
‘तुझ्याकडे रु.५०० आहेत का? मला हवे आहेत?’
‘नाहीत, पण धन्यवाद’
‘धन्यवाद कशाबद्दल’
‘पाचशेची माझी तुला लायकी वाटली म्हणून!’
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
लोभी ब्राम्हण
राजा कृष्णदेवरायाची आई अत्यंत धार्मिक होती. एके दिवशी तिने राजाला येऊन सांगितले की तिला दुसर्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना पिकलेले आंबे दान करायचे आहेत. राजाने आपल्या सेवकांना तिच्यासाठी आंबे आणण्यास सांगितले. त्याच रात्री राजाच्या आईचा मृत्यू झाला. राजा खूप दुःखी झाला, पण त्याला आईची शेवटची इच्छा आठवली. राजाने सर्व आवश्यक धार्मिक विधी पार पाडले. शेवटच्या दिवशी त्यांनी काही ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सुचवण्यास सांगितले. ब्राह्मण मात्र लोभी होते. चर्चेनंतर त्यांनी राजाला सांगितले की जर राजाने त्यांना सोन्याचे आंबे दान केले तरच त्यांच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. राजाने दुसर्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना सोन्याचे आंबे देण्यासाठी बोलावले. तेनालीने हे ऐकले. त्याला ब्राह्मण लोभी असल्याचे लगेच सम जले. त्यांना धडा शिकवण्यासाठी त्याने ब्राह्मणांना घरी बोलावले. दुसर्या दिवशी राजाकडून सोन्याचे आंबे मिळाल्याने ब्राह्मणांना खूप आनंद झाला. तेनाली सुद्धा त्यांना काहीतरी चांगलं दान करेल या विचाराने ते तेनालीच्या घरी गेले. परंतु जेव्हा ते तेनालीच्या घरात गेले तेव्हा त्यांना तेनाली हातात गरम लोखंडी पट्टी घेऊन उभा असलेला दिसला. ब्राह्मणांना धक्का बसला. तेनालीने त्यांना सांगितले की त्यांच्या आईचा संधिवातामुळे मृत्यू झाला होता. वेदना कमी करण्यासाठी गरम रॉडने तिचे शेकण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे, आईच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी त्याला ब्राह्मणांचे पाय शेकायचे होते.. तेनालीची युक्ती ब्राह्मणांना समजली. लाज वाटून त्यांनी तेनालीला सोन्याचे आंबे परत केले आणि तेथून पळ काढला. तेनालीने सर्व सोन्याचे आंबे राजाला परत केले आणि राजाला ब्राह्मणांनी कसे फसवले हे सांगितले.
बोध : लोभी नसावे आणि जे आहे त्यात आनंदी राहावे.
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज
‘मृत समुद्र’ म्हणजे काय?

मृत समुद्र मध्य पूर्वेत आहे. तो इस्रायल व जॉर्डन यांच्या सीमेवर आहे. या समुद्राच्या पाण्यास बाहेर पडायला वाव नाही. खरं तर ते महाप्रचंड सरोवरच आहे. यात वार्याने येणारे क्षार, पाण्याबरोबर येणारे क्षार यांची भर पडते. हे प्रमाण इतके असते की त्यामुळे या सागराच्या पाण्यात कुठलाही सजीव जिवंत राहू शकत नाही. म्हणून या सागराला ‘मृत समुद्र’ असे म्हणतात. मृत समुद्र ७७ कि. मी. लांब आहे. त्याची जास्तीत जास्त रुंदी २० कि. मी. आहे. या सागरपृष्ठाची पातळी जागतिक सागर पातळीच्या ३९६ मीटर खाली आहे. या सागराला जॉर्डन नदी येऊन मिळते. शिवाय इतर छोटे-मोठे नालेही मिळतात. यातून फक्त बाष्पीभवनाने जे पाणी जाईल तेवढेच. त्यामुळे क्षार वाहून जायला मार्ग उरत नाही. यामुळे मृत समुद्रात २३ ते २५% क्षार आढळतात. या समुद्रातून पोटॅश, मॅग्नेशियम लोराइड, कॅल्शियम लोराइड आणि ब्रोमाइड आदी क्षार काढले जातात.
पाककला
आरोग्य
हिवाळ्यात प्या इन्फ्यूज्ड वॉटर थंडीच्या दिवसात पाणी पिण्याची
इच्छा कमी होते. विशेषतः जर पाणी पूर्णपणे साधे असेल तर काही फरक पडत नाही. अशा स्थितीत तुमच्या साध्या पाण्याला चव
चाखायला द्या. आपण विविध औषधी वनस्पती आणि फळांच्या मदतीने इन्फ्यूज्ड वॉटर तयार करू शकता. हे प्यायला छान लागते आणि इतर अनेक फायदे देखील देतात
दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५
विनायक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
धनिष्ठा २२|२२, सूर्योदय ०६ वा. ३७ मि. सूर्यास्त ०५ वा. ५५ मि.
मेष : अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने
लाभ मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.
वृषभ : कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू
शकतो. वाहने सावकाश चालवा त्याचप्रमाणे यंत्रे व उपकरणांचा जपून वापर करा.
मिथुन : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. शत्रूंपासून सावध राहा.
व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. पैश्याचे पाकीट वगैरे जपा.
कर्क : व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगाल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. जुने
मित्र-मैत्रिणी भेटण्याची दाट शयता आहे.
कन्या : प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक
सभासदांचा सहयोग घ्याल. फुरसतीचा वेळ मिळेल. कुटुंबियांमध्ये रममाण व्हाल.
सिंह : शत्रूंपासून सावध राहाल. व्यापारव्यवसायात देवाण-घेवाण टाळाल. पितृचिंता
सतावेल. गुरुजनांचे आशिर्वाद घ्यायला जाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
तूळ : कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. मुले त्रास देऊ शकतात. जुने सहकारी
भेटल्यामुळे आठवणींना उजाळा मिळेल.
वृश्चिक : आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगाल. आजचा दिवस छान
जाईल. आरोग्य उत्तम राहिल. मागील उधारी व उसनवारी मिळेल.
धनु : आरोग्य नरम-गरम राहील. नोकरदार मंडळीनो काळजीपूर्वक काम करा.
नातेवाईकांमध्ये वेळ व्यथित कराल. मातृचिंता सतावेल.
मकर : प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक
सभासदांचा सहयोग घ्याल. पत्नीचा सल्ला घ्याल.
कुंभ : काळजीपूर्वक कार्य कराल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. छोट्या-छोट्या
अडचणी येतील.
मीन : मागील उधारी उसनवारी वसुल होईल. भाऊबंद डोके वर काढतील. कामाच्या
ठिकाणी चिडचिड होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा




