सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समस्यांचा डोंगरः विद्यार्थ्यांचा १३ फेब्रुवारी रोजी ‘महाआक्रोश मोर्चा’

पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होणार : ‘अभाविप’ची माहिती

नगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाच्या समस्या भेडसावत आहेत. परीक्षा आणि निकाल विषयातील समस्या, मूलभूत सुविधांचा प्रश्न, संलग्नित महाविद्यालयांमध्ये असलेले प्रश्न आणि शासन स्तरावरील प्रश्नांमुळे सर्वसामान्य विद्यार्थी यामध्ये भरडला जात आहे. वारंवार निवेदन देऊन व चर्चा करून देखील या समस्या न सुटल्याने अभाविप विविध ६१ मागण्यांच्या पूर्ततेसठी पुणे विद्यापीठाविरोधात १३ फेब्रुवारी रोजी ‘महाआक्रोश मोर्चा’ काढणार आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची सुमार कामगिरी बघायला मिळाली आहे. कुठलाही निकाल वेळेत न लागणे, चुकीचे निकाल लागणे, निकाल अचानक बदलून येणे असे अनेक गंभीर प्रकार निदर्शनास आले आहेत. पुनर्मूल्यांकनाच्या विषयात दंडकामध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणल्या गेली आहे, शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षणाची तरतूद केली असताना अनेक महाविद्यालयांनी या योजनेची अंमलबजावणी केलेली नाही, पुणे विद्यापीठ परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत

सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कमवा आणि शिका ही योजना फक्त नावाला सुरू असून गरजू विद्यार्थ्यांना याचा काहीही उपयोग होत नाही.

अभ्यासक्रमासाठी वार्षिक वेळापत्रक निश्चित नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बोगस महाविद्यालयांचा सुळसुळाट वाढल्याने अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडलेले निदर्शनास आले आहेत. अशा विविध प्रकारच्या समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घेऊन ‘महाआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्वसाम ान्य विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करीत आहे.

विद्यार्थ्यांचे गंभीर प्रश्न असताना देखील विद्यापीठ प्रशासन या प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहील. हा फक्त अभाविप चा मोर्चा नाही तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे, असे अभाविप प. महाराष्ट्राचे प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

मोर्चातील प्रमुख मागण्या पुनर्मूल्यांकन पूर्वीच्या पद्धतीने व्हावे. बदललेले निकष तत्काळ रद्द करण्यात यावे,

सत्र परीक्षा निकाल संदर्भातील गोंधळ दूर करून तत्काळ सुधारित निकाल लावण्यात यावे. मुलींना मोफत शिक्षणाच्या योजनेची सर्व महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, विद्यापीठ परिसरात संघटनांच्या आंदोलन, बैठक, उपक्रम, कार्यक्रम संदर्भातील जाचक नियमवली असलेले परिपत्रक मागे घेण्यात यावे

बोगस महाविद्यालयांवर कारवाई करावी

वर्षभराचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात यावे.

उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत १०० रुपयात उपलब्ध करावी.

विद्यापीठ परिसरातील प्लेसमेंट सेल सक्रिय करण्यात यावे.

कमवा शिका योजनेचे तास वाढविण्यात यावे. ही योजना सर्व महाविद्यालयांना राबविणे बंधनकारक करण्यात यावी. मानधन ७०/- तास असे असावे.

विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव आणि डीन यांची नियुक्ती करण्यात यावी,

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार खुल्या महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणुका विद्यापीठाने तत्काळ घोषित कराव्या.

अशा विविध ६१ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाकुंभला जाऊ न शकलेल्यांसाठी पवित्र तीर्थ आणून सुमित वर्माचे आदर्शवत काम

राजाभाऊ कोठारी यांचे प्रतिपादन; शिव मित्र प्रतिष्ठानच्या वतीने महाकुंभ मेळाच्या पवित्र तीर्थाचे पूजन व भाविकांना वाटप

