
जुन्या कपड्यांची बटने काढताना
बटनाखाली कंगवा लावावा व कात्रीने धागे
कापावेत यामुळे कापड फाटणार नाही.
लिंबाच्या पावडरचा फेसवॉश
लिंबाच्या पावडरचा फेसवॉश
* लिंबूच्या सालीत व्हिटॅमिन सी
भरपूर प्रमाणात आढळले जाते. त्याच्या साली
सुकवून त्याची पावडर बनवा. एक चिमूटभर
पावडर फेसपॅकमध्ये घालून ती लावल्यास
त्वचा उजळली जाते.
* केळीच्या गरामध्ये मधाचे काही थेंब
टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना
लावल्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवून घ्या.
केस चमकदार होतील.
ब्रेड-बटाटा पकोडा
ब्रेड-बटाटा पकोडा

साहित्य – ४ मोठे उकडलेले बटाटे,
हिरव्या मिरच्या बारीक चिरून १ चमचा,
कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धी वाटी, मीठ,
पाव चमचा हळद, ४ ब्रेडच्या स्लाईस, १
टेबलस्पून डाळीचे पीठ, १ टेबलस्पून तांदळाचे
पीठ, आले पेस्ट अर्धा चमचा, धने-जिरे पूड,
१ टी स्पून, तळण्यासाठी तेल.
कृती – बटाटे उकडून हाताने कुस्करून
घ्यावेत. बे्रडच्या कडा कापून थोडा वेळ
पाण्यात बुडवून बे्रड पुन्हा हाताने दाबून पूर्णपणे
पाणी काढून घ्यावा. पाण्यातून काढलेले ब्रेड
हाताने कुस्करून भाजीत घालावा. त्यात
डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, आले-मिरच्या,
हळद व चवीप्रमाणे मीठ घालावे. चिरलेली
कोथिंबीर व २ टी स्पून लिंबाचा रस घालून
सर्व मिश्रण चांगले कालवून प्लॅस्टिक पेपरवर
गोल चपटे वडे थापावेत, मध्ये छिद्र पाडून हे
सर्व पकोडे तेलात खरपूस तळावेत. टोमॅटो
सॉस किंवा खोबर्याच्या चटणीबरोबर खावेत.
बे्रडमुळे पकोडे खुसखुशीत होतात.
मधुमेहींसाठी सुर्यनमस्कार वरदान
मधुमेहींसाठी सुर्यनमस्कार वरदान
मधुमेह हा आजार ज्यांना आहे अशांना
सुर्यनमस्काराचा व्यायाम वरदान ठरू शकतो.
किमान १२ सुर्यनमस्कार केल्याने शरीरामध्ये
इन्शुलिनचे जे प्रमाण आहे ते वाढते. जी
इंजेशन्स इन्शुलिनची इंजेशन्स् मधुमेही
घेतात त्यापेक्षाही चांगले नैसर्गिक इन्शुलिन
शरीराला प्राप्त होते व तंदुरुस्तीही कायम
राहते.
दैनिक पंचांग रविवार, दि. २६ मे २०२४
संकष्ट चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनाम संवत्सर, वैशाख कृष्णपक्ष, मूळ १०|३६
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल.
वृषभ : आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक. निश्चितेने काम कराल. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. अडकलेल्या कामात सुधारणा होईल.
मिथुन : अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. पारिवारिक वाद विकोपास जातील. मार्ग
प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात
उन्नति होईल.
कर्क : वैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील.
कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील.
सिंह : व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्या वाढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. आपल्या
पावलांच्या खुणा दुसर्यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे.
कन्या: आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेल. अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांरसाठी शुभ. गैरसमज दूर होतील.
तूळ : आपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिकदृष्टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील.
वृश्चिक : अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वेळ सत्कारणी लागेल.
धनु :अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. खर्चाची चिंता राहील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. वरिष्ठांची मर्जी
राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील.
मकर : खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी.
कुंभ : नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका. कामे अपुरी राहतील. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. अनपेक्षित फायदा करून देणार्यू काही घटना घडतील. सामाजिक यश.
मीन : अडचणी येतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांयवर थोपू नका. वेळेच महत्व समजावून घ्याल. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार नाही.
संकलक: अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
दैनिक पंचांग शनिवार, दि. २५ मे २०२४
–, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, ज्येष्ठा १०|३६
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : जोडीदारा बरोबर तणाव ठेऊ नका. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ.
वृषभ : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील.
मिथुन : कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल.
कर्क : अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील.
सिंह : उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ.
कन्या : काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. पाठबळ मिळेल. मनाला प्रसन्नता वाटेल. व
तूळ : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मि त्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न करा. मानसिक सुखशांती मिळेल.
वृश्चिक : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये. व्यस्त रहाल. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.
धनु : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.
मकर : कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. देवाण-घेवाण टाळा.
कुंभ : आज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा.
मीन : प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.
हिवाळा थंड आणि उन्हाळा गरम का असतो?
हिवाळा थंड आणि उन्हाळा गरम का असतो?
