डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची अधिकृत सभासदांची यादी मनपा आयुक्तांना सुपूत

२० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत पुतळा उभा राहणार

नगर – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून ते आता
केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार करण्याचे काम बाकी आहे. यासाठी शहरातील आंबेडकरी
समाज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने पूर्ण कृती पुतळा अनावरणाबाबत महत्त्वपूर्ण
बैठक मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी समितीचे अधिकृत
समितीच्या सभासदांची यादी आयुक्तांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी समितीचे सुरेश बनसोडे,
अजय साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, संजय कांबळे, किरण दाभाडे, योगेश साठे, सुनील शिंदे, संजय
जगताप, पोपट जाधव, विलास साठे, डी.आर.जाधव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, जीवन कांबळे,
विशाल कांबळे, दीपक अमृत, संजय साळवे, विशाल गायकवाड, चिकू गायकवाड, सिद्धार्थ राजगुरु, सागर
ठोकळ, विजय गायकवाड, दिनेश पंडित, वैभव कांबळे, किरण गायकवाड, वैभव जाधव, विजय गव्हाळे, सिद्धांत
कांबळे, अशोक खंडागळे, प्रवीण ओरे, शांतवण साळवेआदी उपस्थित होते. पुढे आयुक्त यशवंत डांगे यांनी
समितीच्या अधिकृत सभासदांच्या यादीला मान्यता देऊन पूर्णाकृती पुतळा अनावरणासाठी समितीच्या
पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून सर्व अधिकृत कामे केले जाईल व उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा २० मार्च ते १ एप्रिल दरम्यान पुतळा बसवण्यात येईल व या अनावरणासाठी
आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सर्व मंत्री महोदय तसेच सर्व रिपब्लिकन नेते यांना देखील निमंत्रण देऊन पूर्णाकृती पुतळा अनवरणासाठी
उपस्थित राहण्याचे निमंत्रण देऊन हा सोहळा थाटात करण्यात येणार आहे.

भिंगारच्या भरबाजारपेठेत किराणा दुकानात धाडसी चोरी रोकडसह सुका मेवा व साहित्य अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

नगर – भिंगार मधील भरबाजारपेठेतील किराणा दुकान चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडून आतील सामनाची उचकापाचक करत दुकानातील ३० हजारांची रोकड, ३० हजार ५०० रुपये किमतीचा सुकामेवा व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना ११ फेब्रुवारीला रात्री ९ ते १२ फेब्रुवारीला सकाळी ९ या कालावधीत नेहरू मार्केट परिसरात घडली आहे.

याबाबत निलेश पोपटलाल शिंगवी (वय ४०, रा. वसंत बंगला, सौरभ नगर, पंडित हॉस्पिटल जवळ, नागरदेवळे) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शिंगवी यांचे भिंगार मध्ये नेहरू मार्केट परिसरात शिंगवी प्रोव्हिजन स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शिंगवी यांनी ११ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. १२ फेब्रुवारीला सकाळी ते दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर चे कुलूप तोडलेले तसेच शटर उचकटलेले दिसले. त्यांनी आत जावून पाहणी केली असता आत मध्ये सर्वत्र उचका पाचक झाल्याचे दिसले. त्यांनी दुकानात ठेवलेली रोख रक्कम पाहिली असता ती दिसून आली नाही. या शिवाय दुकानातील १२ किलो काजू, १५ किलो बदाम, १० किलो मनुके,५ किलो काळे मनुके, ५ लिटरचे तेलाचे सहा कॅन, अर्धा किलो वजनाचे चहाचे १५ पुडे असा ६० हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज आढळून आला नाही.

शिंगवी यांनी रात्री दुकान बंद केल्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरच्या वरील बाजूचा छताचा पत्रा उचकटला. त्यातून आत प्रवेश करत रोकड व साहित्य चोरले. त्यानंतर शटर चे कुलूप तोडत तसेच शटर उचकटत तेथून पोबारा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. याबाबत त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळाल्यावर स.पो.नि. जगदीश मुलगीर, स.फौ. दहिफळे यांच्या सह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

या बाबत निलेश शिंगवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३४ (१) अन्वये चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार दहिफळे हे करीत आहे.

महिनाभरापासून भिंगार परिसरात चोऱ्यांचे सत्र

भिंगार शहर आणि परिसरात गेल्या महिना दीड महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. चोरट्यांनी किराणा दुकाने, मेडिकल दुकाने टार्गेट करत चोऱ्या केल्या आहेत. काही चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदही झाल्या आहेत. मागील महिन्यात ज्या चोऱ्या झाल्या त्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आलेल्या चोरट्यामध्ये साम्य आढळून आलेले आहे. त्यामुळे चोऱ्या करणारी ही टोळी एकच आहे की वेगवेगळ्या टोळ्या आहेत. याचा पोलिसांनी तातडीने छडा लावून या चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेत विविध विभागात कंत्राटी अधिकारी, त्यामुळेच अपहार, भ्रष्टाचार होतो

मुख्यमंत्री देवेंद्र अहिल्यानगर फडणवीस यांना शहरातून निवेदन

नगर – अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे सक्तीच्या रजेवर पाठविलेले आरोग्य अधिकारी आणि लेखा व्यवस्थापक यांच्या संगनमताने ३२ लाख रुपये अपहार झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणात लक्ष घातले तर असे निदर्शनास येते की कंत्राटी कामगार हा तात्पुरत्या वेतन श्रेणीवर नेमणूक करण्यात येते. कंत्राटी व्यक्तीला अधिकार किती असावा हे पाहणे गरजेचे आहे. हे न पाहता कंत्राटी पद्धतीने भरती केलेले विजय रणदिवे यांना आरोग्य विभागात लेखा व्यवस्थापक असे मुख्यपद देणे तसेच अनेक आर्थिक व्यवहार बाबत अधिकार देणे हे योग्य नाही. त्यामुळे कंत्राटी कामगाराला अधिकारी देणाऱ्या सर्व अधिकारी, आयुक्त, आस्थापना प्रमुख यांची चौकशी होणे गरजेचे आहे. महानगरपालिकेत पाहिले तर अनेक कंत्राटी कामगार आहेत. त्यांना विविध विभागात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन नागरिकांची लूट होत आहे. त्याकरिता या कंत्राटी कामगारांना अभय कोण देते हे पाहणे गरजेचे आहे. अश्या अनेक कंत्राटी कामगारांना अधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार दिले गेले, सह्यांची परवानगी दिली गेली, अधिकार तपासताना लेखा परीक्षक सुध्दा झोपेत दिसत आहे. त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून नियमबाह्य पद्धतीने अहिल्यानगर महानगरपालिकेचे ऑडिट होते अशी शंका निर्माण होते, असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे. त्या करिता कंत्राटी भरतीच्या लोकांना पदसिद्ध अधिकारी म्हणून कोणत्याही विभागात नियुक्ती करू नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली व सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन हे मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नाशिक यांना मेल द्वारे पाठविण्यात आले असल्याचे भुतारे यांनी सांगितले.

बारावी पेपरच्या वेळेत शिक्षकाला चाकूचा धाक, पेपर संपल्यानंतर गाडीबाहेर ओढून शिवीगाळ

शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण; संरक्षण द्या अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्या

नगर बारावीच्या बोर्ड परीक्षांना प्रारंभ झाले असून, यामध्ये पहिल्याच पेपरदरम्यान मंगळवारी (दि.११ फेब्रुवारी) एक गंभीर घटना घडली आहे.

