‘जैन सोशल फेडरेशन’ आयोजित खुल्या गायन स्पर्धेत सोहम भंडारी, प्रियदर्शन व सुरीले आनंदयात्री ग्रुप प्रथम

नगर – राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंदऋषिजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्य स्मृतीदिन व १२५ व्या जन्मोत्सवानिमित्त जैन
सोशल फेडरेशनतर्फे आनंदधाम- मध्ये घेण्यात आलेल्या वैयक्तिक गायन स्पर्धेत सोहम भंडारी याने तर खुल्या गायन स्पर्धेत प्रियदर्शन ग्रुप आणि सुरीले आनंदयात्री ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. सौ.मनिषा लोढा व निखिलेंद्र लोढा यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना सौ.मनिषा लोढा म्हणाल्या, आचार्यश्रींना भक्ती संगीताची फार आवड होती. विविध भाषांमधील संगीताचा ते तल्लीनतेने आनंद घेत. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आनंदधाममध्ये
भक्तीगित गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या पाठीवर
थाप देत आकर्षक पारितोषिक दिली जात आहेत. हा पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे आचार्यश्रींच्या चरणी
अर्पण केलेली स्मृतीपुष्पेच होत.
स्पर्धेचा निकाल सरोजताई कटारिया यांनी घोषित केला तो असा:- वैयक्तिक भक्ती गीत गायन स्पर्धेतील द्वितीय क्रमांक रिध्दी मेहेर व रोशनी बोरा यांना तर तृतीय क्रमांक आयुष कासवा व रिध्दी सोनार यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्रावणी काळे, श्रृतिका दरेकर, अनायरा चोरडिया, श्रध्दा पालवे, हर्षदा औटी, रिया मुनोत व मोहिका भंडारी यांना देण्यात आली.

समुह भक्ती गीत गायन स्पर्धेतील छोट्या गटात द्वितीय क्रमांक भिंगार येथील छावणी परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक सुरीले आनंदयात्री ग्रुप दोनने घेतला. उत्तेजनार्थ पारितोषिक श्री तिलोक आनंद जैन पाठशाळा, पार्श्वग्रुप भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, आनंद संस्कार शिक्षा अभियान आणि सुमति ग्रुप भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी मिळवले.
खुल्या समुह भक्ती गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक ब्राह्मी युवती मंचने तर तृतीय क्रमांक वर्धमान महिला मंडळाने मिळवला. कुंदन अ‍ॅटीव्ह ग्रुप, स्टार परिवार आणि त्रिशला ग्रुप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. परीक्षक म्हणून कल्याण मुरकुटे आणि सौ.अमृता बेडेकर यांनी काम पाहिले. सीमा मुनोत यांनी आभार मानले. दोन दिवस चाललेल्या या
स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सपना कटारिया आणि सिमरन मुनोत यांनी परिश्रम घेतले.

झी टॉकीज फेम आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन १ चा विजेता कु.सार्थक
शिंदे याची भक्ती संध्या मैफिल उत्साहात पार पडली. आरोही बेडेकर हिच्या भावपूर्ण सुरातील आनंद धून आणि हम कथा सुनाते गुरू आनंद की या भक्तिगीताने भक्तिसंध्येचा शुभारंभ करण्यात आला. क्रांती शिंदे हिने णमोकार मंत्र म्हटला. सार्थक शिंदे याने वेडा रे पंढरी, कबीरा कहे जग ये अंधा, राम नाम के साबुनसे, ऐसी लागी लगन, छेडू नको रे नंदलाला, चढता सुरज ही गीते-गवळण गायिली. क्रांती शिंदे हिने चंद्रभागेच्या तिरी हे भक्तीगीत सादर केले. स्तुती वाकोडे हिने यही वो दरबार है, दमा दम मस्त कलंदर ही गीते म्हटली. ऋषी साळवे आणि विजय शिंदे या दोघांनी ये तो सच है की भगवान है हे गीत सादर केले. भक्तिसंध्येचे सुरेख सूत्रसंचालन आणि निवेदन प्रा. डॉ. सुनिल कात्रे यांनी केले. भक्तिगीतांना
निखिल ताकभाते (तबला), नकुल कोळी (पखवाज), सुशील सकट (ढोलकी), हर्षवर्धन मोरे (किबोर्ड),
अविनाश लांडगे (बॅन्जो) आणि रवी भोसले (आटोपॅड) या कलाकारांनी वाद्यांची सुरेल साथ संगत केली.

‘पायी ज्योति’चे नेप्ती ग्रामस्थांच्यावतीने उत्साहात स्वागत

नगर – छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला ऊर्जा व प्रेरणा देणारा असून तो सर्वांपर्यंत घेऊन जाण्याचे काम शिवशंभो गर्जना या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. हनुमान तरुण मंडळ व बजरंग ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यापासून ते नेप्ती गावापर्यंत पायी ज्योत आणण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढली, गायक अभिजीत जाधव व अमोल जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन पटावरील पोवाडा सादर केला, त्याचबरोबर संभळ वादन करीत नागरिकांची मन जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, भाजपचे अक्षय कर्डिले, आकाश बेग आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले असून सर्वांना बरोबर घेऊन शेतकर्‍यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहे, युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श अंगीकारून समाजाप्रती चांगले काम उभे करावे, शिवशंभो गर्जना कार्यक्रमाच्या माध्यमातून पोवाडे सादर होत असताना अक्षरशा अंगावर शहारे निर्माण होत होते, असे मत सचिन जगताप यांनी व्यक्त केले.
समाजामध्ये वावरत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडावे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार युवकांना दिशा देणारे आहे असे मत अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले.

बायोटीन आवरणयुक्त सिटाग्लीपटिन नॅनोपार्टिकल्स : मधुमेह उपचारातील नवे संशोधन

नगर – औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात होणार्‍या संशोधनाअंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील औषध निर्माण महाविद्यालयाच्या फार्मासुटिस विभागातील प्रा. डॉ. गणेश रावसाहेब गोडगे आणि फार्मास्युटिकल केमिस्टरी विभागातील प्रा.मनीष अशोक रासकर तसेच त्याचे संशोधक विद्यार्थी कु. अंकिता माशलकर, कु. ऋतुजा जाधव आणि कु. अनुजा चोभे, श्रीकृष्ण
भराट व त्यांचे सहकारी संशोधकांच्या सिटाग्लीपटिन ह्या मधुमेहावरील औषधाचे पॉलीमेरिक नॅनोपार्टिकल्स तयार
करण्याच्या पद्धतीचा पेटंट भारत सरकार पेटंट कार्यालयचे मार्फत जाहीर झालेले आहे.

अलिकडच्या वर्षांत, नॅनोटेनॉलॉजी हे एक परिवर्तनकारी क्षेत्र म्हणून उदयास आले आहे, ज्याने आरोग्यसेवेसह विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणली आहे. नॅनोस्केल पातळीवर (मीटरच्या एक  अब्जवां भाग) साहित्य हाताळून, शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी उपचारांचे परिणाम सुधारण्यासाठी आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी शयतांचे क्षेत्र
उघडले आहे. पॉलिमरिक नॅनोपार्टिकल्ससारखे नॅनोपार्टिकल्स औषधांच्या रेणूंसाठी कार्यक्षम वाहक म्हणून काम करतात. हे नॅनोपार्टिकल्स सिटाग्लिप्टिनसारख्या उपचारात्मक घटकांना कॅप्सूलेट करू शकतात, त्यांना क्षय होण्यापासून
वाचवतात आणि इच्छित ठिकाणी नियंत्रित प्रकाशन सक्षम करतात. याव्यतिरिक्त, त्यांचा लहान आकार ऊतींमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करण्यास अनुमती देतो, ज्यामुळे विशिष्ट पेशी किंवा अवयवांना लक्ष्यित वितरण शय होते.

सध्याच्या संशोधनानुसार, मधुमेहाच्या उपचारासाठी वरील वैज्ञानिकांनी बायोटीनय्आवरणयुक्त सिटाग्लीपटिन  नॅनोपार्टिकल्स विकसित केले आहेत. या नवीन तंत्रज्ञानात पॉलिमरिक संरचनेचा समावेश असून, ते औषध वितरण प्रणाली
अधिक प्रभावी बनवते. सिटाग्लीपटिन हे डीपीपी-४ इनहिबिटर वर्गातील एक प्रसिद्ध औषध आहे, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. मात्र, त्याचा जैवउपलब्धता (bioavailability) आणि औषध प्रभावीपणा वाढवण्यासाठी वैज्ञानिकांनी नॅनोपार्टिकल फॉर्म्युलेशन विकसित केले आहे. या नॅनोपार्टिकल्सना बायोटीनचे विशेष आवरण
देण्यात आले आहे, ज्यामुळे ते शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात आणि लक्ष्यित पेशींवर अधिक प्रभावीपणे कार्य करतात. या नॅनोपार्टिकल्सच्या निर्मितीसाठी प्रगत पॉलिमरिक नॅनो-इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात
आला आहे. यामध्ये: पॉलिमरिक मिश्रणाची निवड (औषधाच्या स्थिरतेसाठी योग्य पॉलिमर वापरणे), बायोटीन कोटिंग प्रक्रिया (औषधाच्या शोषणक्षमता वाढवण्यासाठी बायोटीनचा समावेश), नॅनोपार्टिकल तयार करणे (अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रित कणाकार आणि वितरण प्रणाली विकसित करणे) अशा विविध प्रक्रियांचा समावेश आहे. या संशोधनाचे संभाव्य फायदे जसे कि उच्च जैवउपलब्धता  (औषध शरीरात अधिक वेगाने आणि प्रभावीपणे शोषले जाते), लक्ष्यित वितरण प्रणाली (केवळ आवश्यक पेशींवर परिणाम साधतो), प्रभावी रक्तसाखर नियंत्रण (मधुमेहाच्या उपचारासाठी
अधिक सुधारित प्रभाव), साइड इफेट्स कमी (नियंत्रित वितरण प्रणालीमुळे अवांछित दुष्परिणाम कमी होण्याची शयता). या तंत्रज्ञानामुळे मधुमेह उपचारांमध्ये नवा क्रांतिकारी बदल होण्याची शयता आहे. भविष्यात, याच संकल्पनेचा उपयोग
इतर ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये केला जाऊ शकतो, ज्यामुळे औषधोपचार अधिक प्रभावी आणि सुरक्षित होतील.

डॉ.गोडगे म्हणाले की बायोटीन-आवरणयुक्त सिटाग्लीपटिन नॅनोपार्टिकल्स ही नवीन संशोधनात्मक प्रगती आहे, जी मधुमेहाच्या उपचारासाठी मोठा गेम-चेंजर ठरू शकते. वैज्ञानिकांचा या तंत्रज्ञानाच्या पुढील चाचण्या आणि लिनिकल स्टडीजवर काम करण्याचा मानस असून, भविष्यात याचा व्यापक वापर अपेक्षित आहे. ही बातमी वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्वाची असून, मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी पर्याय उभारण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील, डायरेटर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) डॉ. पांडुरंग गायकवाड, डायरेटर (मेडिकल) डॉ. अभिजित दिवटे, डायरेटर टेनिकल डॉ.सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.पी.वाय.पवार, फार्मासुटिस विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.झेड.चेमटे ह्यांनी उल्लेखनीय
कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांचा मान सन्मान केला

सौ. गायत्री गायकवाड यांचे प्रतिपादन; अजिंय फिटनेस लबमध्ये आगळी वेगळी शिवजयंती साजरी

नगर – छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. लढवय्ये हिंदुधर्मरक्षक, आदर्श राज्य कारभाराची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली होती. युध्दामध्ये शत्रु पक्षाच्या ताब्यात आलेल्या महिलांचा मान-सन्मान साडी-चोळी भेट देऊन परत पाठविले. अशा या संस्कारक्षम, उदात्त विचारसरणीच्या महानायकाच्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्यास अभिवादन करणे. हे आमचे परमकर्तव्य आहे, असे भावोद्गार अजिंय फिटनेस लबच्या संचालिका सौ. गायत्री गायकवाड यांनी काढले.

सक्कर चौकातील अजिंय फिटनेस लबमध्ये व्यायाम व फिटनेससाठी येणार्‍या सुमारे  १०० महिलांनी ’श्री शिवजयंतीचे औचित्य साधुन आगळे वेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. केशरी फेटा परिधान करून या सर्वजणींनी श्री छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व छत्रपती शिवाजी महाराज यांची महाआरती केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.

सुरुवातीला सुरेश व अभिजित गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महिलांनी शिवजयंतीच्या केलेल्या आयोजनाचे  कौतुक केले. याप्रसंगी डॉ.निलोफर धानोरकर, डॉ.तेजश्री जुनागडे, डॉ.सौ.प्रज्ञा जोशी, प्रियांका पिसोटे, महिला प्रशिक्षक सुजाता पिल्ले, डॉ. मोहिनी येलुलकर, प्राजक्ता पालवे, लबचे जी. एम, योगिराज पाडोळे यांनी विचार व्यक्त करत छत्रपती
शिवरायांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

प्रथमच महिलांनी केलेल्या शिवजयंतीच्या उपक्रमाचे नियोजन हे गायत्री खुपसे, विणाताई जगताप, राजेश्वरी जाधव, श्रेया पवार, शिल्पा फुलसौंदर, विजया बिचकुले, ज्योती व तन्मयी गाली, शितल राजपुत, प्रिया मुनोत, कृतिका यादव, पलक नागपाल, इशिका कालडा, पायल व पुजा शिंगवी, श्रध्दा शिंदे, राजेंद्र सोनार, एम एच गायकवाड, वैभव दळवी, अ‍ॅड. संजय झव्हेरी, अजित व अभिमन्यु गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

अहिल्यानगर दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘भारतीय जैन संघटना’ योगदान देणार

नगर – राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण
व रूंदीकरण योजना राबविण्याचे निश्चित केले आहे. भारतीय जैन संघटना याकामी योगदान देणार असून अहिल्यानगर जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात येणार आहे. यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. ५ एप्रिलपर्यंत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी.गायसमुद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी दिघे, जलसंधारण अधिकारी शिवम डापकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आदेश चंगेडिया, बीजेएसचे अहिल्यानगर अध्यक्ष प्रशांत गांधी, अशोक पवार, मनसुखलाल चोरडिया, विश्वजीत गुगळे, संजय शिंगवी, अमोल पटवा, दर्शन गांधी, आनंद भंडारी, नरेश सुराणा, नयन पोखर्णा, संतोष गंगवाल, प्रसाद शहा, आदिनाथ पवार आदी उपस्थित होते.

आदेश चंगेडिया यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील ३६८ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून सर्व गावांचे प्रस्ताव मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु करण्यात
येणार आहे. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेने दुष्काळमुक्त
महाराष्ट्रासाठी सातत्याने योगदान दिले आहे. आताही अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन
संघटना सक्रिय सहभाग नोंदवणार आहे. तलावातील गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे.
त्यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही स्वयंसेवी संस्था किंवा ग्रामपंचायतीला
अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पध्दतीनुसार काम करता येईल. तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प, अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, दिव्यांग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून
निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाच्या या योजनेची गावागावात जागृती करणे, शेतकर्‍यांना गाळ नेण्यासाठी प्रोत्साहित करणे, मागणी अर्ज
तसेच गाळमुक्त धरण हे टेनॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना व महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज बीजेएस डिमांड पवर ऑनलाईन भरावा. बीजेएसचे जिल्हा प्रतिनिधी तसेच कार्यकर्ते स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाशी सहयोग करण्यास
सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरणय्रूंदीकरणासाठी त्वरित अर्ज भरून द्यावेत असे आवाहन जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी www.shiwaar.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.

तलवार घेवून फिरणार्‍याला बसस्थानक परिसरात पकडले

नगर – काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने धारदार तलवार शर्टाच्या पाठीमागे लपवून संशयित रित्या फिरणार्‍या तरुणास
कोतवाली पोलिसांनी पकडले आहे. त्याच्याकडील धारदार तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई नगर पुणे रोडवरील स्वास्तिक चौकाजवळील पुणे बस स्टँडच्या बाजूला असलेल्या काटवनात २० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

कोतवाली पोलीस शहरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की पुणे बस स्टँड परिसरात एक तरुण शर्टमध्ये पाठीमागील बाजूस धारदार शस्त्र लावून फिरत आहे. ही माहिती मिळताच पोलिस पथक तेथे गेले. पोलिसांना पाहताच तो पळू लागला असता त्यास तत्काळ झडप घालून पकडण्यात आले.त्याचे नाव सचिन चंद्रकांत काळे (वय २४, रा.सदाफुले वस्ती ता. जामखेड) असे असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तलवार जप्त केली.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पो. कॉ. सचिन लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन काळे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ /२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप
दराडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि योगिता कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस अंमलदार विशाल दळवी, संदीप पितळे, दशरथ थोरात, दिपक रोहकले, तानाजी पवार, अतुल कोतकर, शिरीष तरटे, सुरज कदम, संकेत धीवर,
सोमनाथ राऊत, राम हंडाळ आणि सचिन लोळगे यांनी केली आहे.

इन्स्टाग्रामवरुन ओळखीचा गैरफायदा घेत महिलेवर अत्याचार करणार्‍या दोघांना अटक

नगर – नगर तालुयातील देहरे गावातील महिलेशी इन्स्टाग्रामवर ओळख झाल्यानंतर तिला ब्लॅकमेल करून लैंगिक
अत्याचार करणार्‍या दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. तन्वीर शफीक शेख (वय २९, रा. हनुमान मंदिर, देहरे) आणि सोहेल रियाज शेख (वय २५, रा. देहरे) अशी त्यांची
नावे आहेत.

१४ मार्च रोजी पीडितेची इन्स्टाग्रामवरून तन्वीर शेख याच्याशी ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत तन्वीर याने पीडितेच्या बदनामीची व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिला संगमनेर व भंडारदरा येथे नेले.
तेथे इतर संशयित आरोपींच्या मदतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिला अकोले येथे सोडून दिले. या घटनेनंतर पीडितेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. मात्र गुन्हा घडल्यानंतर दोघे
संशयित आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या
मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, तुषार धाकराव, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संतोष
लोढे, अशोक लिपणे, बाळासाहेब नागरगोजे, आकाश काळे, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, ज्योती शिंदे आणि उमाकांत गावडे यांच्या दोन विशेष पथकांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक गोव्याकडे रवाना झाले. मात्र त्याआधीच आरोपी पुण्यात पळून गेले. त्यानंतर पुण्यातील चंदननगर परिसरात शोधमोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्कीलवाले जॉब ले जायेंगे

राहुल बांगर यांचे प्रतिपादन; पेमराज सारडा महाविद्यालय येथे महाज्योती तर्फे सॉफ्ट स्कील कोर्स सुरू

नगर – भविष्यात केवळ पदवीधारक नव्हे, तर रोजगारक्षम स्किल असलेले तरुण-तरुणीच चांगल्या नोकर्‍या मिळवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना महास्किल टेकचे संचालक आणि सहसंस्थापक राहुल बांगर यांनी केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात रोजगार मिळवण्यासाठी केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नसून कौशल्य विकास अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयात कार्यालयीन व्यवस्थापन आणि रोजगारक्षम कौशल्य या प्रशिक्षणपर अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ही संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांची असून, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण पदवी शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करून रोजगारक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या स्वायत्त संस्थेमार्फत ग्रेस एज्युनेट व महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोर्स राबविला जाणार आहे. विशेषतः इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटया जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यालयीन व्यवस्थापन, संवादकौशल्ये, डिजिटल कौशल्ये, नेतृत्वगुण, बायो डाटा तयार करणे आणि नोकरीसाठी आवश्यक असलेल्या विविध तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर गिरीश कुकरेजा यांच्या मार्गदर्शनात दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ होईल आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल. कार्यक्रमाच्या . अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.माहेश्वरी गावित होत्या. यावेळी महास्किल टेकचे संचालक व सहसंस्थापक राहुल बांगर, मास्टर ट्रेनर गिरीश कुकरेजा, उपप्राचार्य मिलिंद देशपांडे, संगणक विभागाचे प्रमुख  प्रा. राजेश पाटणी व प्राध्यापक उपस्थित होते. संस्थेचे मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा धर्माधिकारी मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा धर्माधिकारी यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. क्षितिजा जोशी यांनी केले. इतर महाविद्यालयांनी सदर मोफत प्रक्षीक्षणाचा  लाभ घेण्यासाठी संस्थेच्या ९०१११९३७०० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी महाज्योती, महास्किल टेक आणि ग्रेस एज्युनेट या संस्थांचे सहकार्य लाभले. सदर कौशल्य विकास अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाच्या पुढे जाऊन व्यावसायिक कौशल्यांची जोड देईल. त्यामुळे महाविद्यालयाच्या या पुढाकाराचे परिसरात विशेष कौतुक होत आहे.

बडतर्फ पोलिसाने केला उद्योजक दीपक परदेशी यांचा अपहरण करून खुन

पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या, १० कोटींच्या खंडणीसाठी खुन केल्याचे उघड

नगर – शहरातून २४ फेब्रुवारी पासून बेपत्ता असलेले उद्योजक दीपक लालसिंग परदेशी (वय ६८, जि.प. शाळेजवळ, परदेशी मळा, बोल्हेगाव) यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत निंबळक बायपास रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत १७ मार्चला आढळून आला आहे. त्यांचा एका बडतर्फ पोलिसाने त्याच्या एका सहकाऱ्याच्या मदतीने १० कोटींच्या खंडणीसाठी दोरीने गळा आवळून खुन केल्याचे पोलिस तपासात आढळून आले असून पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण बबन कोळपे (वय ३८, रा.विळद,ता.नगर) असे या बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून कोळपे याने त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (रा.ब्राम्हणी ता. राहुरी) याच्या मदतीने परदेशी यांचा खुन केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हंटले आहे की, उद्योजक दीपक लालसिंग परदेशी हे २४ फेब्रुवारी पासून बेपत्ता झाले होते. याबाबत २५ फेब्रुवारीला तोफखाना पोलिस ठाण्यात मिसिंग ची तक्रार दाखल झाली होती. त्याचा तपास पो.हे.कॉ. दिनेश मोरे यांचेकडे देण्यात आलेला होता. त्यानंतर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या आदेशानुसार मिसींगचा पुढील तपास ३ मार्च पासून आमचेकडे वर्ग केल्याने बेपत्ता परदेशी यांचा शोध घेणेकामी माझेसह स.पो.नि. उज्वलसिंग राजपुत, पो.हे.कॉ. सुरज वाबळे, पो.हे.कॉ. दिपक जाधव, पो. कॉ. सतिष त्रिभुवन असे करत होतो.

सी.सी.टी.व्ही फुटेजने पोहचवले आरोपीपर्यंत

बेपत्ता परदेशी यांचा शोध घेत असताना या पथकाने २४ फेब्रुवारी रोजीचे नायरा पेट्रोल पंप, बोल्हेगाव, एक घर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले होते. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करताना दिपक परदेशी हे त्यांचे मोटार सायकल वरुन घराच्या दिशेने जात असल्याचे दिसुन आले. त्यामुळे दिपक परदेशी यांच्या पाठोपाठ येणाऱ्या वाहनांची बारकाईने पाहणी करता दुपारी २.३० ते ३ वाजे दरम्यानचे नायरा पेट्रोल पंप येथील सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा इंडीका कार परदेशी यांच्या पाठोपाठ जात असल्याचे दिसुन आले. परंतु त्याच रोडवरील पुढील एका घराचे सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये पांढऱ्या रंगाची इंडीका कार दोन ते तीन मिनीटे उशीराने येत असल्याचे दिसुन आले. तसेच सदर कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोल्हेगाव येथील सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये संशयास्पद रितीने बोल्हेगाव गावठाण जाणाऱ्या रोडने गेल्याचे दिसुन आले. त्यामुळे सदर इंडीका कारचा अधिक शोध घेतला असता इंडीका कार ही विळद येथील असुन सदरची कार ही किरण बबन कोळपे हा वापरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

ही माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किरण बबन कोळपे व त्याचा साथिदार सागर गिताराम मोरे, या दोघांना तपासकामी ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल व बारकाईने चौकशी केल्यावर त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत मृतदेह निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जावून पाहणी केल्यावर त्यांना परदेशी यांचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला.

आरोपींनी असा केला परदेशी यांचा खुन

उद्योजक परदेशी यांची आरोपीकिरण कोळपेशी ओळख होती. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी कोळपे यास बोलावून त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे आहेत. ते वसूल करून देण्याचे काम सांगितले. याबाबत कोळपे याने त्याचा साथीदार सागर मोरे यास बोलावून घेत सांगितले. परंतु विळद गावातील लोकांकडून पैसे वसूल करणे अवघड असल्याने त्या दोघांनी परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून अधिक पैसे मिळवायचा प्लान केला. त्यानुसार २४ फेब्रुवारीला दोघांनी इंडिका कारने परदेशी यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्यांना त्यांच्या घराबाहेरून कार मध्ये बसवून निंबळक च्या दिशेने व पुढे नगर मनमाड महामार्गावर घेवून गेले. त्यावेळी कार कोळपे चालवत होता.

परदेशी त्याच्या शेजारी पुढील सीट वर बसलेले होते तर सागर मोरे पाठीमागे बसलेला होता. ठरल्याप्रमाणे कोळपे याने परदेशी यांना १० कोटी रुपये मागितले व मोरे यास त्यांचे हात पाठीमागून धरून ठेवायला लावले. त्यावेळी परदेशी हे झटापट करायला लागले असता, अगोदरच कार मध्ये असलेल्या नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. परदेशी यांनी झटापट करत कार चा दरवाजा उघडला असता कोळपे याने त्यांचे हात पाय दोरीने घट्ट बांधले. परदेशी यांनी पैसे न दिल्याने विळद घाटाजवळ सागर मोरे याने त्यांचा गळा दोरीने घट्ट आवळून त्यांना जीवे ठार मारले. त्यानंतर कोणाला कळू नये म्हणून त्याच दिवशी रात्री ८.३० च्या सुमारास दोघांनी परदेशी यांचा मृतदेह  निंबळक बायपास रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मोबाईल ट्रक मध्ये फेकला

परदेशी यांचा खुन करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर अगोदरच पोलिस खात्यात असलेल्या बडतर्फ किरण कोळपे याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी परदेशी यांचा मोबाईल सुरूच ठेवला. विळद घाटातून एमआयडीसी कडे येत असताना कोळपे याने त्यावरून काही मेसेज सेंड केले. त्यानंतर बोल्हेगाव फाट्याजवळ सागर मोरे याने परदेशी यांचा मोबाईल नगरच्या दिशेने चाललेल्या ट्रक मध्ये फेकला. तो ट्रक पुढे नागपूर येथे एमआयडीसीत गेला तेथे माल खाली करत असताना ट्रक चालकाला मोबाईल  दिसला. त्याने तो बंद केला व तेथून नगरला आल्यावर चालू केला. त्यावेळी पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले. पोलिसांनी त्या ट्रक चालकाला ताब्यात घेवून चौकशी केली. मात्र त्याच्या कडून काहीच माहिती मिळाली नव्हती.

मात्र तब्बल २२ दिवसांनी पोलिसांनी या खुनाचा छडा लावत बडतर्फ पोलिस असलेला आरोपी किरण कोळपे व त्याचा साथीदार सागर मोरे यांना बेड्या ठोकल्या. पोलिस उपनिरीक्षक अमोल गायधनी यांच्या फिर्यादी वरून दोघांवर खंडणीसाठी अपहरण आणि खुन असा गुन्हा दाखल केला आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात

परदेशी यांचा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या (डी कंपोस्ट) अवस्थेत असल्याने त्या कुजलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची अत्याधुनिक सुविधा नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात नसल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी दुपारी उशिरा तो पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान आरोपींनी ज्या ठिकाणी मृतदेह लपवून ठेवला होता. त्या निंबळक बायपासवर जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, तोफखान्याचे पो.नि. आनंद कोकरे यांच्या सह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. मयत परदेशी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, १ भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

आरोपी किरण कोळपे वर लागलाय मोक्का

आरोपी किरण बबन कोळपे हा २००८ मध्ये पोलिस दलात भरती झालेला होता. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. तर २०२३ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला मोक्का लावण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर पोलिस दलातून बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली आहे. या शिवाय मोक्काच्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळवून देणाऱ्या महिला वकिलाच्या घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्र असा १लाख ९२ हजार ७०० रूपयांचा ऐवज बळजबरीने नेल्याचा गुन्हाही कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल आहे. आता त्याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

तलवार घेवून फिरणार्‍यास मिस्किन मळा येथे पकडले

नगर – काहीतरी गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने धारदार
तलवार जवळ बाळगणार्‍या एकास तोफखाना पोलिसांनी मिस्किन
मळ्याजवळ ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार तलवार जप्त
केली. ही कारवाई १७ मार्च रोजी केली.
तोफखाना पोलीसांना माहिती मिळाली की, नगर शहरातील
मिस्कीन मळ्यातुन निसार हॉस्पीटलकडे जाणार्‍या रोडलगत असलेल्या
काटेरी झाडाजवळ एक इसम गुन्हा करण्याच्या हेतुने गुलाबी रंगाच्या
कपड्यामध्ये तलवार घेऊन बसलेला आहे. पोलिसांनी तत्काळ
ठिकाणी सापळा लावुन बंटी प्रकाश शिंदे, (वय ३३, रा.तारकपुर,
ख्रिश्चन कॉलनी, अ.नगर) यास पकडले. त्याच्याकडे एक तलवार
आढळून आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस अंमलदार भानुदास खेडकर, अहमद इनामदार, वसिमखान
पठाण, सुमित गवळी, सतिष त्रिभुवन यांनी केली आहे