आलू-मटार पॅटीस

आलू-मटार पॅटीस

साहित्य : उकडून सोललेल्या
बटाट्याचा लगदा २ वाट्या, मटार दाणे १
वाटी, चवीप्रमाणे मीठ, ३ हिरव्या मिरच्या
जाडसर वाटून, थोडी चिरलेली कोथिंबीर, १
टी स्पून आले-लसूण वाटून, ओल्या नारळाचा
खव, बे्रड क्रंब्ज (ब्रेडचा चुरा).
कृती : मटार दाणे वाफवून घ्यावेत.
तेल तापवून त्यात जिरे व हळद घालावी.
आले, लसूण व मिरची पेस्ट घालावी. त्यात
वाफवलेला मटार व चवीप्रमाणे मीठ घालावे.
थोडी धने जिरे पावडर घालावी. आले,
खोवलेले खोबरे व कोथिंबीर घालावी. कोरडी
उसळ तयार करून गार करावी. बटाट्यांच्या
लगद्यात मीठ घालून चांगले मळावे. त्यात
चिमूटभर हळद घालावी.
या मिश्रणाचा लहान लिंबाएवढा गोळा
घेऊन त्याला वाटीसारखा आकार देऊन
त्यात मटारची उसळ भरावी. मटारची उसळ
थोडी हाताने कुस्करून घ्यावी. बटाट्याची ही
सारण भरलेली वाटी पुन्हा हाताने बंद करून
गोल आकार द्यावा. बे्रड क्रंब्जमध्ये घोळवून
गरम तेलात खमंग तळावी किंवा फ्रायपॅनमध्ये
थोडे तेल घालून पॅटीसला चपटा आकार
देऊन शॅलो फ्राय करावे.

निरोगी केसांसाठी

निरोगी केसांसाठी
* लिंबूची साल हाताच्या कोपरांवर
चोळल्यास कोपरे स्वच्छ होतात.
* केसांमध्येही लिंबूची साल चोळून
अंघोळ केल्यास केस घनदाट, निरोगी आणि
चमकदार बनतात.
* आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट
बनवून केसांना लावा व नंतर धुवा-अ‍ॅलोव्हेरा
जेल केसांना १५ मिनिटं लावून ठेवा व धुवा.

फ्रिज नसल्यास दूध

फ्रिज नसल्यास दूध सोडियम बायकार्बो
नेट टाकून उकळवावे. ते फाटत किंवा
खराबही होत नाही.

वास्तू

व्यसनाच्या समस्या- उत्तर-पूर्व म्हणजे
आग्नेय भागात बांधकाम, रंग, माळा, पाणी
वीज-गॅस यांच्या अस्तित्वामुळे व्यसनांचा
कुटुंबात शिरकाव होतो.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

पोलीस : काय रे,
कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला!
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा : दारुपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा : माझी बायको!!!

सुविचार

पापाची कबुली देणे म्हणजे मुक्तीचा प्रारंभ होय.

हसा आणि शतायुषी व्हा!

नवरा : काल रात्री माझ्या स्वप्नात
एक सुंदर मुलगी आली होती…
बायको : एकटीच आली असेल?
नवरा : हो तुला कसं माहीत?
बायको : कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…

साळूचे शस्त्र

साळूचे शस्त्र

एका रानात एक लांडगा आणि एक साळू राहत होते. साळूचे मांस फारच रुचकर लागते, असे दुसर्‍या एका लांडग्याने सांगितले असता आपल्याच रानात राहणार्‍या साळूची आठवण लांडग्याला झाली. याच आपल्या शेजारणीला मारुन तिचे रुचकर मांस खावे, अशी अभिलाषा लांडग्याच्या मनात निर्माण झाली. एके दिवशी साळू आपल्या अंगावरील काटे उभारुन ऊन खात बसली असता लांडगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, “साळूताई, ना कुठे लढाई ना कुठे युद्ध. मग सदानकदा अंगावर अशी शस्त्रे बाळगून राहणे काही शहाणपणाचे नाही. म्हणून साळूताई, उगीच कशाला अंगावर काट्याचे ओझे वागवतेस? मी सांगतो तसे कर, अंगावरील हे काटे ठेव बाजूला काढून. आलीच लढाईची वेळ, तर ते अंगावर चढव. तुला काही कठीण नाही.” त्यावर लांड़ग्याचे कपट ओळखून साळूताई म्हणाली,” नको रे बाबा, सध्या सगळीकडे जरी शांतता असल्यासारखी वाटत असली तरी कोण कधी गनिमी कावा करुन अंगावर धावून येईल, त्याचा भरोसा नाही. तुझे म्हणणे मला पटत नाही. आणि हो, जोपर्यंत तुझ्यासारखे कावेबाज लांडगे माझ्या आसपास राहतात, तोपर्यंत तरी मला लढाई सतत चालूच आहे, असे समजून ही माझी काट्याची शस्त्रे अंगावर बाळगावीच लागणार.”

