बटाटा रुमाली वड्या

0
76

बटाटा रुमाली वड्या

साहित्य : ४ उकडलेले बटाटे, अर्धा
चमचा आले-लसूण पेस्ट, १ टी स्पून धणे
जिरे पूड, अर्धी वाटी खोवलेले आले, खोबरे,
कोथिंबीर बारीक चिरून, लिंबाचा रस दोन
चमचे, चवीप्रमाणे मीठ, २ टेबलस्पून तेलाची
फोडणी, २ चमचे डाळीचे पीठ, ३ बे्रडच्या
स्लाईस, तीळ, अर्धा चमचा मिरची पेस्ट.
कृती : उकडलेले बटाटे जाड किसणीने
किसावेत. किसात हळद, डाळीचे पीठ व
कडा कापलेला ब्रेड थोड्या पाण्यात बुडवून
घट्ट पिळून किसात मिसळावा. आले मिरची
लसूण पेस्ट, धने-जिर्‍याची पूड, चवीप्रमाणे
मीठ व लिंबाचा रस घालून बटाट्याचे मिश्रण
चांगले मळून घ्यावे. ओला रुमाल करून
ताटात पसरावा. त्यावर बटाट्याचे मिश्रण
पातळ थापावे. थापलेल्या मिश्रणावर खोबरे व
कोथिंबीर पसरून रुमालाच्या सहाय्याने घट्ट
गुंडाळी करून रोल करावेत.
गुंडाळी करताना कापड हळूहळू
सोडवून घ्यावे. हे रोल मोदक पात्रात वाफवून
घ्यावेत व गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
कढईत मोहरी-जिरे-हिंगाची फोडणी करावी.
फोडणीतच थोडे पांढरे तीळ व कढीलिंब
घालावा व कापलेल्या वड्या घालून परतावे.
वर डेकोरेशनसाठी पुन्हा कोथिंबीर व खोबरे
घालावे. उकडल्यानंतर या वड्या कापून
फ्रायपॅनमध्ये थोड्या तेलावर तळल्या तरी
छान लागतात.