चिचोंडी येथे साकारणार अर्हम् विज्जा सेंटर

नगर – आचार्य भगवंत श्री आनंदऋषिजी म सा या़ंचे शिष्य उपाध्याय प्रवर अर्हम् विज्जा प्रणेता प्रविणऋषिजी म सा
यांच्या प्रेरणा आणि संकल्पनेतुन निर्माण झालेल्या अर्हम् विज्जा केंद्रिय कार्यालयाचा निर्मितीचा भुमी शुध्दीकरण सोहळा जैन
विधी नुसार आचार्य भगवंत यांची जन्मभुमी चिचोंडी येथे उत्साहात झाला.

माजीमंत्री राजेन्द्र दर्डा व मागील वर्षिच्या ऐतिहासिक चातुर्मास समितीचे अध्यक्ष पंकज फुलफगर यांच्या हस्ते हा श्रेत्र शुध्दीकरण सोहळा उत्साहात चतुर्विध संघाच्या साक्षीने झाला . अर्हम् विज्जाच्या ट्रेनर आणी साधकाचे मोठे जाळे संपुर्ण देशात आणी विदेशात पसरले असुन हजारो ट्रेनर च्या माध्यमातून सर्व समाजाच्या नैतिक मुल्यांकन वृध्दी आणी आदर्श जीवनप्रणालीचे सुत्र वाचन आणी ध्यान साधनेच्या माध्यमातून केले जात असुन गर्भ संस्कार पासुन जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ची साधना आराधना अर्हम् विज्या च्या माध्यमातून शिकविले जाते हजारो ट्रेनर आणि लाखो साधकाच्या सोयीसाठी श्री गुरु आनंद फाऊंडेशन चिचोंडी च्या माध्यमातून हे भव्य  अर्हम् विज्जा सेटर उभे राहणार आहे

हा सोहळा उपाध्याय प्रवर प्रविणऋषिजी म सा  आदी ठाणा २ युवा तपस्वी श्री मुकेशमुनीजी म सा आदी ठाणा ५, महासती श्री सुनंदाजी म सा आदी ठाणा ६, महासती श्री आदर्शज्योतीजी म सा आदी ठाणा ३ महासती श्री ओजसदर्शनाजी म सा आदी ठाणा २ यांच्या पावन सान्निध्यता जैन विधी व जैन मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. या ठिकाणी उभ्या राहणार्‍या वास्तु
मध्ये कुठल्याही जीवाची हानी मोऊ नये अशी मंगल प्रार्थना व क्षमापना ही यावेळी सामुहिक पणे करण्यात आली. याप्रसंगी गुरु आनंद फाऊंडेशन व अर्हम् विज्जा चे पदाधिकारी अर्हम विज्जाचे साधक उपस्थित होत

ज्ञान मिळवताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर यश नक्कीच मिळत

नगर – ज्ञान मिळवताना जर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर यश नक्कीच मिळते, असा आत्मविश्वासदायक संदेश सुफी गायक पवन नाईक यांनी आयएमएस सिडसीतर्फे आयोजित द पॉवर ऑफ व्हॉइस – आवाजाच्या क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी या चार दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी दिला. ही कार्यशाळा २ ते ५ मे दरम्यान आयोजित
करण्यात आली असून, दररोज सकाळी ११ ते २ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत दोन सत्रांमध्ये कार्यशाळा पार पडत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना श्री. नाईक म्हणाले, माधुर्य, प्रसंगिकता, परिणामकारकता आणि आत्मविश्वास हे आवाजातील चार महत्त्वाचे घटक आहेत. त्यातील काही गुण जन्मसिद्ध असले तरीही, बहुतांश गुण मेहनतीने आत्मसात करावे लागतात. यासाठी योग्य गुरु, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो.

ते पुढे म्हणाले की, नगरसारख्या ठिकाणी वीणा दिघे यांच्या सारख्या तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या माध्यमातून अशी संधी उपलब्ध करून देणे, हे आयएमएसचे कौतुकास्पद पाऊल आहे. नगरकरांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा. सहसंचालक डॉ. विक्रम बार्नाबस यांनी श्री. नाईक यांचे स्वागत करताना कार्यशाळेच्या उद्देशावर प्रकाश टाकला व संस्थेची भूमिका उलगडून सांगितली.

कार्यशाळेचे मार्गदर्शन सौ. वीणा दिघे करत आहेत, ज्यांना आवाज क्षेत्रातील दोन दशकांचा अनुभव आहे. त्या प्रभावी बोलणे, संवाद कौशल्य, आवाज विकसन आणि व्यक्तिमत्व विकास यांवर विशेष भर देत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय एम एस सिडसीच्या समन्वयक डॉ. ऋचा तांडुलवाडकर यांनी केले. यावेळी डॉ. प्रणोती तेलोरे, डॉ. स्वाती बार्नाबस तसेच आय एम एसचा संपूर्ण शिक्षकवर्ग आणि वर्कशॉप मधील विद्यार्थी उपस्थित होते.
ही कार्यशाळा १८ वर्षांवरील सर्व इच्छुकांसाठी खुली असून, अभिनय, निवेदन, शिक्षण, प्रशिक्षण, मुलाखतीसाठी तयारी करणारे तसेच सार्वजनिक बोलणं आत्मसात करू इच्छिणारे व्यक्तींसाठी ही एक उत्तम संधी ठरत आहे.
नगरमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा प्रथमच आयोजित करण्यात आली असून, आवाजाच्या क्षेत्रात करिअर करू
इच्छिणार्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योगासाठी शेड व स्टेज उभारणीला प्रारंभ

नगर – भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योग व प्राणायामासाठी उभारल्या जाणार्‍या स्टेज व शेडच्या कामाचे भूमिपूजन अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक
विकास निधीतून १२ लाख ६० हजार रुपयांच्या खर्चातून होणार्‍या या कामाच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले
होते. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ
यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या शेड उभारणीमागे हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सातत्यपूर्ण पाठपुरावा असून, या शेडमुळे नागरिकांना पावसात व उन्हातही नियमित योग व प्राणायाम करता येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रतन मेहेत्रे, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, अभिजीत सपकाळ, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, महेश पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मन्नूशेठ झंवर, चुनीलाल झंवर, इंजि. गणेश भोसले, सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे, विकास
भिंगारदिवे, सुनील हळगावकर, सुनील शिंदे, अनिलराव सोळसे, जहीर सय्यद, सुधीर कपाळे, मनोहर दरवडे,
दीपक घोडके, दिलीप गुगळे, ईवान सपकाळ, जमान मुजावर, अशोक पराते, सरदारसिंग परदेशी, अशोकराव
लोंढे, शिरीषराव पोटे, अनिल हळगावकर, अविनाश जाधव, विलास आहेर, अविनाश पोतदार, प्रकाश देवळालीकर, शशिकांत पवार, अ‍ॅड. उद्धवराव चेमटे, सुहासराव देवराईकर, शेषराव पालवे, प्रशांत भिंगारदिवे, नामदेवराव जावळे, सिताराम परदेशी, बाळासाहेब झिंजे, नवनाथ खराडे, रामनाथ गर्जे, योगेश चौधरी, खान सर, रावसाहेब हंसे, देविदास गंडाळ, दशरथराव मुंडे, सचिन कस्तुरे, शिवांश शिंदे, कुमार धतुरे, सुवर्णाताई महागडे- भिंगारदिवे, परदेशी ताई, कॉन्ट्रॅटर निखिल शिंदे, अनिकेत हळगावकर, ओंकार हळगावकर, बापूसाहेब निकत, विलासराव तोतरे आदींसह हरदिनचे सदस्य व
नागरिक उपस्थित होते. विक्रांत मोरे म्हणाले की, उद्यानाचा कायापालट करण्यासाठी हरदिन मॉर्निंग ग्रुपचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. उद्यानातील विविध समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. स्टेज व शेड उभारणीचे काम देखील या ग्रुपच्या पाठपुराव्याने आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. ग्रुपच्या वतीने निरोगी आरोग्यासाठी सुरु असलेली आरोग्य चळवळ कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ यांनी ग्रुपच्या
रौप्य महोत्सवी वर्षात हे कार्य पूर्ण होत असल्याचे समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, योग आणि प्राणायामासाठी
आवश्यक असलेली भौतिक सुविधा उपलब्ध होत असल्याने ही आरोग्य चळवळ अधिक जोमात पुढे जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रारंभी गौतम बुद्धांना अभिवादन करून परिसराची स्वच्छता करण्यात आली. सचिन चोपडा, संजय भिंगारदिवे व विकास भिंगारदिवे यांनी देखील हरदिनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या विविध सामाजिक, आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी केले. ओंकार हळगावकर व निखिल शिंदे यांनी आभार मानले.

रोटरी लब सेंट्रलच्या पुढाकाराने कामगार दिननिमित्त अग्निशमन दलासाठी दंततपासणी शिबिराचे आयोजन

नगर – रोटरी लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी अहिल्यानगर अग्निशमन केंद्र येथे दलातील जवानांसाठी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रतिबंध हा उपचारांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ या उद्दिष्टाने हे शिबिर घेण्यात आले असून, या शिबिरात एकूण ३५ अग्निशमन दलातील जवानांची तपासणी करण्यात
आली.

याचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष रो. डॉ. कुणाल कोल्हे यांच्या हस्ते तर त्यांच्या व त्यांच्या टीम मार्फत तपासणी करण्यात आले. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, माजी प्रांतपाल रो. शिरीष रयाते, रो. अमर गुरप, राजीव गुजर, मनीष बोरा, इश्वर बोरा, हरीश नय्यर, विनोद बोरा व चेतन अमरापूरकर, अक्षय आव्हाड, फायरमन भरत पडगे, शुभम गावडे, सूरज पोकळे आदि सदस्य उपस्थित होते.

श्री. मिसाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जसे अग्निशमन व्यवस्थेच्या नियमित देखभालीअभावी गंभीर घटनांना तोंड द्यावे लागते, तसेच आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्ष केल्यास त्रास वाढतो. नुकत्याच पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद येथे झालेल्या आगीच्या घटनांमधून याचे भयावह चित्र समोर आले आहे. अग्निशमन यंत्रणा असूनही तिच्या देखभालीकडे दुर्लक्ष
केल्याने गंभीर परिणाम उद्भवतात. हाच संदेश आरोग्यविषयक तपासण्यांमधूनही मिळतो. डॉ. कुणाल कोल्हे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, फायर फायटर्स हे समाजासाठी अहोरात्र कार्य करणारे नायक असून, त्यांचे आरोग्य उत्तम राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आरोग्यासंबंधी नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय हेच आजच्या काळात
अत्यंत आवश्यक झाले आहेत. ज्या प्रकारे अग्निशमन यंत्रणा वेळेवर कार्यान्वित राहण्यासाठी तपासणी आणि देखभाल आवश्यक असते, त्याच प्रकारे आपल्या शरीराचीही काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, आपण अनेक वेळा आरोग्याबाबत गाफील राहतो आणि आजार बळावल्यावरच उपचार घेतो. हे चित्र बदलणे आवश्यक आहे. त्यामुळेच रोटरी लब ऑफ अहमदनगर सेंट्रलने या दंत तपासणी शिबिराचा उपक्रम हाती घेतला असून, हे केवळ तपासणीपुरते
मर्यादित न राहता आरोग्यविषयी जागरूकतेचा संदेश देणारे पाऊल आहे.

या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख रो. गिरीश मुळे यांनी योगदान दिले. यावेळी रो. राजीव गुजर यांनी सांगितले की, फायर सेफ्टी आणि जनजागृतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी रोटरी कटीबद्ध असून, भविष्यातही असे उपक्रम
सातत्याने राबवले जातील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोटरी सेंट्रल चे रो. अमर गुरप यांनी केले.

शाळेत विद्यार्थ्यांना एआय रोबोटिकचे धडे दिले जाणार

आनंद कटारिया यांचे प्रतिपादन; जे.एस.एस. गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात, छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास केला जिवंत

नगर – डांगे पॅटर्नच्या आधारे शाळेची वाटचाल सुरू असून, २५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा आज ५०० हून  अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत पुढील वर्षीपासून विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिसचे
शिक्षण देण्याची योजना असून, अद्ययावत कॉम्प्युटर लॅबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असे संचालक आनंद कटारिया यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत सांगितले. केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी (जे.एस.एस.) गुरुकुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक सोहळा सोनेवाडी, अरणगाव रोडवरील शाळेच्या नव्या वास्तूमध्ये उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शरद ठुबे, गुलाब कटारिया, अलका भळगट, शाळेचे संचालक आनंद  टारिया, प्राचार्या निकिता कटारिया यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्या निकिता कटारिया म्हणाल्या की, शाळेच्या नव्या इमारतीसह विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यांना दर्जेदार शिक्षण, संस्कार, आहार व व्यायामाचे प्रशिक्षण यावरही विशेष भर दिला जात आहे. योग, प्राणायाम आणि शिवकालीन खेळांमधून विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा प्रयत्न होत आहे. ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून देण्याचे उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक शरद ठुबे यांनी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचे व शालेय विविध उपक्रमाचे कौतुक केले.

नवरस या संकल्पनेवर आधारित विविध नृत्य, गीतांनी स्नेहसंमेलनात रंग भरला. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्याचे सादरीकरण केले. धार्मिक व मराठी गीतांमधून समहाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित नाटिकेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या पिढीच्या समस्यांकडे प्रभावीपणे लक्ष वेधले. विद्यार्थी अभ्यास सोडून पब्जी, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअप, यूट्यूब, फ्री फायर गेमच्या जगात अडकून स्वत:चे भवितव्य कसे उध्वस्त करतात? याची गंभीरता मांडण्यात
आली. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील पराक्रमाचा इतिहास विद्यार्थ्यांनी जीवंत करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी मराठी व हिंदी गीतांवर बहारदार नृत्य सादर करत एकच धमाल केली.

स्टुडंट ऑफ द इयर म्हणून प्रियल उपाध्याय (इयत्ता ५ वी) व देव सत्रे (इयत्ता ४ थी) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या आहारासाठी वर्षभर प्रयत्न करणार्‍या ४० महिला पालकांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमास
उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा पाठक व हर्षा कार्ले यांनी केले. अनुपमा तोरडमल व वैशाली देशमुख यांनी आभार मानले.

ग्रामस्थांनी रास्ता रोकोचा इशारा देताच सुरु झाले रस्त्याचे रखडलेले काम

नगर – नगर तालुयातील कौडगाव ते खांडके रस्त्याचे काम मंजूर झालेले असून या कामाची निविदा प्रसिद्ध होवून  केदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आलेले आहेत. मात्र ठेकेदाराकडून गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रखडवले गेले होते. या संदर्भात सरपंच आणि ग्रामस्थांनी १ मे महाराष्ट्र दिनी नगर – पाथर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम विभागाला दिल्यानंतर सदर काम ठेकेदाराने तातडीने सुरु केले.

नगर तालुयातील कौडगाव ते खांडके रस्त्याच्या कामासाठी खांडके गावचे सरपंच किरण चेमटे यांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला होता. मात्र बांधकाम विभागासह संबंधित ठेकेदाराने या पत्रव्यवहाराकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या खांडके ग्रामस्थांनी ३ एप्रिल रोजी कौडगाव येथे नगर पाथर्डी रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी १५ एप्रिलपर्यंत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र काम सुरु झाले नाही. त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी १६ एप्रिल रोजी बांधकाम
विभागाच्या कार्यालयात गेले. तेथील अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यावेळी २१ एप्रिलपर्यंत काम सुरु करण्याचे आश्वासन दिले
गेले. तेही पाळले नाही त्यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा १ मे २०२५ रोजी शेतकरी व जनावरासह कौडगाव येथे नगर-पाथर्डी रोडवर
रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे बांधकाम विभागाला खडबडून जाग आली व त्यांनी ठेकेदाराला सक्त
सूचना देत काम सुरु करण्यास सांगितले. त्यामुळे ठेकेदाराने तातडीने हालचाली करत काम सुरु केले आहे.

यावेळी सरपंच किरण चेमटे, ग्रामसेवक भाऊसाहेब पालवे, तंटा मुक्ती अध्यक्ष भगवान ठोंबे, शाळा व्यवस्थापन समिती
अध्यक्ष सोमनाथ चेमटे, सुनील टांगळ, रावसाहेब साबळे, माजी सरपंच सुखदेव टांगळ, किशोर गाडे, दत्तू चव्हाण, चेअरमन बाळासाहेब चेमटे, व्हा. चेअरमन संतोष मचे, इस्माईल पठाण, उमाजी टांगळ, ऋतिक राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री संत शिरोमणी गोरोबा काका समाधी सोहळा उत्साहात

नगर – श्री संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी येथील संत गोरोबा काका समाधी सोहळा मोठ्या  त्साहात संपन्न झाला. यावेळी दरवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तसेच  रक्तदान शिबिर, महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या बक्षिस म्हणून ४३ इंच टीव्ही असे अनेक बक्षिसे देण्यात आले, तसेच समाजप्रबोधन भारुड राष्ट्रीय भारुडकार ह.भ.प. हमीद सय्यद महाराज यांचे भारुडचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता तसेच समाधी सोहळ्याचे दिवशी अभिषेक व महाआरती तसेच माजी
आमदार अरुण काका जगताप यांच्या तब्येतीची सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली व संध्याकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते व सर्व भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती औघडपीर तैमीनाथजी महाराज व मस्तनाथजी महाराज यांनी भेट दिली.

यावेळी सर्व मंडळाचेवतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडाळाचे अध्यक्ष जयकुमार सुसरे उपाध्यक्ष, राहुल देवतरसे सचिव, नितीन राजापुरे खजिनदार, अमित देवतरसे, अजिंय देवतरसे, विनायक सुसरे, रोहित देवतरसे, सागर राजापुरे, सार्थक राजापुरे, अक्षय राजापुरे, किरण कदम, आकाश देवतरसे, आदित्य सुसरे, पृथ्वी सुसरे, शामभाऊ सुसरे, अंकित देवतरसे, अतुल देवतरसे, दिपक राजापुरे, अमोल राजापुरे, राजू राजापूरे, अनिल राजापुरे, मयूरेश दळे, स्वप्निल दळे, युवराज देवतरसे, अथर्व मुरकुटे, निलेश दुसा, संदीप सुसरे शुभम घोडे, सुरव शहाणे, अनिल पाटील, प्रेम दळवी व सर्व महिलावर्ग उपस्थित होते.

 

पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून व जाळून पहेलगाम घटनेचा सर्वपक्षियांनी केला ‘निषेध

नगर – पाकिस्तानी अतिरेयांनी पहेलगाम येथे गोळीबार करून हत्या केलेल्या
हिंदू बंधू भगिनींना श्रद्धांजली वाहण्यासाठी भिंगारच्या सर्व पक्षाच्यावतीने सोमवारी
सकाळी बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या आवाहनाला भिंगार मधील सर्व
बाजारपेठेमधील व्यापारी, दुकानदार, छोटे-मोठे व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद
देत घटनेचा निषेध केला. यावेळी भिंगार वेशीजवळ झालेल्या आंदोलनात सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांनी
पाकिस्तान मुर्दाबाद… पाकिस्तान मुर्दाबाद…, भारतमाता की जय…., जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.
तसेच पाकिस्तानचा झेंडा लाखो लोकांच्या पायदळी तुडवला जावा यासाठी भर रस्त्यात चिटकवण्यात
आला. तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेधही करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक
आर. के. दहिफळे यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले.
भिंगार बंद आंदोलनात प्रकाश लुणिया, संभाजी भिंगारदिवे, सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, संजय
सपकाळ, विष्णू घुले, सचिन जाधव, नामदेव लंगोटे, रवींद्र लालबोंद्रे, संतोष बोबडे, शाम वाघस्कर
आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केले होते, भारताचा मुकुटमणी असलेल्या काश्मीरम
धील पहेलगाम येथे पाकिस्तानी धर्मांध अतिरेयांनी फक्त हिंदू धर्माच्या पर्यटकांनाच धर्म विचारून बेछूट
गोळीबार करून त्यांची अमानुषपणे हत्या केली. याचा आम्ही सर्व भिंगारवासीय निषेध करीत आहोत.
आमची केंद्र व राज्य सरकारकडे अशी मागणी आहे की आपण या धर्मांध पाकिस्तानी
अतिरेयांना सहारा व आश्रय देऊन त्यांना पैसे पुरवणार्‍या देशद्रोही लोकांचा शोध
घेऊन त्यांना यमसदनी पाठवावे. शहरातील पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांचा
शोध घेऊन त्यांचीही भारतातून हकालपट्टी करावी. शहरातील ज्या ज्या ठिकाणी सरकारी सेतू कार्यालाये
व पुरवठा अधिकारी अशा देशद्रोही नागरिकांना भारतीयत्वचे दाखले देत आहेत त्यांच्यावरही कठोर
कारवाई करावी. आपल्या भिंगार पोलीस स्टेशन हद्दीत रोहिंगे, बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याचे मोहीम
त्वरित हाती घ्यावी आणि त्यांना भारताबाहेर ढकलून देण्यात यावे.
आम्ही संपूर्ण भिंगारवासी भारत सरकारच्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांबरोबर आहोत. या घटनेचा निषेध
करण्यासाठी २८ एप्रिल रोजी सकाळी मारुती मंदिर येथे सर्व भिंगारवासी सामूहिक हनुमान चालीसा
पाठ करून भिंगार बंदचे आवाहन केले. संध्याकाळी ठीक ७.३० पूर्ण भिंगार शहरातील सर्व नागरिक
दोन मिनिटे आपल्या घरातील व दुकानातील लाईट बंद करून एक पणती श्रद्धांजलीसाठी लाऊन
काश्मीर येथे मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
यावेळी निलेश साठे, प्रज्योत लुणिया, राजेंद्र फुलारे, बापू लीपणे, नाना मोरे, सुदाम लांडे,
लॉरेन स्वामी, रुपेश भंडारी, श्लोक भंडारी, सोमनाथ आव्हाड आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते
उपस्थित होते.

शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग ‘मनपा स्वच्छते’चा पोलखोल

कचरा थेट महापालिका कार्यालयात आणून टाकणार : तायगा शिंदे

नगर – महापालिकेच्या स्वच्छता अभियानाची केवळ दिखाऊ मोहीम सुरू असून प्रत्यक्षात शहरात सर्वत्र कचर्‍याचे ढीग साचले आहेत. दररोज घरासमोर येणारी घंटागाडी ८ ते १० दिवस गायब राहते, त्यामुळे नागरिकांना घरातील कचरा साठवून ठेवावा लागतो किंवा नाईलाजाने रस्त्यावर टाकावा लागतो. परिणामी शहरभर दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या थेटसमजून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, मी प्रत्येक घरी जाऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकणार असून कचर्‍याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पोलखोल करणार आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका महापालिकेने २ वर्षांपूर्वी दिला असला तरी प्रत्यक्षात ठरलेल्या अटींप्रमाणे काम होत नाही.
घनकचरा संकलनात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून महापालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात संगनम
ताने भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. शहरातील कचरा उचलला जात नसतानाही केवळ कागदोपत्री वजन दाखवले जात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. या अस्वच्छतेमुळे शहरात साथीचे आजार
पसरण्याची शयता वाढली आहे. जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून दररोज नियमित घंटागाडी चालू केली नाही, तर नागरिकांनी गोळा केलेला कचरा थेट महापालिकेच्या कार्यालयात आणून टाकण्याचा इशारा, तायगा शिंदे यांनी दिला.

मिरची मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गोविंद मनियार यांची निवड

नगर – अहमदनगर मिरची मर्चन्ट नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अ.नगर या संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या सन २०२५ – २०२६ ते २०२६- २०२७ या सालाकरीता बिनविरोध निवडणूक झाल्याचे प्राधिकृत अधिकारी व्ही. पी.
आळकुटे यांनी घोषित केले. प्राधिकृत अधिकारी व्ही.पी. आळकुटे यांच्या अध्यक्षतेखाली सी. ए. गोविंद गोपाळ मनियार यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. तर सौ. प्रिया नरेश फिरोदिया यांची व्हा.चेअरमनपदी निवड करण्यात आली.
चेअरमनपदी सी.ए. गोविंद गोपाळ मनियार यांचे नाव परेश जगन्नाथ बजाज यांनी सुचविले तर अनुमोदन सी.ए. किरण मनियार यांनी दिले तसेच व्हा.चेअरमनपदी सौ. प्रियानरेश फिरोदिया यांचे नाव अशोक शांतिलाल भंडारी यांनी सुचविले तर
सी.ए. किरण मनियार यांनी अनुमोदन दिले. प्राधिकृत अधिकारी व्ही. पी. आळकुटे यांचा सत्कार सी.ए. गोविंद गोपाळ
मनियार यांनी केला.तसेच नुतन चेअरमन सी. ए. गोविंद गोपाळ मनियार यांचा सत्कार सी. ए. किरण मनियार यांनी
व व्हा.चेअरमन सौ.प्रिया नरेश फिरोदिया यांचा सत्कार अशोक शांतिलाल भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे माजी चेअरमन राजेश गुगळे यांचा सत्कार परेश जगन्नाथ बजाज यांनी केला