आलू-मटार पॅटीस

0
112

आलू-मटार पॅटीस

साहित्य : उकडून सोललेल्या
बटाट्याचा लगदा २ वाट्या, मटार दाणे १
वाटी, चवीप्रमाणे मीठ, ३ हिरव्या मिरच्या
जाडसर वाटून, थोडी चिरलेली कोथिंबीर, १
टी स्पून आले-लसूण वाटून, ओल्या नारळाचा
खव, बे्रड क्रंब्ज (ब्रेडचा चुरा).
कृती : मटार दाणे वाफवून घ्यावेत.
तेल तापवून त्यात जिरे व हळद घालावी.
आले, लसूण व मिरची पेस्ट घालावी. त्यात
वाफवलेला मटार व चवीप्रमाणे मीठ घालावे.
थोडी धने-जिरे पावडर घालावी. आले,
खोवलेले खोबरे व कोथिंबीर घालावी. कोरडी
उसळ तयार करून गार करावी. बटाट्यांच्या
लगद्यात मीठ घालून चांगले मळावे. त्यात
चिमूटभर हळद घालावी.
या मिश्रणाचा लहान लिंबाएवढा गोळा
घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन
त्यात मटारची उसळ भरावी. मटारची उसळ
थोडी हाताने कुस्करून घ्यावी. बटाट्याची ही
सारण भरलेली वाटी पुन्हा हाताने बंद करून
गोल आकार द्यावा. बे्रड क्रंब्जमध्ये घोळवून
गरम तेलात खमंग तळावी किंवा फ्रायपॅनमध्ये
थोडे तेल घालून पॅटीसला चपटा आकार
देऊन शॅलो फ्राय करावे.