थंडीमध्ये जव खाणे फायदेशीर

0
31

थंडीमध्ये जव खाणे फायदेशीर
बार्ली/जव – बार्ली वा जवाला
‘धान्यराज’ किंवा संस्कृतमध्ये ‘यव’ असेही
संबोधले जाते. उत्तर भारतात थंडी खूप असते
आणि तिथे हे धान्यही पुष्कळ प्रमाणात खातात,
पण आपल्याकडे ते फारसे खाल्ले जात नाही.
फार तर ‘बार्ली वॉटर’ किंवा ‘पफ बार्ली’
आपल्याला माहिती असते. जव हे बलकारी,
पचायला जड (गुरू) व मधुर रसात्मक आहे.
थंडीत ज्यांना सारखा सर्दी-खोकला होतो,
नाक वाहते अशांना आजारांना प्रतिबंध
करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करता
येईल. थंडीत शरीर व स्नायू आखडण्याचा
त्रासही अनेकांना होतो. त्यावरही जव आहारात
असण्याचा प्रतिबंधक म्हणून उपयोग होतो.
जवात ‘ब’ जीवनसत्त्व व आवश्यक अमिनो
आम्ले भरपूर असून, ते पौष्टिक आहे.