विनायक चतुर्थी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, पौष शुलपक्ष,
धनिष्ठा २२|२२, सूर्योदय ०६ वा. ३७ मि. सूर्यास्त ०५ वा. ५५ मि.
मेष : अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने
लाभ मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील.
वृषभ : कामात व्यस्तता अधिक असल्यामुळे आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू
शकतो. वाहने सावकाश चालवा त्याचप्रमाणे यंत्रे व उपकरणांचा जपून वापर करा.
मिथुन : आपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. शत्रूंपासून सावध राहा.
व्यापार-व्यवसायात देवाण-घेवाण टाळा. पैश्याचे पाकीट वगैरे जपा.
कर्क : व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगाल. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. जुने
मित्र-मैत्रिणी भेटण्याची दाट शयता आहे.
कन्या : प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक
सभासदांचा सहयोग घ्याल. फुरसतीचा वेळ मिळेल. कुटुंबियांमध्ये रममाण व्हाल.
सिंह : शत्रूंपासून सावध राहाल. व्यापारव्यवसायात देवाण-घेवाण टाळाल. पितृचिंता
सतावेल. गुरुजनांचे आशिर्वाद घ्यायला जाल. मागील उधारी उसनवारी वसुल होईल.
तूळ : कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही. मुले त्रास देऊ शकतात. जुने सहकारी
भेटल्यामुळे आठवणींना उजाळा मिळेल.
वृश्चिक : आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगाल. आजचा दिवस छान
जाईल. आरोग्य उत्तम राहिल. मागील उधारी व उसनवारी मिळेल.
धनु : आरोग्य नरम-गरम राहील. नोकरदार मंडळीनो काळजीपूर्वक काम करा.
नातेवाईकांमध्ये वेळ व्यथित कराल. मातृचिंता सतावेल.
मकर : प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक
सभासदांचा सहयोग घ्याल. पत्नीचा सल्ला घ्याल.
कुंभ : काळजीपूर्वक कार्य कराल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. छोट्या-छोट्या
अडचणी येतील.
मीन : मागील उधारी उसनवारी वसुल होईल. भाऊबंद डोके वर काढतील. कामाच्या
ठिकाणी चिडचिड होईल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा