डोळ्या भोवतालची काळी वस्तुळे घालविण्यासाठी
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तुमच्या चेहर्यावर असतील तर चेहरा निस्तेज वाटतो. अपुरी
झोप हे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे ‘लवकर निजे लवकर उठे
त्यासी आरोग्य लाभे’ या उक्तीप्रमाणे लवकर झोपावे आणि भरपूर झोप घ्यावी. झोपण्याआधी
चेहर्यावरील मेकअप पूर्णपणे काढावा, चेहरा स्वच्छ धुवावा. जर तुम्ही मेकअप चेहर्यावर घेऊन
झोपत असाल तर दीर्घकाळात त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन त्वचा निस्तेज आणि रुक्ष
व्हायला सुरुवात होते. मद्यपान आणि धूम्रपान टाळा मद्यपान आणि धुम्रपानामुळे अनेक तोटे
होतात तसेच झोप न येणे, उशिरा झोपणे या समस्या ग्रासतात. त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान
पूर्णपणे टाळल्याने चेहर्यावरील काळी वर्तुळे निघून जायला मदत मिळते.
डोळ्या भोवतालची काळी वस्तुळे घालविण्यासाठी
बटाटा रुमाली वड्या
बटाटा रुमाली वड्या
साहित्य : ४ उकडलेले बटाटे, अर्धा
चमचा आले-लसूण पेस्ट, १ टी स्पून धणे
जिरे पूड, अर्धी वाटी खोवलेले आले, खोबरे,
कोथिंबीर बारीक चिरून, लिंबाचा रस दोन
चमचे, चवीप्रमाणे मीठ, २ टेबलस्पून तेलाची
फोडणी, २ चमचे डाळीचे पीठ, ३ बे्रडच्या
स्लाईस, तीळ, अर्धा चमचा मिरची पेस्ट.
कृती : उकडलेले बटाटे जाड किसणीने
किसावेत. किसात हळद, डाळीचे पीठ व
कडा कापलेला ब्रेड थोड्या पाण्यात बुडवून
घट्ट पिळून किसात मिसळावा. आले मिरची
लसूण पेस्ट, धने-जिर्याची पूड, चवीप्रमाणे
मीठ व लिंबाचा रस घालून बटाट्याचे मिश्रण
चांगले मळून घ्यावे. ओला रुमाल करून
ताटात पसरावा. त्यावर बटाट्याचे मिश्रण
पातळ थापावे. थापलेल्या मिश्रणावर खोबरे व
कोथिंबीर पसरून रुमालाच्या सहाय्याने घट्ट
गुंडाळी करून रोल करावेत.
गुंडाळी करताना कापड हळूहळू
सोडवून घ्यावे. हे रोल मोदक पात्रात वाफवून
घ्यावेत व गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
कढईत मोहरी-जिरे-हिंगाची फोडणी करावी.
फोडणीतच थोडे पांढरे तीळ व कढीलिंब
घालावा व कापलेल्या वड्या घालून परतावे.
वर डेकोरेशनसाठी पुन्हा कोथिंबीर व खोबरे
घालावे. उकडल्यानंतर या वड्या कापून
फ्रायपॅनमध्ये थोड्या तेलावर तळल्या तरी
छान लागतात.
दैनिक पंचांग मंगळवार, दि. २८ मे २०२४
—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, उ.षा.०९|३३
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६
वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल.
खाणे-पीणे काळजीपूर्वक करा.
वृषभ : पारिवारिक वाद वाढतील. खर्च होईल. अडकलेल्या कामात सुधारणा होईल. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल. शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल.
मिथुन : मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील.
कर्क : कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील. आपल्या पावलांच्या खुणा दुसर्यांना मार्गदर्शक ठरण्याचा संभव आहे. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील.
सिंह : अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. अचानक खर्च वाढेल. आजारात खर्चाची शयता.
कन्या : आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण ठेवा. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. कामावर प्रभाव पडेल.
तूळ : आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल.
व्यापार व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील.
वृश्चिक : नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा मूळ मंत्र कोणत्याच कामाला अशय न समजणे आहे. यश मिळणार नाही. अनपेक्षित फायदा करून देणार्या काही घटना घडतील. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा.