नगर १४४ वर्षांनी आलेल्या महाकुंभ पर्वणीचा हा सोहळा अति दिव्य आहे. ज्यांच्या नशिबात या अति पवित्र पर्वणीचा लाभ होता ते प्रत्यक्ष तेथे जाऊन ती अनुभूती घेतली. पण जे प्रयागराजला जाऊ शकले नाहीत अशांचा विचार करून सुमित वर्मा व त्याच्या मित्रांनी तेथील पवित्र तीर्थ नगरला आणून आदर्शवत काम केले आहे. आजच्या या कलियुगात तरुणांची दिशा भरकटलेली असताना काही तरुण एकत्र येत आदर्शवत काम करतात हे धर्मकार्य कौतुकास्पद आहे. दुसऱ्यांसाठी काहीतरी केल्यावर मानव जन्माचे सार्थक होतं. सुमित वर्माने कायम मानवजातीसाठी काम केले आहे. याचा अभिमान आहे. भविष्यातही असेच धर्मकार्याचे उपक्रम सतत राबवावेत, असे आवाहन राजाभाऊ कोठारी यांनी केले. अहिल्यानगरचे सुमित वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या ४२ सहकाऱ्यांनी प्रयागराज या महामुंभ स्थळी जाऊन तेथील पवित्र तीर्थ नगरच्या भाविकांसाठी आणले आहे. नगरच्या शिव मित्र प्रतिष्ठानच्या वतीने गंगा, यमुना व सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमाचे पवित्र तीर्थाचे पूजन व भाविकांना तीर्थाचे वाटप बुधवारी सकाळी गंज बाजार येथे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते गंगामैयाच्या जयघोषात झाले. यावेळी तीर्थ घेण्यास भाविक उपस्थित होते. यावेळी

हर हर गंगे… नमामि गंगे…, जय श्रीराम घोषणा देण्यात आल्या. प्रयागराजचे प्रवित्र तीर्थ घेण्यास भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रास्ताविकात सुमित वर्मा म्हणाले, तब्बल १४४ वर्षांनी महाकुंभ मेळाची मोठी पर्वणी आपल्याला मिळाली हे आपले भाग्य आहे. या महाकुंभपर्वात आम्ही नगरहून ४२ जण सामील होण्यासाठी प्रयागराज तीर्थक्षेत्री गेलो होतो. गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या पवित्र संगमात स्नान

केल्यावर संगमाचे पवित्र जल नगरच्या भाविकांसाठी नेण्याचा निर्णय आम्ही घेतला. माझ्याबरोबर असलेल्या प्रत्येकाने ड्रममध्ये पवित्र जल भरून ते ड्रम हातात घेत गर्दीतून १८ किलोमीटरचा पायी प्रवास केला. नगरच्या अनेकांना इच्छा असूनही प्रयागराज तीर्थक्षेत्री जाता आले नाहीये. अशांसाठी व सर्व भाविकांना १४४ वर्षांनी आलेल्या पर्वणीचा लाभ व पुण्य मिळावे यासाठी आपुलकीने हे जल नगरला आणले आहे. प्रयागराज येथून आणलेल्या या गंगेचे राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते पूजन करून वाटप केले आहे. राजाभाऊ कोठारी यांच्याकडून धर्म कार्याची प्रेरणा व शिकवण मिळाली आहे. त्यानुसारच धर्मासाठी काम करत आहे. यावेळी प्रयागराजला गेलेले संकेत गुरव, यश मुथ्था, अमित सोनग्रा, आदित्य आनेचा, यश सावेकर, अमित लड्डा, दर्शन मुथ्था, श्रवण बोरा, सिद्धार्थ कांकरिया, संकेत रनसिंग, गौरव कांकरिया, ओम दळवी, अनमोल कांकरिया, आदित्य साके, प्रथम दळवी, कुणाल खंडेलवाल, सार्थक तिवारी, मयंक ‘डेलवाल, जिनेश चंगेडे, मयुर जाधव, सर्वेश चंगेडे, तनिष्क व्यास, शुभम मेहेर, मोहित गांधी, विनायक होनराव, पार्थ ठोकळ, निहांशू चेन्नुर, बाली जोशी, राहुल वर्मा, राहुल मेहेर, सुजित साळुंके, अक्षय भापकर, दर्शन बोरा, प्रीत कांकरिया, ओम पांडे, आशिष चंदेल, अलोक पारख, प्रेम देवळालीकर, ईशान दळवी, जतिन सहदेव, हर्ष कांकरिया, अनिकेत कुल्लळ, राजू थोरात व श्रीपाद डोळसे आदी उपस्थित होते

संत मीराबाईंचे चरित्र महिलांसह युवतींना प्रेरणाच देते

श्री राधाकृष्णजी महाराज यांचे प्रतिपादन

नगर – भगवान श्रीकृष्ण हेच पती आहेत. त्यांच्याशिवाय अन्य कोणाचा विचारही न करणाऱ्या संत मिराबाईंचे जीवन चरित्र भारतीय महिलांसह युवतींना प्रेरणादायीच आहे, असे श्री राधाकृष्णजी महाराज यांनी सांगितले.

येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्ट व्दारा शहरात प्रथमच आयोजित केलेल्या संत मीराबाई चरित्र कथा सोहळ्याचे द्वितीय पुष्प गुंफताना नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉनमध्ये ते बोलत होते.

मीराबाईंच्या जन्मापासूनचे प्रसंग बारकाईने निरूपण करताना श्री राधाकृष्णजी महाराज म्हणाले, बालपणी आईने गिरीधर गोपाल तुझे पती आहेत असे मिराबाईला सांगितले. तेव्हापासून मीराबाई श्रीकृष्णाला पती मानत पतीच्या सानिध्याचा, सेवेचा आनंद घेऊ लागली. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई हा मीराबाईंचा भावच पुढे दृढ संकल्प होऊन श्रीकृष्ण रूपात मीराबाईला विलीन होण्यास कारणीभूत ठरला. मीराबाईचा विवाह मेवाडचे राजकुमार भोजराज यांच्याशी ठरवला गेला तेव्हाही मीराबाईने माझा विवाह श्रीकृष्णाशी झालेला आहे, असे राजकुमारला स्पष्टपणे सांगते. मी तुझ्या श्रीकृष्ण भक्तीच्या आड येणार नाही असे

भोजराजने सांगितल्यावर लौकीकार्थाने मीराबाईचा विवाह झाला पण भोजराजशी मीराबाई श्रीकृष्णभक्तीत इतकी तल्लीन राहिली की भगवान श्रीकृष्णाला तिला आपल्या हृदयात स्थान द्यावे लागले. आईने सांगितलेल्या पतीशी एकनिष्ठ कसे रहावे? हे मीराबाईंचे चरित्र सांगते. मानवी संबंधासारखे भगवंताशी नाते निर्माण केले तर भगवंताला भक्तास जवळ घ्यावेच लागते.

विवाहासाठी मुलगी पहाताना तिचा सेवाभाव आणि मुलगा पहाताना त्याचा आदरभाव पहावा. विवाह संबंधात धनास प्राधान्य देवू नये. आपल्या घरासाठी कोणती मुलगी योग्य आहे हे महिला नेमकेपणाने सांगू शकतात. प्रत्येक मुलगी मातृत्व भाव घेऊनच जन्म घेते. स्त्रीने डोक्यावर पदर ठेवावा तो कधीही डोक्यावरून पडू देऊ नये या भारतीय परंपरेमागे मोठे शास्त्र आहे. पदर घेणे हे सौभाग्याचे प्रतिक आहे. किमान पूजा-पाठ करताना, मोठ्यांना नमस्कार करताना डोक्यावर पदर घेतला तरच विशेष आशीर्वाद मिळतो.

पतीची कमाई कमी वाटणाऱ्या महिला काम करतात. मला करिअर करायचे. कॅफेबल व्हायचे असे म्हणत नोकरी स्विकारून आई होण्याच्या सुखापासून दूर रहाण्यात आनंद मानतात. आई झाल्याच तर मुलासाठी वेळ देत नाहीत. मुलं सांभाळण्यास बाई ठेवतात. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलास स्वतः सांभाळत होती. दार्सीकडे मुलाला सोपवत नव्हती. मुलं स्वतः सांभाळण्यातील सुखाचा आनंद आईने घ्यावा. मुलांसाठी प्राधान्याने वेळ द्यावा. शिक्षकांना मुलांकडे ध्यान द्या असे न सांगता आपण मुलांच्या अभ्यासाकडे त्याच्यावर सुसंस्कार करण्याकडे लक्ष द्यावे. बाळाला अंगावरचे दूध पाजताना प्रसन्नपणे पाजले तरच बाळही प्रसन्न रहाते. असे बाळ जीवनभर सर्वांना प्रसन्नता देते. आईच दूध पाजताना रागावलेली, दुःखी असेल तर बाळात आईचा भाव उतरेल. असे बाळ जीवनभर इतरांची मने दुखावत दुःख देत राहिल. बाळाचे उत्तम संगोपन करणे ही आईची एक प्रकारची तपस्याच आहे. बाळाला जन्म देऊन पाळणाधरात किंवा लोकांना सांगण्यासाठी महागड्या होस्टेलला ठेवणे हा आईचा धर्म नाही, असे राधाकृष्णजी महाराजांनी ठणकावून सांगितले.

