माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो?

माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो?

जीवेत् शरदः शतम् असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांच आहे, अशी जी एक सर्व साधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे. पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो, या समजुतीला कोणता आधार आहे. कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यतिची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानानं नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या व्यतीकडे नवलाईनंच पाहिलं जातं. तेव्हा खरा प्रश्न हा आहे, की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे. त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही इतिहास पाहिला तर याचं उत्तर देणं सोपं होत नाही. कारण माणसांच सरासरी आयुर्मान वेगवेगळया कालखंडात वेगवेगळया भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांच होतं. ब्रॉन्झयुगात तर ते अठरापर्यंत घरसलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहुन दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदराचे वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो. आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतित काय, सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुर्‍या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांच होतं. आज ते ६७ झालं आहे. याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्युदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणार्‍या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शतिशाली औषधंही सहजगल्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे पोषणातही वेगानं प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणार्‍या सकस आणि पर्याप्त अन्नापयी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ टिकून राहत आहे. ही जी वाढ झालेली आहे, ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्याच निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठ्यामध्येच त्याच्या एकंदर आयुमर्यादेच इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणार्‍या वैज्ञानिकांनी केलेलं संशोधन या विषयाशीच निगडीत आहे. त्यानुसार आपल्या अद्ययावत शारीरीक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं ज्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसुत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणार्‍या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधून काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गूढ उकललं, की मग, माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो या प्रश्नाचं नेटक उत्तर देणं शय होईल.

सुविचार

सौंदर्याचे नाशवंत स्वरूप समजावण्यासाठी विधात्याने जणू फुले निर्माण केली आहेत.

गुणकारी हिंगाचे प्रकार

गुणकारी हिंगाचे प्रकार
स्वयंपाकघरातील सर्व प्रकारच्या नमकीन पदार्थांसाठी, रुचकर भाज्यांसाठी तसेच
लोणच्यामध्ये उपयोगात येणार्‍या हिंगाचे ‘बाल्हाक’ आणि ’रामठ’ असे दोन प्रकार आहेत. पण
बाजारात रंगावरुन ‘काळा हिंग’ आणि ‘पांढरा हिंग’ असे दोन प्रकार केले जातात.

बदाम के पान

बदाम के पान

साहित्य : दीड वाटी बदाम, पाऊण
वाटी साखर, एक चमचा दूध, खायचा हिरवा
रंग, सात लवंगा, सात विड्यांची पाने, तूप,
वर्खाचा कागद.
कृति : बदाम दोन तास भिजत घालावे.
मग त्याची साले काढून मिसरमधून अगदी
गंधासारखे बारीक वाटून घ्यावे. जाड बुडाच्या
कढईत साखर बुडेल एवढेच पाणी घालून
पाक करावा. उकळी आल्यावर चमचाभर दूध
टाकून मळी काढावी. मग त्यात बदाम वाटण
घालून ढवळत राहावे. मिश्रणाने कड सोडली
की उतरवून त्यात दोन-तीन थेंब रंग घालून
नीट मिसळून घ्यावा. कोमट असताना त्याचे
सात-आठ गोळे करावे. विड्याच्या पानाच्या
उलट बाजूला तूप लावून त्यावर हा गोळा
प्लास्टिकवर ठेवून हलके लाटावा. पानाची
पट्टी बनवताना घालतो तशा घड्या विड्याच्या
पानाच्या सहाय्याने घालाव्या. लवंगा, वर्ख
लावून सजवावे.

त्वचेच्या आरोग्यासाठी

त्वचेच्या आरोग्यासाठी
त्वचेवर जखम किंवा उन्हाळ्याचे डाग,
व्रण असतील तर त्यावर किसलेल्या कच्च्या
बटाट्याचा किस लावा. ३/४ दिवसांत डाग
निघून जातात. किस १० मिनिटे ठेवून कोमट
पाण्याने तो भाग धुवून पुसावा.

गोड भात, बिर्याणीसाठी भात शिजवताना

* गोड भात, बिर्याणीसाठी भात
शिजवताना तो मोकळा सळसळीत होण्यासाठी
त्यात चमचाभर साजूक तूप घालावं.
* गोड भात, बिर्याणीसाठी भात
शिजवताना तो मोकळा सळसळीत होण्यासाठी
त्यात चमचाभर साजूक तूप घालावं.