श्री वृद्धेश्वर हायस्कूल, तिसगाव (ता. पाथर्डी) येथे एक गुंडाने पर्यवेक्षकाला चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आहे. या घटनेचा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निषेध नोंदवून, जबाबदारीवर असलेल्या शिक्षकांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने पाथर्डीचे तहसीलदार उध्दव नाईक व पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, अशोक दौंड, डी.सी. फकीर, सुभाष भागवत, भारत गाडेकर, आसिफ पठाण, महिंद्र राजगुरू, आत्माराम दहिफळे, बापूसाहेब कल्हापूरे, एस.आर.

पालवे, व्ही.व्ही. इंगळे, सुभाष भागवत, अजय भंडारी, समाधान आराक, सुरेश मिसाळ, छबुराव फुंदे, सी.एम. कर्डिले, एन.एस. मुथा, मच्छिंद्र बाचकर, सुधाकर सातपुते, डॉ. अनिल पानखडे, अजय शिरसाठ, व्ही.पी. गांधी आदी उपस्थित होते. बारावी बोर्डाच्या पहिल्याच पेपरला शिक्षकांना धमकाविण्याचा प्रकार घडला असताना, शिक्षिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. पेपर संपल्यानंतर काही गुंडांनी पेपर जमा करणाऱ्या शिक्षकाची गाडी अडवून त्यांना गाडीच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हंटले आहे. यावर्षीच्या बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षकांची सरमिसळ पद्धतीने नियुक्ती केली आहे. त्यामुळे ओळख नसलेल्या आणि दूरवर असलेल्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास, इयत्ता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरमिसळ पद्धतीने अनोळखी शाळेत शिक्षक परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी जात आहे. तेथील परिस्थिती व ओळख नसल्याने गाव गुंडांकडून त्यांना धमकाविण्याचे प्रकार घडत आहे. अशा प्रकारामुळे शिक्षकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, काही गंभीर प्रकार घडण्या अगोदरच प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे. अन्यथा बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला जाणार आहे, असा इशारा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी दिला आहे

रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाखाली शिक्षणाची गंगा वाहत आहे

केडगावच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

माजी सचिव शिवाजीराव भोर यांचे प्रतिपादन नगर रयतच्या बहरलेल्या वटवृक्षाखाली शिक्षणाची गंगा वाहत आहे. या वटवृक्षाच्या छायेत शिक्षणाने अनेकांनी आपले भवितव्य घडविले आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे देखील श्री अंबिका माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. अनेक दिग्गज व्यक्तीमत्व या शाळेतून घडले आहेत. ही शाळा केडगावचे भूषण असून, प्राथमिकला मान्यता मिळाल्याने या परिसरातील लहान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता येणार असल्याचे शिवाजीराव भोर यांनी सांगितले. केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले. तर सण-उत्सव, परंपरेचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण केले. विविध हिंदी मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, रघुनाथ लोंढे, किसन सातपुते, महेश गुंड, पत्रकार रविंद्र देशपांडे, माजी मुख्याध्यापक कृष्णाजी थोरात, महेश ढगे, सिताराम जपकर, बाबासाहेब जगदाळे, बापूसाहेब दिघे, नम्रता ससाणे, प्राथमिक विभाग प्रमुख पुजा गोरे, शुभम गाडे, कांचन झरेकर, शितल गायकवाड, प्रियंका राजदेव, अश्विनी टेमकर, जयश्री भोर, वर्षा शेलार, स्वाती जाधव, रेखा रासकर, कीर्ती पावसे, कविता शेळके, विशाखा जाधव, सुवर्णा घोडके, मदतनीस सविता बुगे, सुवर्णा शिंदे, रेखा शिंदे आदींसह शाळा समिती, स्थानिक सल्लागार समिती, सखी सावित्री समिती, पर्यवेक्षक, सेवक आणि विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन, शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला. तर शाळेत केडगावच्या पंचक्रोशीतील ५८३ विद्यार्थी प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट केले. ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, संस्थेतील विद्यार्थी उंच भरारी घेऊन गुणवत्ता सिद्ध करत आहे. पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्या सकस आहारावर लक्ष द्यावे. मुलांच्या शिक्षण व आरोग्याबाबत जागृक रहावे लागणार आहे. काही विद्यार्थ्यांना शिक्षणा घेण्यासाठी पैसे नाही, तर काही विद्यार्थी मौजमजेसाठी चार्टर्ड विमान उडवीत आहेत. ही समाजातील विषमता समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. चंगळवादात आपल्या मुलांना शिक्षण व संस्काराची शिदोरी देण्याचे त्यांनी आवाहन केले. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोळी नृत्य व पोतराज नृत्यासह जागरण गोंधळाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. आंम्ही शिवकन्या या गीतांमधून स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. देशभक्ती व विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. चल सर्जा, चल राजा या शेतकरी…, राज आलं, राज आलं…. गीताने उपस्थितांची मने जिंकली. लूंगी डान्स, चंदा चमके, स्कूल चले हम, मला भी जत्रेला येऊ द्या की, जन्म बाईचा बाईचा आदी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन झरेकर व प्रियंका राजदेव यांनी केले. आभार प्राथमिक विभाग प्रमुख पुजा गोरे यांनी मानले.

शासनाकडून आदिवासी आणि अनुसूचित जातीतील अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी जागा मिळावी

वंचित बहुजन आघाडीची मागणी; शिष्टमंडळाने दिले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

नगर – मौजे वडगाव गुप्ता (ता. नगर) आणि इतर गावांतील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातींतील अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी शासनाची जागा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या अतिक्रमण धारकांचे ४० ते ५० वर्षांपासून हे अतिक्रमण सरकारी जागेत कायम असून, त्यांना रेशन कार्ड, लाईट बिल कनेक्शन दिले गेले आहेत. शासनाने त्यांना राहण्यासाठी प्रत्येकी दोन गुंठे जमीन देण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी योगेश साठे (जिल्हाध्यक्ष), हनीफ शेख (शहराध्यक्ष), सुधीर ठोंबे (जिल्हा संघटक), मारुती पाटोळे, रविकिरण जाधव, प्रवीण ओरे, जे.डी. शिरसाठ, अॅड. योगेश गुंजाळ, राजू भिंगारदिवे, पिण्या भोसले, संजय शिंदे, भारत जाधव, तेजस धीवर, अमित केदारी, सोनू भोसले, संजय माळी, अक्षय भोसले, भानुदास सातपुते, साईनाथ चव्हाण, सोमनाथ जाधव, शिवाजी माळी, राजू शिंदे, सुभाष बर्डे, सोनू भोसले, राहुल चव्हाण, लताबाई चव्हाण, कनगर काळे, वैभव लोखंडे, भीमा शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारी जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहणारे बहुतेक लोक आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातींतील आहेत. राज्य शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी प्रत्येकी दोन गुंठे जमीन दिली आहे. ते एमआयडीसी आणि इतर कामे करून आपली उपजीविका भागवत आहे. प्रशासनाने त्यांना या सरकारी जमिनीवरून काढले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी चिंता वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे, ज्यात सरकारने संबंधित कुटुंबांना कायमस्वरूपी जागा मोजमाप करुन देण्याची मागणी केली आहे. राज्य शासनाच्या जमिनीवरील आदिवासी, भटके, विमुक्त, अनुसूचित जाती आणि जमातींतील अतिक्रमण धारकांना राज्य शासनाने जागा दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा योग्य पध्दतीने उदरनिर्वाह होवून, ते स्वतःचे व्यवसाय सुरू करू शकतील. यासाठी आदिवासी आणि अनुसूचित जातीचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण धारकांना प्रत्येकी दोन गुंठे जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. तर अतिक्रमण हटविण्याची कारवाई त्वरीत न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देऊन अतिक्रमण धारकांना एकजुटीने या विरोधात लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार

नगर – स्नेहबंध सोशल फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सावेडी येथील माऊली सभागृहात ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन अॅवार्डचे वितरण करण्यात आले. डॉ. उद्धव शिंदे यांनी फौडेशनच्या माध्यमातून सामाजिक जाण आणि आपण काय देणं लागतो याची जाण मनात ठेवून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यावर काम केले. त्यांनी निराधार, वंचित, बेघरांना कपडे, जेवण दिले, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य दिले, ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिर घेतले. त्यांच्या मनात कायम समाजसेवेची ओढ कायम असते, आता ही ओढ म्हणण्यापेक्षा ती त्यांचा पिंडच झाला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कवयित्री सरोज आल्हाट, स्पर्श संस्थेचे खजिनदार अमोल आल्हाट, स्पर्शच्या अध्यक्ष शीतल साळवे, ज्ञानरचना फौडेशनच्या संचालिका सुप्रिया चौधरी, प्रवीण साळवे, सारिका शेलार उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. शिंदे यांनी अनाथ, निराधारांच्या आयुष्यात भरले आनंदाचे रंग डॉ. उद्धव शिंदे आतापर्यंत अनेक अनाथ, निराधारांच्या आयुष्यात विविध भेटवस्तू, सणवाराला मिष्टान्न भोजन देऊ आनंदाचे रंग भरले आहेत. डॉ. शिंदे यांच्या सामाजिक कामांची यादी भलीमोठी आहे. विशेष म्हणजे निःस्वार्थ मनाने केलेले ते काम आहे, म्हणून त्यांचे काम दैदिप्यमान आणि कौतुकास्पद आहे. राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला, अशी प्रतिक्रिया ‘मारुतीराव मिसळवाले’चे संचालक अमित खामकर यांनी दिली.

नगर शहरामध्ये हिंद केसरी स्पर्धेचे आयोजन करणार

आ.संग्राम जगताप यांचे प्रतिपादन: गादी व माती कुस्ती व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण; पृथ्वीराज मोहोळ यांना दिली महिंद्रा थार गाडी भेट

नगर – शहरासह जिल्ह्यामध्ये चांगले मल्ल घडावे, यासाठी सुसज्ज असे तालीम केंद्र उभे करणार आहे, कुस्ती खेळाच्या माध्यमातून विचारातून प्रेरणा मिळत असते. त्यामुळे चुकीच्या गोष्टी घडत नसतात, प्रेक्षकही चांगले विचार घेत असतात. मोहोळ परिवाराच्या माध्यमातून मानाची गदा दिली जाते. ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांनी मिळवला असून, त्याने आपले कर्तव्य सिद्ध केले. राज्यभरातून आलेल्या पैलवानांची काळजी घेण्याचे काम कुस्तीगीर संघाने केले आणि चांगल्या कुस्त्या झाल्या. जिद्द, चिकाटीच्या जोरावर कुठल्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करता येत असते. भविष्य काळामध्ये नगर शहरांमध्ये हिंदकेसरी स्पर्धेचे आयोजन केले जाईल. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले आहे. यापुढे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा उंचीच्या व्हावेत, अशी अपेक्षा राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष व आ. संग्राम जगताप यांनी केले. महाराष्ट्र कुस्तीगीर संघ व अहिल्यानगर यांच्यावतीने ६७ वी वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार अरुण जगताप, उपाध्यक्ष व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, पै. महेंद्र गायकवाड, हिंदकेसरी योगेश दोडके, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रा. माणिकराव विधाते, मार्गदर्शक विलास कथोरे, पै. गुलाब बर्डे, बबन काशीद, अनिल गुंजाळ, संतोष भुजबळ, शिवाजी चव्हाण, शिवाजी कराळे, निखिल वारे, उद्योजक राजेश भंडारी, गणेश गुंडाळ, सत्येन गुंदेचा, सुरेश बनसोडे, काका शेळके, अजय चितळे, युवराज पठारे, संजय ढोणे, देवा शेळके, युवराज करंजुले, निलेश मदने, बाळासाहेब जगताप, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, मनीष साठे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्याध्यक्ष भुजबळ यांनी केले तर निलेश मदने यांनी स्वागत केले आणि उपाध्यक्ष पै. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले. ६७ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमधील गादी गटातील विजेत्या पैलवानांना महिंद्रा थार, बुलेट, स्प्लेंडर व सोन्याची अंगठी देण्यात आली. यावेळी ५७ वजन गटामध्ये प्रथम क्रमांक वैभव पाटील, द्वितीय क्रमांक शुभम अचपळे, तृतीय अविराज माने, रोहित पाटील. ६१ वजन किलो गटामध्ये प्रथम क्रमांक अजय कापडे, द्वितीय पुरुषोत्तम विसपुते, तृतीय क्रमांक पवन डोन्नर, पांडुरंग माने. ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक ज्योतिबा आटकळे, द्वितीय क्रमांक मनीष बांगर, तृतीय क्रमांक आकाश नागरे, किरण सत्रे. ७० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक सौरभपाटील, द्वितीय क्रमांक सत्ताप्पा हिरगुडे. तृतीय क्रमांक विपुल थोरात, विकास करे. ७४ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक आदर्श पाटील, द्वितीय क्रमांक दयानंद पाटील, तृतीय क्रमांक योगेश्वर तापकीर, धैर्यशील लोंढे. ७९ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक शुभम मगर, द्वितीय क्रमांक केतन घारे, तृतीय क्रमांक संदीप लटके, सुजित यादव ८६ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मुंतजीर सरनोबत, द्वितीय क्रमांक महेश फुलमाळी, तृतीय क्रमांक स्वप्निल काशीद, गौतम शिंदे. ९२ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक श्रेयश गाट, द्वितीय क्रमांक अभिजीत भोईर, तृतीय क्रमांक मोईन मुलानी, ऋषिकेश पाटील. ९७ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक कालीचरण सोलनकर, द्वितीय क्रमांक बाळू बोडके, तृतीय क्रमांक ऋतुराज शेटके, ओंकार येळभर, आदींचा समावेश आहे, तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पृथ्वीराज मोहोळ यांना महिंद्रा थार ही गाडी भेट देण्यात आली.

विजेते पैलवान ५७ किलो वजन गटात प्रथम क्रमांक सौरभ इगवे, द्वितीय क्रमांक दिग्विजय पाटील, तृतीय क्रमांक ओंकार निगडे. ६१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक सुरज अस्वले, द्वितीय क्रमांक स्वरूप जाधव, तृतीय क्रमांक अमोल वालगुडे, ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक सद्दाम शेख, द्वितीय क्रमांक अनिकेत मगर, तृतीय क्रमांक शनिराज निंबाळकर.

७० किलो वजन गटात प्रथम क्रमांक तुशांत, देशमुख द्वितीय क्रमांक निखिल कदम, तृतीय क्रमांक कुलदीप पाटील, ७४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक अक्षय चव्हाण, द्वितीय क्रमांक निलेश हिरगुडे, तृतीय क्रमांक सौरभ शिंदे. ७९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक संदेश शिपकुळे, द्वितीय क्रमांक ऋषिकेश शेळके, तृतीय क्रमांक नाथा पवार, ८६ किलो वजन गटात प्रथम क्रमांक चंद्रशेखर गवळी, द्वितीय क्रमांक हनुमंत पुरी, तृतीय क्रमांक सुनील जाधव. ९२ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक विश्वचरण सोलनकर, द्वितीय क्रमांक श्रीनाथ

गोरे, तृतीय क्रमांक अंगद बुलबुले. ९७ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक रोहन पवार, द्वितीय क्रमांक विजय बिचकुले,

तृतीय क्रमांक अर्जुन काळे, १२५ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून कोणतेही नाव आलेले

नाही, द्वितीय क्रमांक साकेत यादव, तृतीय क्रमांक सुहास गोडगे यांना सन्मानित करण्यात आले होते.

तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर छापा

पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागाची संयुक्त कारवाई

नगर – एमआयडीसी पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील २ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नगर तालुक्यातील निंबळक येथे १२ फेब्रुवारीला रात्री करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना निंबळकमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी कारवाई साठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला बोलावून घेत त्यांचे बरोबर निंबळक येथील गजानन पान स्टॉल येथे छापा टाकला. तेथे राजेंद्र शामराव वराट (वय-४२, रा. निंबळक ता. नगर), अमोल धोंडीराम इंगोले (वय २३, रा. घाटसांगवी ता.जि. बीड. हल्ली रा. निंबळक ता. नगर) असे मावा व सुंगधी तंबाखुची विनापरवाना विक्री करताना मिळुन आले. त्यांना विचारणा केली असता ते मालक व कामगार असल्याचे सांगीतले. पोलिसांनी पान स्टॉल मध्ये झडती घेतली असता १२ हजार ३०० रुपये किमतीचा मावा विमल पानमसाला. सुंगधी तंबाखु मिळुन आली. इतर मुद्देमाल साठा कोठे ठेवला याबाबत विचारणा केली असता राजेंद्र वराट यांनी सांगीतले की, त्यांचे नातेवाईक आनंद खैरे यांचे घरात इतर मुद्देमाल लपवुन ठेवला आहे. त्यावरुन खैरे यांचे घराची झडती घेतली असता तेथे आनंद तात्या खैरे (वय २८, रा. निंबळक ता. नगर) व महेश भिमराव घोलप (वय-३२ रा. निंबळक ता. नगर) मिळुन आले. त्यांचे ताब्यात सुंगधी तंबाखु व मावा, पानामसाला मिळुन आला. त्यामुळे राजेंद्र शामराव वराट, आनंद तात्या खैरे, अमोल धोंडीराम इंगोले महेश भिमराव घोलप या चौघांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून तयार मावा, सुंगधी तंबाखु, तसेच मावा तयार करण्याची साधने असा एकुण २ लाख ७६ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५,१२३ (३) (५) सह अन्न सुरक्षा अधिनियम कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स.पो.नि. निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस अंमलदार राजु सुद्रिक, नितीन उगलमुगले, साबीर शेख, नंदकिशोर सांगळे, कावरे, महिला पोलीस अंमलदार सुर्यवंशी, पोलीस अंमलदार बोरुडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, शेरकर तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे, शुभम भस्मे, सागर सोनार यांचे पथकाने केली आहे

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना बाजारात बसवावे अन्यथा सर्व विक्रेते रस्त्यावरच बाजार मांडणार

गाडगीळ पटांगणातील भाजी विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे मागणी

नगर अमरधाम समोरून कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम होत असतो. तासनतास लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरे जावे लागते, महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये ओटे बांधून व्यवस्था करून दिली असताना देखील भाजीवाले रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसत आहे. सर्व भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसावे अन्यथा आम्हीही रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसू असा इशारा भाजी विक्रेत्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिला. यावेळी आयुक्त डांगे यांनी लाईट व स्वच्छता तसेच बसण्याची व्यवस्था करण्याचे व रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना भाजी बाजारात बसण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले

शहरातील गाडगीळ पटांगणमधील भाजी विक्रेत्यांनी आ. संग्राम जगताप यांच्या समवेत आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगण मध्ये बसवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी संतोष कानडे, अजय विधाते, अक्षय निमसे यांच्यासह भाजी विक्रेते उपस्थित होते.

गाडगीळ पटांगण मधील भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसवण्याची व्यवस्था करावी, या ठिकाणी अमरधाम असून येथे अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अशी मागणी आयुक्त यांच्याकडे

आ. संग्राम जगताप यांनी केली