विमानातील एअर होस्टेस स्वतःचे दुःख बाजूला ठेवून जशी सदैव प्रसन्न रहाते तसे तसे सूनबाईने सदैव प्रसन्न राहिले पाहिजे. आपण समाजाला देशाला आजपर्यंतच्या जीवनात काय दिले? याचे चिंतन जन्मदिनी करावे. मेणबत्या विझवत, केक कापत, सिनेमाची गाणी म्हणत, रात्रीच्या अंधारात जन्मदिन साजरे करू नये. घरातल्यांकडून औक्षण करून घेत मोठ्यांचे आणि मंदिरातील देवांचे आशीर्वाद घेत गोशाळांना चारा व अनाथांना मिष्टान्न भोजन देवून जन्मदिन भारतीय परंपरेप्रमाणे दिवसा साजरा करावा. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगत आपले चारित्र्य जपले पाहिजे. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत आपले जीवन खराब करून घेऊ नका, असे आवाहन करताना राधाकृष्णजी महाराजांनी हलकेच चिमटे घेत दिलेले दाखले उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले.

शहरासह उपनगरवासियांनी उपस्थित राहून संत मिराबाई चरित्र कथा सोहळ्याचा आनंद लुटला. मिराबाईंचे चरित्र आजच्या काळातही मार्गदर्शन करते अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटल्या.

पुरवठा विभागाकडून नगरमधील दुकानांची होणार तपासणी; गव्हाचा साठा करणाऱ्यांवर होणार कारवाई; केंद्राचे निर्बंध लागू

 

नगर – सरकारने काळ्या बाजारातील गव्हाच्या साठ्यांवर निर्बंध घालण्यासाठी घाऊक, किरकोळ विक्रेत्यांना १० मेट्रिक टनापर्यंत मर्यादा घालून दिली आहे. राज्यातील परवानाधारकांना गव्हाच्या साठ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे बंधनकारक करण्यात आली आहे. यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून गहू साठ्याची तपासणी करत मर्यादेपेक्षा अधिक गव्हाची साठवणूक करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून अधिक गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे परवानाधारकांना गव्हाच्या साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहेत.

यासंदर्भात तपासणी करुन मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठेबाजी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत गहू साठ्याची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या १६ डिसेंबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार घाऊक, किरकोळ विक्रेता व प्रोसेसर्सकरिता गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहेत. त्यानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घोषित करणे आवश्यक आहे. याबाबतची तपासणी आणि गव्हाच्या साठ्याची पडताळणी जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे. यात अधिक साठा असणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

व्यापाऱ्यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी

शासनाच्या आदेशानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात गहू साठ्याची तपासणी करण्यात येत आहे. निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक केल्याचे आढळून आल्यास संबंधितांनी साठा कमी करावा. त्यानंतरही साठा आढळून आला तर कारवाई करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पुरवठा विभागाचे भरारी पथक गहू साठ्याची तपासणी करत आहे. संबंधीतांनाची शासन आदेशाची अंमलबजावणी करावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी  हेमा बडे यांनी व्यापाऱ्यांना केले आहे. या संदर्भात त्यांनी मार्केट यार्ड मध्ये सर्व आडते व्यापारी यांची ११ फेब्रुवारी रोजी बैठक घेवून माहिती देत सूचना दिल्या. या बैठकीला व्यापारी प्रतिनिधी गोपाल मणियार,राजेंद्र बोथरा, संतोष बोरा, विश्वनाथ कासट यांच्या सह व्यापारी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी निर्माण होणारे साहित्य घातक

डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांचे प्रतिपादन; शहरात १६ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नगर साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत. मात्र, वृतस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते. यण, केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्याच्या प्रयोजनामध्ये, जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे, असे मत सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केली.

शब्दगंध साहित्य परिषदेच्या १६ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे डॉ. तेडगावकर, पद्‌श्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. याप्रसंगी स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माळवेत संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद देविदास धस, जयंत येलूलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी साहेबराव दरेकर यांना शब्दगध जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर, डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जंगलातील सांबराची परोपकाराची गोष्ट सांगून अध्यक्ष डॉ. तोगावकर म्हणाल्या, आज माणूस स्वत पुरता जगत आहे. जंगलातले प्राणी सुद्धा इतरांसाठी जगातात. माणसाने प्राण्याकडून परोपकार शिकला पाहिजे. आपल्या कळपाला वाचवण्यासाठी प्राणी जीव देतात. पण, माणसे घरे लावून घेतात. आजचा काळ अस्थवस्त करणार आहे. राजकारण, सामाजकरण, कौटुंबिक जीवनात सर्वत्र अस्वस्थता आहे. घरामधील स्त्री सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत, माणिपूर सारख्या घटना घडतात. आपण त्या पाहतो. त्याला विरोध करीत नाही. हे विचार करायला लावणारे आहे. आज आपण एकमेकांशी मोठ्याने बोलायला घाबरत आहोत एकमेकांकडे संजयाने पाहत आहोत. पूर्वीसारखे आता हेल्दी राजकारण आता राहिले नाही. राजकारण्यांनी काही गोष्टी बिघडवल्या असे म्हणता येईल. साहित्यिकांनी दीन, दुबळ्यांची बाजू मांडली पाहिजे खंबीर भूमिका घेतली पाहिजे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. आ. ह. साजुखे यांचे वारसदार आहोत म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे. स्वी स्वातंत्र्याविषयी बोलताना त्यांनी चेटकिणीची गोष्ट सांगून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला स्वीला स्वातंत्र्य धा ती संसाराचा बगीचा करते असे त्या म्हणाल्या.

