त्वचेच्या सौंदर्यासाठी
* त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठी
त्वचेला मालिश करतात. यासाठी क्रीम किंवा
तेल वापरावे असे नाही, तर ऋतूप्रमाणे त्यात
बदल करावा. उन्हाळ्यात टाल्कम पावडरमध्ये
टोमॅटो, काकडी किंवा संत्रे यातील एकाचा
रस मिसळून या पेस्टने चेहरा, गळा, मान
याला चांगले मालिश करा.
* नियमितपणे टोमॅटोचा ताजा रस
प्यावा आणि तो चेहर्यावर चोळावा. दहा
मिनिटांनी चेहरा धुवावा. यामुळे त्वचेचे आरोग्य
सुधारण्यास मदत होते.