खरं तर हा प्रश्न, पृथ्वीवर ऋतुचक्र का असतं? असा विचारायला हवा. जगात विषुववृत्त सोडून कुठंही जा, वर्षभर एकच ऋतू असत नाही. तापमान एकसारखे असत नाही. त्यात वाढ-घट होतच राहते. तशी ती दिवसभराच्या २४ तासांतही होत असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एकच तापमान असत नाही; पण त्यातल्या कमाल आणि किमान तापमानातला फरक हा उन्हाळ्यातल्या कमाल आणि हिवाळ्यातल्या कमाल तापमानाइतका असत नाही. उन्हाळ्यात कमाल तापमान भारीच चढते. राजस्थानात काही ठिकाणी तर ते चक्क ५० अंशांइतकं चढते; पण तिथंच हिवाळ्यात ते सात-आठ अंशांपर्यंत उतरते. अमेरिकेतील मध्य भागातल्या कान्साससारख्या राज्यात तर उन्हाळ्यात ४० अंशापर्यंत चढणारे तापमान हिवाळ्यात शून्याखाली ४० अंशांपर्यंत उतरते. साहजिकच मग उन्हाळ्यात तापमान इतके का वाढते आणि हिवाळ्यात इतके का घसरते, असा सवाल उठतोच. त्यातही विषुववृत्तावर हा फरक अत्यंत कमी असतो; पण विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वा दक्षिणेकडे जावे तसतसा हा फरक वाढत जातो. काही जणांची असा समज होता, की तापमानातला हा फरक पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतरावर अवलंबून आहे.
जेव्हा पृथ्वी सूर्याच्या थोडीशी जवळ जाते तेव्हा तापमान चढते आणि जराशी दूर गेल्यावर उतरते. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची पृथ्वीची कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे सूर्यापासूनच्या पृथ्वीच्या अंतरात फरक जरूर पडतो; पण त्याच्या परिणामी तापमानातला हा बदल संभवत नाही. कारण उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो त्यावेळी म्हणजे जानेवारीत पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर सर्वात कमी असते, तर जुलैमध्ये ते सर्वात जास्त असते. तेव्हा तापमानातल्या फरकाचे ते कारण असू शकत नाही. त्याचे खरे कारण म्हणजे, आपल्या पृथ्वीचा आस सरळसोट उभा नसून तो कललेला आहे. उभ्या रेषेशी तो २३ अंशांचा कोन करून जातो. त्यामुळे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वीचा उत्तर गोलार्ध कधी सूर्याच्या दिशेला कललेला असतो, तर कधी दक्षिण गोलार्ध. त्यामुळे त्या प्रदेशावर पडणार्या सूर्याच्या किरणांचा कोन वेगवेगळा असतो. उन्हाळ्यात ते जवळजवळ उभे आदळतात. त्यामुळे त्यांचा सारा मारा एकाच ठिकाणी होतो. ते फारसे पसरत नाहीत. साहजिकच सारी उष्णता कमी क्षेत्रफळाच्या प्रदेशात शोषली जाते. शिवाय दिवस मोठा असल्यामुळे जास्त वेळ सूर्यकिरण धरतीला तापवत राहतात. ती उष्णता कमी होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळत नाही. उलट हिवाळ्यात किरणांचा कोन उथळ असतो. ते जवळजवळ आडवे येतात व इतस्ततः पसरतात. त्यापायी मग उष्णता एकाच ठिकाणी केंद्रित न होता इकडे तिकडे पसरते. शिवाय दिवसही लहान असल्यामुळे शोषलेल्या उष्णतेचा विचारही लवकर होतो. तापमान फारसे चढत नाही. उलट घसरायला मदत होते.
बटाटा रुमाली वड्या
बटाटा रुमाली वड्या
साहित्य : ४ उकडलेले बटाटे, अर्धा
चमचा आले-लसूण पेस्ट, १ टी स्पून धणे
जिरे पूड, अर्धी वाटी खोवलेले आले खोबरे,
कोथिंबीर बारीक चिरून, लिंबाचा रस दोन
चमचे, चवीप्रमाणे मीठ, २ टेबलस्पून तेलाची
फोडणी, २ चमचे डाळीचे पीठ, ३ बे्रडच्या
स्लाईस, तीळ, अर्धा चमचा मिरची पेस्ट.
कृती : उकडलेले बटाटे जाड किसणीने
किसावेत. किसात हळद, डाळीचे पीठ व
कडा कापलेला ब्रेड थोड्या पाण्यात बुडवून
घट्ट पिळून किसात मिसळावा. आले मिरची
लसूण पेस्ट, धने-जिर्याची पूड, चवीप्रमाणे
मीठ व लिंबाचा रस घालून बटाट्याचे मिश्रण
चांगले मळून घ्यावे. ओला रुमाल करून
ताटात पसरावा. त्यावर बटाट्याचे मिश्रण
पातळ थापावे. थापलेल्या मिश्रणावर खोबरे व
कोथिंबीर पसरून रुमालाच्या सहाय्याने घट्ट
गुंडाळी करून रोल करावेत. गुंडाळी करताना
कापड हळूहळू सोडवून घ्यावे. हे रोल मोदक
पात्रात वाफवून घ्यावेत व गार झाल्यावर
वड्या कापाव्यात.
कढईत मोहरी-जिरे-हिंगाची फोडणी
करावी. फोडणीतच थोडे पांढरे तीळ व
कढीलिंब घालावा व कापलेल्या वड्या घालून
परतावे. वर डेकोरेशनसाठी पुन्हा कोथिंबीर
व खोबरे घालावे. उकडल्यानंतर या वड्या
कापून फ्रायपॅनमध्ये थोड्या तेलावर तळल्या
तरी छान लागतात.