धनु : आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. वेळेच महत्व समजा. प्रेम प्रकरणात दोघांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शयता. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्यांवर थोपू नका. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग. मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वेळ सत्कारणी लागेल. आज रात्री आपल्या करीयरशी संबंधित सर्व बाबी स्पष्ट होतील.
मीन : वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. सुख शांतीचे वातावरण राहील.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर
हवेचं वजन किती आहे?
हवेचं वजन किती आहे?
काय रे, काय चेष्टा करुन राहिलायत हवेचं आणि वजन अहो, ती हवा तर आपल्याला दिसतही नाही. इतकी हलकी असते, तिचं काय वजन असणार आहे पण कितीही हलकी असली तरी तिलाही वजन असतंच. त्याशिवाय का त्याच हवेचा दाब आपल्याला जाणवत राहतो. एखाद्या पत्र्याच्या डब्यातून सगळी हवा काढून घेऊन तो निर्वात केला तर बाहेरच्या हवेचा दाब त्या डब्याची अवस्था पालापाचोळयासारखी करतो. त्याला वेडावाकडा दाबून टाकतो याचा अनुभव आपण घेतोच की मग त्या हवेला वजन नाही अस कस म्हणता येईल. तरीही हा प्रश्न व्यवस्थित विचारला गेलेला नाही. हवेच वजन म्हणजे किती हवेच वजन असा प्रतिप्रश्न खरं तर आपण करायला हवा. सगळया हवेच वजन सांगण तसं कठीणच आहे. तेव्हा आपण, एक लिटर हवेच वजन किती असा प्रश्न सुधारित स्वरुपात विचारायला हवा. खर तर तेही सांगण तसं सोपं नाही. कारण हवेचे घटक निरनिराळया ठिकाणी निरनिराळे असू शकतात. काही ठिकाणची हवा दमट असते. तिथ हवेत बाष्पाचं किंवा पाण्याच्या वाफेचं प्रमाण जास्त असतं. काही ठिकाणी प्रदूषण झाल्यामुळे कार्बन डाय ऑसाईड वायूचं प्रमाण जास्त असते.
त्यामुळे मग निरनिराळया ठिकाणी एक लिटर हवेच वजनही निरनिराळं असतं. तरीही आपण समुद्रसपाटीवरच्या सर्वसाधारण आणि प्रदूषणविरहित हवेचा विचार करुया. या हवेत २१ टके ऑसिजन, ७८ टके नायट्रोजन, ०.०३ टके कार्बन डाय ऑसाईड हे वायू मुख्यत्वे असतात. त्याशिवाय पाण्याची वाफ, हायड्रोजन, हेलियम, अर्गान, सल्फर डाय ऑसाईड, निऑन वगैरे वायूही असतात. पण त्याचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे त्यांचा हवेच्या वजनात फारसा सहभाग नसतो. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी फरक पडणार नाही. वायूंचा एक गुणधर्म असा आहे, की २२.४ लिटर वायूमध्ये ६ १०२३ इतके रेणू असतात. या संख्येला अॅव्होगॅड्रो संख्या असं म्हटलं जातं. अणि इतया रेणूंचं वजन त्या पदार्थाच्या अणुभाराइतक ग्रॅम असतं. म्हणजे तितया ऑसिजनच्या रेणुंचं वजन ३२ ग्रॅम भरेल, नायट्रोजनचं वजन २८ ग्रॅम भरेल. हवेत असलेलं या वायूंचं प्रमाण ध्यात घेतलं तर गणित करुन आपण २२.४ लिटर हवेचं वजन २८.८९ ग्रॅम भरतं. तेव्हा १ लिटर हवेचं वजन १.२९ इतकं भरेल. अर्थात, जसजसं आपण उंचावर जातो तसतशी हवा विरळ होते. त्यामुळे तिथं एका लिटर हवेमध्ये असलेल्या वायूंच्या रेणूंची संख्याही कमी होते. साहजिक तिथं एक लिटर हवेचं वजन कमीच भरेल.