तात्पर्य: शत्रूच्या कावेबाजपणाला, भूलथापांना बळी पडून शस्त्रे टाकणे म्हणजे जाणून बुजून जीव धोयात टाकणे असेच होय.

आपण किती रक्ताचे दान करू शकतो

आपण किती रक्ताचे दान करू शकतो

रतदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण त्या बाबतीत अनेक समज-अपसमज आहे. जेव्हा आपल्या कोणातरी अतिशय जवळच्या आप्तावर शस्त्रक्रिया होणार असेल तेव्हा डॉटर काही बाटल्या रताची सोय करायला आपल्याला सांगतात. त्या वेळी आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्या व्यतींंना, काही वेळा अनोळखी व्यतींनाही रतदानासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून हे समज, बहुतांशी अपसमज उघड होतात. जखमेमुळे रतस्त्राव होणे शरीरस्वास्थ्याला धोकादायक आहे, ही समजूत तशी बरोबर आहे. त्यात चूक नाही. मात्र, किती रत शरीरातून वाहून गेले तरी शरीर ते सहन करु शकते, याची माहिती अनेकांना नसते. शरीरातून वाहून गेलेल्या रतामुळ झालेले नुकसान कायमस्वरुपी नसते. शरीर त्याची भरपाई करतच असते. मात्र, या भरपाईचा वेग मर्यादित असल्यामुळे एका वेळी आपण किती रताचा र्‍हास सहन करु शकतो, यावर मर्यादा पडतात. साधारणपणे एकूण रताच्या १० ते १५ टक्के रतस्त्राव झाल्यास स्वास्थ्याला फारसा धोका नसतो. त्या स्त्रावाच्या नंतर ताबडतोब काही रत देता आल्यास उत्तमच. पण तसे देणे शय झाले नाही तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरीर त्या रताची भरपाई करतच राहते. निरोगी आणि सुदृढ अशा तरुणाच्या शरीरात सरासरीने साडेपाच लिटर रत असते. त्याच्या दहा टक्के म्हणजे साधारण अर्धा लिटर रत तेवढ्या रताचा र्‍हासही शरीर सहन करु शकते. उलट रतदानाच्या वेळी दात्याच्या शरीरातून पाव लिटर एवढेच रत काढून घेतले जाते. त्यामुळे त्याची भरपाई होण्यास वेळ लागत नाही. साधारण २४ तासांत ही भरपाई होत असते. तरीही एकदा रतदान केल्यानंतर दोन महिने परत रतदान करु दिले जात नाही. त्यामुळे पाव लिटर रत देण्याने कोणतेही नुकसान होत नाही. अर्थात, ही झाली संपूर्ण रतदानाची प्रक्रिया. काही वेळा रुग्णासाठी केवळ प्लेटलेट्सची गरज असते. अशा वेळी डॉटर संपूर्ण रक्त काढून न घेता अफेरेसिस नावाच्या प्रक्रियेचा वापर करुन फत प्लेटलेट्स काढून घेतात. त्यांची भरपाई तर त्याहीपेक्षा जलद गतीने होते. त्यामुळे एकदा प्लेटलेट्सचे दान केल्यानंतर तीनच दिवसांनी परत त्यांच दान करता येते.

वास्तू


घरात देवांच्या शांत मुद्रेच्या मूर्ती
वा तसबिरीच ठेवाव्यात. देवांचे रागावलेले,
राक्षसांचा वध करतानाचे वा महाभारतातील
युद्धाचे फोटो घरात लावू नयेत.
संकलक ः अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.