पृथ्वीचा परीघ किती आहे?

0
126

पृथ्वीचा परीघ किती आहे?

या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहीत धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथं ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण, ती गोल गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही. आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणावर पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणार्‍या नावाड्यांना आपण कुठं आहोत, कुठं चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधनं नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारत त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात धु्रव तारा उत्तर दिशा दाखवत असे.

त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे, हे समजण्यासाठीही अशाच गणिताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच ‘नौकानयनातला मैल’ ही संकल्पना पुढं आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन ‘नॉट’ हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नॉट असा मोजला जातो. जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचं एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक- साठांश इतया भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० ु ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.