सुविचार

जे आपली प्रशंसा करतात ते लोक आपल्याला आवडतात, पण आपण ज्यांची प्रशंसा करतो ते लोक आपल्याला आवडत नाहीत.

मधुमेहींसाठी काकडी वरदान

मधुमेहींसाठी काकडी वरदान
सकाळी उठल्यावर डोकं दुखत असेल तर
किंवा फ्रेश वाटत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी
काकडीच्या फोडी खाव्यात. मधुमेहींसाठीसुद्धा
काकडी उपयुक्त आहे. काकडीत असलेल्या
स्टेरॉल्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित
करायला मदत होते. काकडीत पोटॅशिअम,
मॅग्नेशिअम आणि फायबर असल्यामुळे रक्तदाब
सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच स्नायूंचे
दुखणे, पायात वात येणे यासारखे विकार दूर
करण्याची क्षमता यात असते.

टोमॅटोचे लोणचे

टोमॅटोचे लोणचे

साहित्य : चारशे ग्रॅम लाल मोठे
टोमॅटो, दहा-पंधरा लाल सुया मिरच्या,
दहा-बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून,
एक मोठा चमचा चिंचेचा कोळ, चवीला मीठ,
अर्धी वाटी चिरलेला गूळ, दोन मोठे चमचे तेल
फोडणीसाठी, मोहरी, हिंग, हळद, चिमूटभर
मेथी पूड.
कृती : चिंचेचा कोळ, थोडे पाणी आणि
मिरच्या घालून एक-दोन मिनिटे उकळावा.
गार झाल्यावर मिसरमधून फिरवून एकजीव
करावा.
दोन-तीन वाट्या उकळत्या पाण्यात
टोमॅटो घालून पाच मिनिटे झाकून ठेवावे.
साले काढून तुकडे करून घ्यावे. तेलाची
फोडणी करावी. त्यात मेथी पूड, चिरलेला
लसूण आणि मिरच्या घातलेला चिंचेचा कोळ
घालून परतावे, टोमॅटो मीठ, गूळ घालून
उकळून घट्ट करावे.

शांत झोपेसाठी

शांत झोपेसाठी
* बॉसबेड शयतो नसावा. तसेच,
त्यात अंथरुण व पांघरुणे ठेवलेली असल्यास
ती वारंवार बाहेर काढून धुवून, वाळवून पुन्हा
आत ठेवावीत. यात पितळी किंवा स्टेनलेस
स्टीलची जास्तीची भांडी, विजेची उपकरणे,
नादुरूस्त वस्तू ठेवू नयेत. कारण त्यामुळे
त्यावर शांत झोप लागत नाही.
* स्टडी टेब ल भिंतीला चिकटलेले
असावे व त्याचे बुकशेल्फ बंद असावे.

भजी स्वादिष्ट, कुरकुरीत होण्यासाठी

बेसनात बे्रड दूधात भिजवून मिसळावा व
त्या बेसनाची भजी बनवावीत. भजी स्वादिष्ट,
कुरकुरीत होतील.

यामुळे सनटैन दूर होतो

* ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडासा संत्र्याचा
रस घालून त्याने सुद्धा मालिश करावे. यामुळे
त्वचेला ‘क‘ आणि ‘ई‘ जीवनसत्व मिळते.
* दह्यामध्ये काकडी किसून ते
चेहर्‍यावर लावा. यामुळे सनटैन दूर होतो व
त्वचा मुलायम होते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

हसा आणि शतायुषी व्हा!

“मन्या, तुझ्या घड्याळात वाजले किती?”
बंडूने विचारले, “पाच वाजले”
मन्या म्हणाला, “माझ्या घड्याळात सव्वापाच वाजले आहेत.”
“नाही. माझं घड्याळ रेडियो टाईम आहे.”
‘माझंही रेडियो टाईम आहे?”
“तुझ्याकडे कोणता रोडियो आहे?”
“फिलिप्स!”
“मग बरोबर. माझ्याकडे ‘बुश’ आहे.’

दैनिक पंचांग गुरुवार, दि. १८ जुलै २०२४

वामन पूजन, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, आषाढ शुलपक्ष,
ज्येष्ठा २७|२५, सूर्योदय ०६ वा. २७ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

मेष : प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कामांमध्ये प्रगती होईल. मातृपक्षाकडून प्रसन्नता राहील. शत्रू पराभूत होतील.

वृषभ : आपल्या धाडसात वाढ होण्याची शयता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवा. इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवाल.

मिथुन : आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. पैशाच्या बाबतीत आपली नड भागेल. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शयता आहे.

कर्क : आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. वाहने काळजीपूर्वक चालवा. एखाद्या विशिष्ट योजनेला हातावेगळे करण्यात बराच वेळ जाईल. व्यापारय्व्यवसायात स्थिती सुखद राहील.

सिंह : आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील. भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे. वेळ अनुकूल आहे. जोखिम असलेले कार्ये टाळाल.

कन्या : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा. शांत राहाल.

तूळ : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल.

वृश्चिक : आपली प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. आपले धाडस वाढेल. कार्यक्षेत्रात वेगाने कार्य कराल. आरोग्य उत्तम राहील. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील.

धनु : आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. महत्वपूर्ण कार्यात यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. काही प्रेमपूर्ण अनुभव आज येऊ शकतात. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल.

मकर : व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंना मात द्याल. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. आर्थिक पक्षाबाबत
सावध राहाल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश मिळेल.

कुंभ : व्यवसायात प्रगती कराल. स्थिती अनुकूल राहील. आरोग्य उत्तम राहील. आरोग्य मध्यम राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो.

मीन : आर्थिक विषयांसाठी स्थिती अनुकूल आहे. धनाच्या रुपात यश मिळवाल. कुटुंबियांबरोबर वार्तालाप केल्याने एकमेकांच्या गरजा समजण्यात मदत मिळेल.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.

कानात तेल टाकावे की नाही?

कानात तेल टाकावे की नाही?

कानात तेल टाकण्याची आपल्याकडे फार पूर्वीपासून प्रथा आहे. बाळाला तेल चोळून आंघोळ घालण्यासोबतच कानात, नाकात, तेल टाकले जाते. आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्यासाठी दिवसभर काय करायचे हे सांगतांना कानात तेल टाकणे हा उपक्रम दिलेला आढळतो. कानाच्या आजारांवर सुद्धा औषधी तेलांचा उपचार सांगितलेला आढळतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेले अनेक उपचार आपल्या सणावारांमध्ये, उपवासाच्या पद्धतीत, आपल्या चालीरीती आहेत. त्यामध्ये गुंफून टाकलेले दिसून येतात. कानात तेल टाकणे, हा त्यातीलच एक उपचार आहे. कान दुखत असल्यास, कानात मळाचे खडे झाल्यास तेल कोमट करून (लसूण तेलात टाकून, ते उकळून, कोमट करून) टाकले जाते. हा अनुभव आपण कधीतरी घेतला असेलच. परंतु प्रत्येक वेळेस कानदुखी या उपायाने थांबेलच असे नाही. कारण कानदुखीची अनेक कारणे असतात.

कोमट तेलाने शेकल्याने बरे वाटू शकते; पण मध्यकर्णातील, हाडातील आजारांमुळे कानदुखी असेल तर त्याने थांबत नाही. कानातील मळाचे खडे तेलाने पातळ होऊन काढायला सोपे जाते; परंतु तेल घातल्याने जंतुसंसर्ग कानाच्या आतपर्यंत पोहचून आजार अधिक गंभीर होऊ शकतो. तेल जर जंतुविरहित नसेल, तर कानाला सूज येऊ शकते. तेलाद्वारे बुरशी कानापर्यंत जाऊन तेथे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. बाळाच्या कानात तर तेल न टाकलेलेच चांगले. वरील विवेचन पाहिल्यावर आपण तेल वापरताना ते स्वच्छ, उकळवून जंतुविरहित केलेलेच वापरावे आणि कान खूप ठणकत असताना, फुटून पू येत असेल त्यावेळेस, कान खूप खाजत असताना तेल वापरू नये. अशा वेळेस नाक, कान, घसा तज्ज्ञांचा सल्ला घेणे चांगले.

सुविचार

स्तुतीचा वेगवेगळ्या व्यक्तींवर वेगवेगळा परिणाम होतो. ती विचारी माणसाला
नम्र बनवते, मूर्खाला अहंकारी बनवते व दुर्बळांना अधिक दुर्बळ बनवते.