अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी उपाय

अ‍ॅसिडीटी टाळण्यासाठी उपाय
उपाशीपोटी राहण्याची सवय टाळा.
आजच्या जीवनात पोट रिकामे ठेवून दिवसभर
कामात व्यस्त राहणार्‍या व्यक्तींना हा त्रास
खात्रीने होतो. जेवणाच्या वेळा ठराविक
असाव्यात. दर चार तासांनी थोडे थोडे खावे.
रात्री जेवल्यावर अर्धा तास शतपावली
करावी. चालण्याचा व्यायाम करून वजन
आणि विशेषत: पोट कमी करावे. आहारामध्ये
जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ
खाणे टाळा.

पाटवड्या

पाटवड्या

साहित्य : चार वाट्या जाडसर बेसन,
अर्धी वाटी सोयाबीन किंवा ओटस्चं पीठ, एक
वाटी आंबट ताक, तीन वाट्या पाणी, दोन
वाट्या गाजराचा कीस, दहा-बारा हिरव्या
मिरच्या, वीस-पंचवीस कढीलिंबाची पाने,
एक मोठा चमचा ओवा, तीन मोठे चमचे तीळ,
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी
वाटी बे्रडक्रम्स, चवीला मीठ, हवे असल्यास
तिखट, एक वाटी तेल फोडणीसाठी, मोहरी,
हिंग, हळद.
कृती : बेसनात ताक, पाणी, तिखट,
मीठ, ओवा, दोन मोठे चमचे तीळ मिसळावे.
हिरवी मिरची आणि कढीलिंब यांचा ठेचा
करावा. फोडणी करून त्यात ठेचा आणि
गाजराचा कीस परतावा. त्यात बेसनाचे मिश्रण
घालून ढवळावे आणि झाकण ठेवून वाफ
आणावी. मिश्रण घट्ट होईल. त्यात कोथिंबीर
घालून गोळा करावा. थाळीला तेलाचा हात
लावावा आणि त्यात हे मिश्रण गरम असतानाच
थापावे. वर तीळ पसरावे. गार झाल्यावर
चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारख्या मोठ्या
वड्या पाडाव्या. पाटवड्या आदल्या दिवशी
करून ठेवता येतात. ऐनवेळी ब्रेड क्रम्समध्ये
घोळवून, तव्यावर थोड्या तेलात परताव्या
किंवा तेलाचा हात लावून ओव्हनमध्ये १८०
सें. वर लालसर होईपर्यंत भाजाव्या.

कौटुंबिक बांधिलकीसाठी

कौटुंबिक बांधिलकीसाठी
* बेडरुमच्या दक्षिणेकडील भिंतीवर
पती-पत्नीचा किंवा तुमच्या कुटुंबाचा गु्रप
फोटो आवर्जुन लावावा. या योगे कुटुंबातील
सर्व व्यती एकमेकांशी सदैव प्रेमरज्जूंनी
बांधलेल्या राहतील.
* डबलबेडवरची गादी अखंड असावी.
त्यावरील बेडशीट व पिलोकव्हरची रंगसंगती
दोघांचेही चित्त उल्हासित करणारी असावी.

सौंदर्य

ताज्या लिंबाचा रस २ चमचे +
ग्लिसरीन १ चमचा + गुलाबपाणी तीन चमचे.
हे सर्व एकत्र करून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा.
जरुरीप्रमाणे यांचा वापर करावा.

कांदा लवकर परतला जाण्यासाठी

कांदा लवकर परतला जाण्यासाठी
त्यात थोडीशी साखर मिसळावी. कांद्याचा रंग
ब्राऊन होईल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

ग्रंथपाल : तुम्ही हल्ली खांडेकरांच्या कादंबर्‍याच नेहमी नेता.
ते तुमचे आवडते लेखक वाटतं?
वाचक : मुळीच नाही. एकदा त्यांच्या कादंबरीत मला
दहा रूपयाची नोट सापडली तेव्हापासून त्यांचीच
पुस्तकं घरी नेऊन मी चाळतो.