प‌द्मश्री पोपटराव पवार म्हणाले, शब्दगंध साहित्य चळवळ उभी राहताना मी पाहिली आहे. मात्र, या चळवळीला राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी १२ बलुतेदार आणि १८ पगडजातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले हे आपल्याला साहित्यातून समजते. त्या काळातील परिस्थितीनुसार साहित्य निर्माण होते. संत साहित्य निर्माण झाले. इंग्रज कालखंडात स्वातंत्र्याचा महिमा गाणारे साहित्य निर्माण झाले. साहित्य वाधून माणूस खचत नाही तर उभारी घेतो. साहित्य मानवी जीवनाला प्रेरणा देते नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा कालखंड येत आहे. तंत्रज्ञानाने माणसाच्या मेंदूतील मेमरी कार्ड काढून घेतले आहे. त्यामुळे आता पर्यावरमचे, मानवी जीवनाचे साहित्य निर्माण करावे लागणार आहे.

आ. संग्राम जगताप म्हणाले, नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधशी जोडायचे आहे. नवी पिढी याच्याशी जोडली तर ही परंपरा सुरू राहणार आहे. आजच्या काळात डिजीटल युग असून, वाचन संस्कृती तितकीच सिनेकल महत्त्वाची आहे. साहित्य पिदधान् पिद्धया वाचायला मिळते. नवीन पिढी घडविण्यासाठी नवसाहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. शब्दगंधने अनेक माणसे जोडली. आजच्या घडीला राजकारणी धार्मिक तसेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, त्या पाठीमागे त्याचा वेगळाच अजेंडा असतो. पण, साहित्य माणसात देव शोधायला शिकवते. शब्दगंधमुळे चांगली चळवळ निर्माण झाली आहे. या चळवळी निश्चित बाळ देण्याचे काम करू, असे ते म्हणाले.

पुरूषोत्तम भापकर म्हणाले, साहित्यिक संत असतो आणि संत साहित्यिक असतात. साहित्यातून शेतकरी, दीन, दलित, दुबळ्यांचे दिसून येते. साहित्यातून जातीभेद, लिंग भेद दूर करणारे विचार यायला हवे. प्रत्येक माणूस साहित्यिक असू, असतो त्याच्या चिंतनात सदभाव असते. साहित्यामुळे माणूस वाईट गोष्टीपासून बाजूला राहतो. साहित्य आणि साहित्यिकांना पाठबळ देण्याची जबाबदारी शासन, प्रशासन आणि राज्यकत्यांनी घेतली पाहिजे. आजमितीला सहिष्णूतेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्राला संत, महात्म्यांची परंपरा आहे. मात्र, दुर्दैवाने ते आता गटा-गटाने वाटून घेण्याचा प्रयत्न होत आहे. साहित्यिक म्हणून तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

डॉ. राजेश गायकवाड म्हणाले, शब्दगंध साहित्य संमेलनाकरिता पहिल्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने दोन लाखांचा निधी दिला. त्यासाठी मंडळाकडे प्रयत्न केले. आता मराठी भाषेला अभिजता दर्जा मिळाल्याने येणाऱ्या काळात शब्दगंध साहित्य संमेलनाला पाच लाखाचा निधी मिळणार आहे. दोन लाख राज्य शासनाचे आणि तीन लाख केंद्र शासनाचे असा निधी उपलब्ध होणार आहे. तर, नवलेखकांसाठी खास योजना आखण्यात आली असून, नवलेखकाचे पहिले पुस्तक मोफत प्रकाशित करून देण्यात येणार आहे. तसेच, चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्याांना अनुदानही दिले जाते. त्यासाठी त्यांनी मंडळाकडे पाठपुरावा करावा,

शब्दगंधचा वटवृक्ष होईल माजी आमदार ट्रेकर

साहेबराव दरेकर म्हणाले, साहित्यमध्ये, अभंगामध्ये आपले मनाचा ओलावा पहायला मिळतो. १२ ते १३ शतकात संत मंडळीने निर्माण केलेल्या साहित्याने जातीभेदाच्या मिती तोडल्या. त्यामुळे भविषाकाळ घडवायचा असेल तर आपल्याला भूतकाळ अभ्यासावा लागेल. गेल्या १६ वर्षापासून शब्दगंध परिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असून, त्याचा निश्वितच वटवृक्ष होईल, असा आशावाद व्यक्त केला.

