वटपौर्णिमा, शके १९४६ क्रोधीनाम
संवत्सर, ज्येष्ठ शुलपक्ष, ज्येष्ठा १८|१९
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६
वा. २८ मि.
राशिभविष्य
मेष : सुखद यात्रा योग. विद्यार्थिनी चांगला अभ्यास करतील. घरात शांतता राहील. मान-सन्मान व यश प्राप्त होईल. कामात गुप्तता राखा.
वृषभ : मित्रांचा सहयोग मिळणार नाही. व्यापार मध्यम राहील. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शयता. संबंध
बिघडतील. खर्चाची चिंता राहील. वैचारिक असंतोष राहील.
मिथुन : घरातील वातावरण निराशाजनक असल्याने उत्साहात कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामे अपुरी राहतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. निश्चितेने काम करा. बातमी मिळेल.
कर्क : प्रिय व्यक्तिची भेट घडेल. कामात उन्नति होईल. स्फूर्ति राहील. धार्मिक गोष्टीत रस घ्याल. व्यक्तिगत अडचण राहू
शकते. पारिवारिक वाद विकोपास जातील. सांगण्यावर विश्वास ठेवू नका.
सिंह : एखादे कार्य घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. जबाबदारीची कामे पडतील. खासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल.
कन्या : नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा. आनंदाची बातमी मिळण्याची शयता आहे. सहयोग मिळेल. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा.
तूळ : पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. सांगण्यावर विश्वास ठेवू नका. आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील.
वृश्चिक : महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल. गुंतवणूकीतून लाभ होण्याची शयता. वेळ सत्कारणी लागेल. योजनेचे क्रियान्वयन आवश्यक.
धनु : पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल.
मकर : वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. लेखन कार्यास प्रगति होईल. अनिश्चितता वाटेल. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. सतत परिश्रमाने आर्थिक लाभ होतील.
कुंभ : जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्या वाढतील.
मीन : आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील. आरोग्य नरम-गरम राहील. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. पारिवारिकदृष्ट्या वेळ सामान्य. आपली स्थिति, वास्तविकता वाढेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर