उवा का होतात?
उवा हे पंख नसलेले व माणसाच्या शरीरावर राहणारे कीटक होत. त्यांचे डोयातील, शरीरावरील व जननेंद्रियाच्या भागातील उवा असे तीन प्रकार पडतात. जेथे अस्वच्छता आहे, तेथे उवा असतातच. उवांच्या वनचक्रात अंडी, अळी व प्रौढ या अवस्था असतात. प्रौढ ऊ सुमारे ३० ते ५० दिवस जगते. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्कामुळे उवांचा प्रसार होतो. उवा असलेल्या माणसाला आलिंगन देणे, त्याच्या डोयाला डोके लागणे, त्यांचे कपडे, अंथरूणय्पांघरूण इ. वापरणे. कंगवा वापरणे इत्यादींमुळे उवांचा प्रसार होतो. डीडीटी, एचसीएच किंवा मॅलॅथियॉन वापरून उवांचा नायनाट करता येतो. डोक्यातील उवांसाठी व जननेंद्रियाच्या भागातील उवांसाठी ०.५ टक्के मॅलॅथियॉनचे मलम लावावे व १२ ते १४ तास ते तसेच ठेवावे. नंतर केस धुवून टाकावे.
शरीरावरील उवांसाठी १ टक्का मॅलॅथियॉनची पावडर लावावी किंवा कार्बारील हे औषध असलेली पावडर वापरावी. शाळेत वगैरे उवांचा नायनाट करायचा असल्यास हातपंपाच्या सहाय्याने प्रत्येक मुलांच्या शर्टमध्ये व पॅन्टमध्ये पावडर फवारली जाते. या तात्कालिक उपायांखेरीज महत्त्वाचा उपाय वैयक्तिक स्वच्छता हाच आहे. दररोज आंघोळ करणे, रोज धुतलेले, इस्त्री केलेले कपडे घालणे, लांब केस असलेल्या स्त्रियांनी वारंवार केस धुणे; हे उवा टाळण्याचे मुख्य उपाय आहेत. यासाठी आरोग्यशिक्षण महत्त्वाचे आहे.