मुखविलास लाडू

0
65

मुखविलास लाडू

साहित्य : ३ वाट्या हरभरा डाळ,
३ कप दूध, दीड ते २ वाट्या साजूक तूप,
दीड वाटी खवा, अर्धी वाटी काजू-बेदाणे, १
लहान चमचा जाडसर कुटलेली वेलदोडा पूड,
४ वाट्या साखर, पाव चमचा केशर.
कृति : हरभरा डाळ स्वच्छ धुवून
दुधात भिजत घालावी. ४ तासानंतर मिसरवर
वाटून घ्यावी. कढईत तूप तापवून मंद आचेवर
वाटलेली डाळ मोकळी होईपर्यंत परतावी.
गुलाबीसर झाली आणि तूप सुटू लागलं की
काढून घेऊन खवा परतावा. डाळ, खवा, काजू
आणि बेदाणे एकत्र करावे. नंतर साखरेत १
वाटी पाणी घालून ३ तारी पाक करावा. खाली
उतरवून त्यात केशर-वेलदोडा आणि एकत्र
केलेलं साहित्य घालून मिश्रण आळलं की लाडू
वळावे. हे लाडू जरा ओलसर असतात. त्यामुळं
जेवणात पक्वान्न म्हणून चांगले लागतात. मात्र,
२-३ दिवसापेक्षा जास्त टिकत नाहीत.