डोळ्या भोवतालची काळी वस्तुळे घालविण्यासाठी

0
90

डोळ्या भोवतालची काळी वस्तुळे घालविण्यासाठी
डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तुमच्या चेहर्‍यावर असतील तर चेहरा निस्तेज वाटतो. अपुरी
झोप हे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याचे एक कारण आहे. त्यामुळे ‘लवकर निजे लवकर उठे
त्यासी आरोग्य लाभे’ या उक्तीप्रमाणे लवकर झोपावे आणि भरपूर झोप घ्यावी. झोपण्याआधी
चेहर्‍यावरील मेकअप पूर्णपणे काढावा, चेहरा स्वच्छ धुवावा. जर तुम्ही मेकअप चेहर्‍यावर घेऊन
झोपत असाल तर दीर्घकाळात त्वचेवर त्याचे विपरीत परिणाम होऊन त्वचा निस्तेज आणि रुक्ष
व्हायला सुरुवात होते. मद्यपान आणि धूम्रपान टाळा मद्यपान आणि धुम्रपानामुळे अनेक तोटे
होतात तसेच झोप न येणे, उशिरा झोपणे या समस्या ग्रासतात. त्यामुळे मद्यपान आणि धूम्रपान
पूर्णपणे टाळल्याने चेहर्‍यावरील काळी वर्तुळे निघून जायला मदत मिळते.