वास्तू

दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर
व त्याच्याबरोबर मागच्या बाजूला दोन्ही
ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवावी. काही
दुकानदारांच्या दुकानात केवळ बाहेरच्या
बाजूला गणपतीची मूर्ती ठेवलेली असते. या
मूर्तीमुळे दुकानात येणार्‍या-जाणार्‍या बाहेरच्या
व्यक्तींना लक्ष्मीचा लाभ होतो. दुकानदाराला
नव्हे. कारण गणपतीची मूर्ती हे अमृताचे,
तर पाठ हे दारिद्य्राचे प्रतीक समजले जाते.
दुकानाच्या बाहेरील बाजूला गणपतीची मूर्ती
लावल्यामुळे गणपतीची पाठ दुकानाकडे होते.
त्यामुळेच लक्ष्मी येण्याच्या वाटेत अडथळे
निर्माण होतात. हे टाळण्यासाठी दुकानाच्या
बाहेरील बाजूच्या मूर्तीबरोबरच मागे आतील
बाजूसही गणपतीचीमूर्ती असावी.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

दैनिक पंचांग बुधवार, दि. २९ मे २०२४

—, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर,
वैशाख कृष्णपक्ष, श्रवण ०८|३८
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. ३१ मि.

राशिभविष्य

मेष : जोडीदारा बरोबर तणाव होईल. मतभेदांपासून लांब रहा. व्यापार राहील. विवाह योग, घरात शुभ मांगलिक कार्ये. व्यापारिक भागीदारीसाठी उत्तम वेळ.

वृषभ : अधिकारांचा योग्य उपयोग करून घ्याल. मनावरील दडपण दूर. अनुसंधानातून कार्यक्षेत्रात प्राप्ति योग. धर्म, आध्यात्मात रूचि वाढेल. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील.

मिथुन : कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. अभीष्ट सिद्धी होईल. फायदा होईल. विरोधक करार करतील. व्यापारात बुद्धिमत्ता, दूरदर्शितेची प्रशंसा होईल. अत्यधिक प्रयत्नांचा अल्प लाभ मिळेल. तणाव अडचणी राहतील.

कर्क : अध्ययनात रूचि वाढेल. कामांची प्रशंसा होईल. भागीदारी पक्षात होऊ शकते. अर्थप्राप्ती झाल्याने खर्चाचे प्रश्न सुटतील.

सिंह : उपजीविकेच्या स्त्रोतांमुळे लाभ प्राप्ति. भागीदारीतून विशेष लाभ. उपजीविकेच्या स्त्रोतातून लाभ होईल, लोकप्रियतेत वृद्धि होईल.

कन्या : काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील.

तूळ : आजचा दिवस कठोर परिश्रम करण्यात जाईल. आजची संध्याकाळ मित्रांबरोबर व्यतित करण्याच्या प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण राहील. कुटुंबाकडून सहयोग मिळेल.

वृश्चिक : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये.

धनु : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वांना एकत्र आणून करावी लागेल.

मकर : कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील.

कुंभ : उत्तम वाहन सुख. तब्बेतीत सुधारणा. धार्मिक कार्यात वेळ जाईल. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. परिश्रमाने कामाचे शुम परिणाम येतील.

मीन : अध्ययनात छान यश. अर्थप्राप्तिचा योग. मित्रांकडून आर्थिक लाभ होईल. आनंदाची बातमी मिळेल. देवाण-घेवाण टाळा. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील. आरोग्य उत्तम राहील.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर

पृथ्वीचा परीघ किती आहे?

पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण, ती गोल गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधनं नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारत त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात धु्रव तारा उत्तर दिशा दाखवत असे.

त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे, हे समजण्यासाठीही अशाच गणिताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच ‘नौकानयनातला मैल’ ही संकल्पना पुढं आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन ‘नॉट’ हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नॉट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचं एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक- साठांश इतया भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० ु ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.

सुविचार

जो पाप करीत नाही तो देव आहे व पापांबद्दल ज्याला पश्चात्तापदेखील होत नाही तो दानव आहे. : हितोपदेश