पाटवड्या
साहित्य : चार वाट्या जाडसर बेसन,
अर्धी वाटी सोयाबीन किंवा ओटस्चं पीठ, एक
वाटी आंबट ताक, तीन वाट्या पाणी, दोन
वाट्या गाजराचा कीस, दहा-बारा हिरव्या
मिरच्या, वीस-पंचवीस कढीलिंबाची पाने,
एक मोठा चमचा ओवा, तीन मोठे चमचे तीळ,
एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी
वाटी बे्रडक्रम्स, चवीला मीठ, हवे असल्यास
तिखट, एक वाटी तेल फोडणीसाठी, मोहरी,
हिंग, हळद.
कृती : बेसनात ताक, पाणी, तिखट,
मीठ, ओवा, दोन मोठे चमचे तीळ मिसळावे.
हिरवी मिरची आणि कढीलिंब यांचा ठेचा
करावा. फोडणी करून त्यात ठेचा आणि
गाजराचा कीस परतावा. त्यात बेसनाचे मिश्रण
घालून ढवळावे आणि झाकण ठेवून वाफ
आणावी. मिश्रण घट्ट होईल. त्यात कोथिंबीर
घालून गोळा करावा. थाळीला तेलाचा हात
लावावा आणि त्यात हे मिश्रण गरम असतानाच
थापावे. वर तीळ पसरावे. गार झाल्यावर
चौकोनी किंवा शंकरपाळ्यासारख्या मोठ्या
वड्या पाडाव्या. पाटवड्या आदल्या दिवशी
करून ठेवता येतात. ऐनवेळी ब्रेड क्रम्समध्ये
घोळवून, तव्यावर थोड्या तेलात परताव्या
किंवा तेलाचा हात लावून ओव्हनमध्ये १८०
सें. वर लालसर होईपर्यंत भाजाव्या.