माणसाच्या डोयाचं वजन किती असतं?
माणसाच्या डोयाचं वजन किती असतं? हे तो माणूस किती जाडा किंवा भारदस्त आहे, यावर नाही का अवलंबून असणार, असं आपल्याला वाटेल; पण ते तितकंसं खरं नाही. कारण माणसाचं वजन जेव्हा वाढत जातं तेव्हा ते बहुतांश त्याच्या धडाचं असतं. त्यातही पोटाच्या आसपासच्या भागाचं वजनच जास्त वाढत जातं. पोट, मांड्या, छाती, हात या अवयवांवर चरबीचे थर जमत जातात आणि वजन वाढत जातं. ज्यावेळी अशी स्थूल व्यक्ती व्यायाम आणि मिताहार यांच्या मदतीनं आपलं वजन कमी करते, सडपातळ होते, तेव्हा तिच्या डोयाच्या आकारात तसाच लक्षणीय फरक पडल्याचं दिसतं का? त्यामुळे प्रौढ व्यक्तीच्या डोयाचं वजन फारसं वेगवेगळं नसतं, यात शंका नाही. लहान मूल आणि प्रौढ व्यती यांच्या डोयाचं वजन यांच्यात लक्षणीय फरक आढळून येईल, कारण त्या मुलाची संपूर्ण वाढ झालेली नसते. त्याच्या सगळ्याच शरीराची प्रमाणबद्ध वाढ होते. त्यामुळे डोयाचा आकार आणि त्याचं वजनही वाढत जातं. तरीही नुसत्याच डोयाचं वजन कसं करायचं? असा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहील. कारण, धडापासून फक्त डोकं अलग करून त्याचं वजन कसं करायचं? फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात गिलोटीननं शिरच्छेद करण्यात येत असे. त्या वेळी अशा धडापासून अलग होऊन पडलेल्या डोयांचं वजन केलं गेलं असतं तर कदाचित त्याविषयीची अचूक माहिती देण्याचं श्रेय त्या राज्यक्रांतीच्या प्रणेत्यांना देता आलं असतं. आता ते द्यायला हवं ‘न्यू सायंटिस्ट’ या नियतकालिकाच्या संपादकवर्गाला, कारण त्यांनी डोयाचं वजन टक्कल पडलेल्या एकाची या प्रयोगासाठी निवड केली. त्यानंतर त्यांनी एक बादली पाण्यानं काठोकाठ भरली. त्या पाण्याचं तापमान जवळजवळ शून्य अंश सेल्सिअस असेल; पण तरीही ते पाणी गोठलेलं नसेल, याची खातरजमा करून घेतली. ती बादली त्यांनी एका भल्या मोठ्या परातीत ठेवली. त्यानंतर त्या सहकार्याचं डोकं उलटं धरून हनुवटीपर्यंत पुरतं बुडेल अशी व्यवस्था केली. त्या सहकार्याला आपला श्वास रोखून धरायला सांगण्यात आलं होतं. त्याचं डोकं पाण्यात बुडल्याबरोबर त्या डोयाच्या आकारमानाइतकं बादलीतलं पाणी बाजूला सारलं गेलं. हे आर्किमिडीजच्या तत्वानुसारच होतं. बादलीतून बाहेर पडलेलं पाणी परातीत साठवल्यामुळे ते गोळा करून त्याचं आकारमान मोजलं गेलं. ते त्या डोयाच्या आकारमानाइतकं असल्यानं त्याचं मोजमाप मिळालं. आता डोयात कवटीचा भाग सोडल्यास मुख्यत्वे मेंदुसारखा मऊ अवयवच असतो. त्यातही पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे डोयाची घनताही शून्य अंश सेल्सियस इतकं तापमान असलेल्या पाण्याइतकीच असावी, हे गृहीत धरून त्यांनी डोयाचं वजन गणितानं शोधून काढलं. ते ४.२५ किलोग्रॅम भरलं.