डाळ मेथ्या

0
102

डाळ मेथ्या

साहित्य : एक वाटी मेथी दाणे,
पाच वाट्या तूर डाळ, पंधरा-वीस लाल
सुया मिरच्या, अर्धी वाटी कढीलिंबाची पानं.
पंचवीस-तीस लसूण पाकळ्या ठेचून, एक
वाटी सुकं खोबरं, चवीला तिखट, मीठ, गूळ,
चिंचेचा कोळ, दोन मोठे चमचे गोडा मसाला,
फोडणीसाठी पाऊण वाटी तेल, मोहरी, हिंग,
हळद, सजावटीसाठी कोथिंबीर.
तयारी : मेथी दाणे रात्रभर पाण्यात
भिजत घालावे. सकाळी चाळणीत उपसून
फडयात बांधून ठेवावे. सात-आठ तासात
मोड येतील. तूर डाळ दोन-तीन तास भिजत
घालावी. सुकं खोबरं किसून, भाजून पूड
करावी.
कृती : भिजवलेली तूर डाळ चाळणीत
उपसावी. थोडासा पाण्याचा हपका मारून
मेथ्यांसकट कुकरमध्ये शिजवावी. शिजताना
थोडं मीठ घालावं. डाळ शिजेल तरीही संबंध
दाणा राहील. तेलाची फोडणी करून त्यात
लसूण, मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला
कढीलिंब घालून परतून घ्यावं आणि चारय्पाच वाट्या पाणी घालावं. त्यात चवीप्रमाणे
तिखट, थोडं मीठ, चिंच, गूळ, मसाला, खोबरं
घालून उकळवावं. डाळ घालून एक उकळी
द्यावी आणि खाली उतरवावं. अंगाबरोबर रस
असावा. कोथिंबीर घालावी.