरे व हळद घालावी.
आले, लसूण व मिरची पेस्ट घालावी. त्यात
वाफवलेला मटार व चवीप्रमाणे मीठ घालावे.
थोडी धने-जिरे पावडर घालावी. आले,
खोवलेले खोबरे व कोथिंबीर घालावी. कोरडी
उसळ तयार करून गार करावी. बटाट्यांच्या
लगद्यात मीठ घालून चांगले मळावे. त्यात
चिमूटभर हळद घालावी.
या मिश्रणाचा लहान लिंबाएवढा गोळा
घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन
त्यात मटारची उसळ भरावी. मटारची उसळ
थोडी हाताने कुस्करून घ्यावी. बटाट्याची ही
सारण भरलेली वाटी पुन्हा हाताने बंद करून
गोल आकार द्यावा. बे्रड क्रंब्जमध्ये घोळवून
गरम तेलात खमंग तळावी किंवा फ्रायपॅनमध्ये
थोडे तेल घालून पॅटीसला चपटा आकार
देऊन शॅलो फ्राय करावे.