आपण किती रक्ताचे दान करू शकतो
रतदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. पण त्या बाबतीत अनेक समज-अपसमज आहे. जेव्हा आपल्या कोणातरी अतिशय जवळच्या आप्तावर शस्त्रक्रिया होणार असेल तेव्हा डॉटर काही बाटल्या रताची सोय करायला आपल्याला सांगतात. त्या वेळी आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्या व्यतींंना, काही वेळा अनोळखी व्यतींनाही रतदानासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून हे समज, बहुतांशी अपसमज उघड होतात. जखमेमुळे रतस्त्राव होणे शरीरस्वास्थ्याला धोकादायक आहे, ही समजूत तशी बरोबर आहे. त्यात चूक नाही. मात्र, किती रत शरीरातून वाहून गेले तरी शरीर ते सहन करु शकते, याची माहिती अनेकांना नसते. शरीरातून वाहून गेलेल्या रतामुळ झालेले नुकसान कायमस्वरुपी नसते. शरीर त्याची भरपाई करतच असते. मात्र, या भरपाईचा वेग मर्यादित असल्यामुळे एका वेळी आपण किती रताचा र्हास सहन करु शकतो, यावर मर्यादा पडतात. साधारणपणे एकूण रताच्या १० ते १५ टक्के रतस्त्राव झाल्यास स्वास्थ्याला फारसा धोका नसतो. त्या स्त्रावाच्या नंतर ताबडतोब काही रत देता आल्यास उत्तमच. पण तसे देणे शय झाले नाही तर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरीर त्या रताची भरपाई करतच राहते. निरोगी आणि सुदृढ अशा तरुणाच्या शरीरात सरासरीने साडेपाच लिटर रत असते. त्याच्या दहा टक्के म्हणजे साधारण अर्धा लिटर रत तेवढ्या रताचा र्हासही शरीर सहन करु शकते. उलट रतदानाच्या वेळी दात्याच्या शरीरातून पाव लिटर एवढेच रत काढून घेतले जाते. त्यामुळे त्याची भरपाई होण्यास वेळ लागत नाही. साधारण २४ तासांत ही भरपाई होत असते. तरीही एकदा रतदान केल्यानंतर दोन महिने परत रतदान करु दिले जात नाही. त्यामुळे पाव लिटर रत देण्याने कोणतेही नुकसान होत नाही. अर्थात, ही झाली संपूर्ण रतदानाची प्रक्रिया. काही वेळा रुग्णासाठी केवळ प्लेटलेट्सची गरज असते. अशा वेळी डॉटर संपूर्ण रक्त काढून न घेता अफेरेसिस नावाच्या प्रक्रियेचा वापर करुन फत प्लेटलेट्स काढून घेतात. त्यांची भरपाई तर त्याहीपेक्षा जलद गतीने होते. त्यामुळे एकदा प्लेटलेट्सचे दान केल्यानंतर तीनच दिवसांनी परत त्यांच दान करता येते.