बदाम के पान

0
103

बदाम के पान

साहित्य : दीड वाटी बदाम, पाऊण
वाटी साखर, एक चमचा दूध, खायचा हिरवा
रंग, सात लवंगा, सात विड्यांची पाने, तूप,
वर्खाचा कागद.
कृति : बदाम दोन तास भिजत घालावे.
मग त्याची साले काढून मिसरमधून अगदी
गंधासारखे बारीक वाटून घ्यावे. जाड बुडाच्या
कढईत साखर बुडेल एवढेच पाणी घालून
पाक करावा. उकळी आल्यावर चमचाभर दूध
टाकून मळी काढावी. मग त्यात बदाम वाटण
घालून ढवळत राहावे. मिश्रणाने कड सोडली
की उतरवून त्यात दोन-तीन थेंब रंग घालून
नीट मिसळून घ्यावा. कोमट असताना त्याचे
सात-आठ गोळे करावे. विड्याच्या पानाच्या
उलट बाजूला तूप लावून त्यावर हा गोळा
प्लास्टिकवर ठेवून हलके लाटावा. पानाची
पट्टी बनवताना घालतो तशा घड्या विड्याच्या
पानाच्या सहाय्याने घालाव्या. लवंगा, वर्ख
लावून सजवावे.