दैनिक पंचांग बुधवार, दि. १७ जुलै २०२४

शयनी एकादशी, करिदिन, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा,
मोहरम, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
अनुराधा २७|१३, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

मेष : प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील. मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.

वृषभ : महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

मिथुन : लेखन कार्यातील अडचणी दूर होतील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्याल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील.

सिंह : राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या : वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. मानसिक स्थिरता वाढेल.

तूळ : मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापारय्व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील.

वृश्चिक : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. घरात साफसफाई करायची असल्यास काही कारणांमुळे विघ्न येतील.

धनु : व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.

मकर : मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. मानय्सन्मानात वाढ होईल.

मीन : आपल्या करीयरमधील ज्या ध्येयाची पूर्ती आपणास करायची आहे ते साध्य कराल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

उवा का होतात?

उवा का होतात?

उवा हे पंख नसलेले व माणसाच्या शरीरावर राहणारे कीटक होत. त्यांचे डोयातील, शरीरावरील व जननेंद्रियाच्या भागातील उवा असे तीन प्रकार पडतात. जेथे अस्वच्छता आहे, तेथे उवा असतातच. उवांच्या वनचक्रात अंडी, अळी व प्रौढ या अवस्था असतात. प्रौढ ऊ सुमारे ३० ते ५० दिवस जगते. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्कामुळे उवांचा प्रसार होतो. उवा असलेल्या माणसाला आलिंगन देणे, त्याच्या डोयाला डोके लागणे, त्यांचे कपडे, अंथरूणय्पांघरूण इ. वापरणे. कंगवा वापरणे इत्यादींमुळे उवांचा प्रसार होतो. डीडीटी, एचसीएच किंवा मॅलॅथियॉन वापरून उवांचा नायनाट करता येतो. डोक्यातील उवांसाठी व जननेंद्रियाच्या भागातील उवांसाठी ०.५ टक्के मॅलॅथियॉनचे मलम लावावे व १२ ते १४ तास ते तसेच ठेवावे. नंतर केस धुवून टाकावे.

शरीरावरील उवांसाठी १ टक्का मॅलॅथियॉनची पावडर लावावी किंवा कार्बारील हे औषध असलेली पावडर वापरावी. शाळेत वगैरे उवांचा नायनाट करायचा असल्यास हातपंपाच्या सहाय्याने प्रत्येक मुलांच्या शर्टमध्ये व पॅन्टमध्ये पावडर फवारली जाते. या तात्कालिक उपायांखेरीज महत्त्वाचा उपाय वैयक्तिक स्वच्छता हाच आहे. दररोज आंघोळ करणे, रोज धुतलेले, इस्त्री केलेले कपडे घालणे, लांब केस असलेल्या स्त्रियांनी वारंवार केस धुणे; हे उवा टाळण्याचे मुख्य उपाय आहेत. यासाठी आरोग्यशिक्षण महत्त्वाचे आहे.

सुविचार

ज्याप्रकारे शरीर स्वच्छ राखण्यासाठी नियमित स्नान करण्याची जरूरी असते; त्याप्रमाणे
अंतःकरण स्वच्छ ठेवण्यासाठी नियमितपणे प्रार्थना करण्याची आवश्यकता असते. : महावीर स्वामी

बहुपयोगी काकडी

बहुपयोगी काकडी
काकडी सालीसकट खावी. कारण
सालीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात
असतं. काकडीच्या सालीचा दुसरा उपयोग
म्हणजे काकडीची साल जळजळ होत असलेल्या
भागावर किंवा उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेवर
लावल्यास खूप आराम मिळतो. लो कॅलरीज
आणि पाण्याचा साठा यामुळे डाएट करणार्‍या
लोकांसाठी काकडी उत्तम आहे. शरीराला नको
असलेले द्रव्यपदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं
काम काकडी करते. तोंडाला दुर्गंधी येत असेल
तर काकडीची चकती तोंडात वरच्या भागात
जिभेच्या साहाय्याने धरून ठेवावी.