माणसाला न्याय देण्याची भूमिका साहित्यात संपत बारस्कर

स्वागत अध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, तसा साहित्य संमेलनाचा आणि माझा फारसा संबंध आला नाही. मात्र, सोलापूरला झालेले साहित्य संमेलन पाहण्यासाठी गेलो होतो. विद्रोही साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला मिळाले, तिथे वाचल तर वाचाल नाही तर हे वाक्य ऐकले. तेव्हापासून वाचनाकडे लक्ष देत आहे. माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची देण्याची भूमिका साहित्य घेत असते

 

छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे लवकर बसवावेत अन्यथा २५ फेब्रुवारीला सामूहिक आत्मदह

नगर – अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून नगर शहरात आणून बसवण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते व मनपा आयुक्त यांनी १५ दिवसात पुतळा शहरात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसून आंबेडकरी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड व रिपाई नेते विजयराव भांबळ यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी अशोक गायकवाड, रीपाई नेते विजयराव भांबळ, आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड, आरपीआय युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, बामसेफचे शिवाजी भोसले, प्रवीण चाबुकस्वार, देविदास धीवर, उत्तमराव साठे, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोंबे, आंबेडकर आरपीआयचे शहराध्यक्ष संदीप वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनीफ शेख, आरपीआयचे सचिव सुजित घंगाळे, वंचित चे शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, सुरेश पानपाटील, पिनू भोसले, संजय शिंदे, अमोल गायकवाड, सुधीर ठोंबरे, हरीश आल्हाट आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अद्यापही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा स्थापित करण्यासाठी मुख्य वास्तू विशारद मुंबई यांचे ना हरकत व मंजुरीचे पत्र आद्यापही मनपा प्राप्त करू शकले नाही. तसेच चौथ्याऱ्याचे स्ट्रक्चर डिट देखील केलेले नाही. उपोषण काळात मात्र तातडीने प्रांत नगर व कार्यकारी अभियंता व इतर एनओसी घेतल्या गेले. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे अध्यक्षतेखाली समितीची बैठक आयोजित केली नाही, पुतळा स्थापित झाल्यावर तेथील अनेक अपूर्ण कामे पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. आमदार संग्राम जगताप हे ज्यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण १४ एप्रिल च्या आत करतील परंतु महापालिकेच्यास्तरावर जी दिरंगाई चालू आहे त्याचा तीव्र निषेध आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामूळे लवकरात लवकर पुतळे बसवण्यात यावे अन्यथा २५ फेब्रुवारी रोजी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अहिल्यानगर महापालिकेची शहरात महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम

शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे हटवणार; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती

नगर – महानगरपालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून शहरात व उपनगरात सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे. अतिक्रमणधारकांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी मुदतही देण्यात आली होती. आता ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने एक महिन्याच्या कारवाईचे नियोजन केले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाला नियोजनानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

अतिक्रमणांमुळे रस्त्यावर रहदारीला अडथळा होत आहे. विशेषतः मध्यवर्ती शहरात बाजारपेठ व इतर प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात होत आहेत. वारंवार कारवाई करूनही अतिक्रमणे पुन्हा केली जात असल्याने आता अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी एक महिनाभर विविध भागात ही कारवाई केली जाणार आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य, टपऱ्या, हातगाड्या, फलक व इतर कोणतेही साहित्य यापुढे कोणाही अतिक्रमण धारकाला परत केले जाणार नाही. वारंवार कारवाई करून दंड आकारून सोडण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून कारवाईत कोणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा यशवंत डांगे यांनी दिला आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयाकडून १० फेब्रुवारी रोजी स्वस्तिक चौक-पुणे बस स्टॅण्ड-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्केटयार्ड चौक-माळीवाडा वेस ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ११ फेब्रुवारी रोजी हातमपुरा चौक-जुने जिल्हाधिकारी कार्यालय-जीपीओ चौक अशोका हॉटेल झेंडीगेट परिसर, १२ फेब्रुवारी रोजी माळीवाडा वेस-आशा टॉकीज परिसर भिंगारवाला चौक-एम.जी. रोड-मोचीगल्ली-गंजबाजार परिसर, १३ फेब्रुवारी रोजी माणिक चौक भिंगारवाला चौक-एम. जी. रोड, शहाजीरोड, नविपेठ-बँक रोड-लक्ष्मीबाई कारंजा गांधी मैदान चितळेरोड, १४ दाळमंडई-आडतेबाजार-तेलीखुंट चितळेरोड-नेहरु मार्केट-चौपाटी कारंजा-दिल्लीगेट, १७ फेब्रुवारी रोजी जुना दाणे डबरा मंगलगेट परिसरराज चेंबर कोठला परिसर एस.टी. वर्कशॉप-रामवाडी, १८ फेब्रुवारी रोजी सर्जेपुरा चौक-रंगभवन-लालटाकी परिसर सिव्हील हॉस्पीटल, २० फेब्रुवारी रोजी दिल्लीगेट-सिध्दीबाग-बालिकाश्रमरोड-सावेडीगांव, २१ फेब्रुवारी रोजी टी.व्ही. सेंटर प्रोफेसर कॉलनी-भिस्तबागरोड-भिस्तबागचौक-पाईपलाईनरोड-श्रीरामचौक शिलाविहार-गुलमोहरोड पोलीस चौकी पारिजात चौक-गुलमोहररोड ते भिस्तबाग रोड, २४ फेब्रुवारी रोजी पत्रकारचौक-मनमाड रोड-नागापुर-मनपा हद्दी पर्यंत, २५ फेब्रुवारी रोजी हॉटेल चैतन्य क्लासिक काकासाहेब म्हस्के कॉलेज ते गांधीनगर, २७ फेब्रुवारी रोजी पाईपलाईनरोड-डी मार्ट-बंधनलॉनआठरे पाटील पब्लीक स्कुल तपोवनरोड-भिस्तबाग महाल-नानाचौक-ढवणवस्ती ते जुना पिंपळगांवरोड, २८ फेब्रुवारी रोजी कोठला स्टॅण्ड-डी.एस.पी चौक-छत्रपती संभाजी महाराज रोड-वसंत टेकडी ते इंद्रायणी हॉटेल पर्यंत,

३ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड-फरिस्ट ऑफिस ते बडी मस्जीद पाण्याची टाकी ते मेराज मस्जीद ते राजनगर, गाडे शाळा- टॉपअप पेट्रोल पंप, ४ मार्च रोजी कोठला स्टॅण्ड-जीपीओचौक चांदणी चौक कोठी चौक मार्केट यार्ड चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक-सक्करचौक-कायनेटीक चौक, ५ मार्च रोजी सक्कर चौक मल्हार चौक रेल्वे स्टेशन परिसर कायनेटीक चौक, ६ मार्च रोजी कायनेटीक चौक-केडगांव-अंबिकानगर बस स्टॉप व केडगांव परिसर, ७ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चाणक्य चौक-बुरुडगांवरोड-यश पॅलेस हॉटेल-आनंदऋषी हॉस्पीटल चाणक्य चौक महात्मा फुले चौक ते कोठी, १० मार्च रोजी सक्कर चौक-टिळकरोड-आयुर्वेद कॉलेज-अमरधाम नेप्तीनाका कल्याणरोड रेल्वे उड्डाणपुल या नियोजनानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

नगर जिल्ह्यात १०९ केंद्रांवर बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात

सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर चालू, पहिला पेपर मास्टर प्लॅन नुसार सुरळीत

नगर – नगर जिल्ह्यात १०९ केंद्रांवर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या लेखी परीक्षेला ११ फेब्रुवारी पासून सुरूवात झाली. परीक्षेसाठी जिल्ह्यात  ६३ हजार ६५८ विद्यार्थी आहेत. परीक्षा केंद्रावरील सरसकट शिक्षक, शिक्षकेतर आणि परिचर यांच्या आदला-बदल करण्यास शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर आता गेल्या पाच वर्षात परीक्षेत गैरप्रकार झालेल्या केंद्रांवरील पर्यवेक्षण यंत्रणेत बदल करण्यात आला आहे. तसेच सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही ची नजर असून गैरप्रकार रोखण्यासाठी प्रथमच सर्व केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येत आहे.

परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दक्षता समितीची बैठक घेवून महत्वपूर्ण कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे. शिवाय केंद्राबाहेर गोंधळ घालणार्‍यांवर ड्रोन कॅमेर्‍यांचा वॉच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला तसेच जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष  येरेकर हे वेब कास्टिंग द्वारे परीक्षेचे अपडेट घेत असून महत्त्वपूर्ण सूचना प्रसारित करीत आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील संवेदनशील व महत्त्वाच्या परीक्षा केंद्रांचे वेब कास्टिंग होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा ,सीसीटीव्ही तसेच परीक्षा केंद्रातील वेब कास्टिंग आदी व्हिडिओ फुटेच्या माध्यमातून दक्षता समिती सदस्य वेब कास्टिंगची मॉनिटरिंग हाय अलर्ट मोडवर करत आहेत. काही मिनिटांच्या ठराविक कालांतराने वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी वार रूमला भेट देऊन महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांचे ‘लक्ष’

ज्या शाळेत कॉपीचा प्रकार निदर्शनास येईल, त्या शाळेची परीक्षा केंद्रासह मान्यताही रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला आहे. १० वी व १२ वीची बोर्ड परीक्षेसंदर्भात जिल्हास्तरीय दक्षता समिती सदस्यांनी परीक्षा सुरू होताच विविध पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, बाळासाहेब बुगे (शिक्षणाधिकारी – योजना), पोलिस निरीक्षक खेडकर, आकाश दरेकर, सुरेश ढवळे, श्रीराम थोरात आदी समिती सदस्य जिल्ह्यातील विविध केंद्रांवर नकारात्मक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

गैरमार्गाची प्रकरणे निरंक करण्यासाठी अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणार्‍या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचार्‍यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचार्‍यांमधून करण्यात येणार आहे, परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहे.

तर परीक्षा केंद्र व शाळेची मान्यता होणार रद्द

कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवेदनशील केंद्रावर ड्रोन कॅमेरे, गैरप्रकारात सहभागी परीक्षा केंद्राची मान्यता रद्द, गैरप्रकारात सहभागी शाळेची मान्यता रद्द, परीक्षा केंद्रांचे पथकामार्फत वेबकास्टींग मॉनिटरींग, परीक्षा केंद्रावरील बैठे पथकांचे दोन स्तर, मोबाईल अँपच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर वॉच, सर्व परीक्षा केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे असणार, जिल्हा आणि तालुकास्तरावरुन विशेष भरारी पथक, संवेदनशिल केंद्रावर जास्त बंदोबस्त, राज्य परीक्षा मंडळाकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून जिल्हाभरात ही पथके कार्यरत झाली आहेत.

वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विठ्ठल सातपुते यांच्यावर कारवाई करावी

नगर – केडगाव येथील विठ्ठल सातपुते यांनी वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहे. व्यक्तिगत वादामध्ये समाजाला ओढण्याचे काम केले जाते, वंजारी महिलेला देखील लज्जास्पद बोलून महिलेच्या विशिष्ट भागाला सिगरेटचे चटके देऊन मारहाण करण्याची भाषा वापरली जाते. ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी गोष्ट आहे, विठ्ठल सातपुते हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून तो मोबाईलवर बोलताना म्हणतो की मी आबा सातपुते रांगोळी हॉटेल दिलीप सातपुतेचा भाऊ सगळ्यांचा बाप अशी अरेरावीची भाषा वापरून दमदाटी करून कायद्याचा कुठलाही धाक नसल्याचे दाखवत आहे, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम या व्यक्तीकडून होत आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला जातीय सलोखा बिघडला असून अशा व्यक्तींपासून आपल्या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो तरी पोलीस प्रशासनाने आबा सातपुते या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी वंजारी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी भीमराज आव्हाड, वैभव ढाकणे, कैलास गर्जे, संतोष ढाकणे, राहुल सांगळे, ओंकार आव्हाड, सतीश ढाकणे, रामदास सांगळे, भाऊसाहेब वनवे, संदीप ढाकणे, आकाश जावळे, अजय गीते, विक्रांत पालवे, ओंकार घुले, शुभम आघाव, संकेत दहिफळे, युवराज आव्हाड, अक्षय आघाव, कौस्तुभ गायकवाड, विकास राठोड, योगेश आव्हाड, मल्हारी आव्हाड, तुलसीदास बोडके, संदीप ढाकणे आदी उपस्थित होते. आबा सातपुते यांनी बोलताना भान बाळगले पाहिजे, व्यक्तिगत भांडणांमध्ये समाजाला ओढून जातीवाचक शिवीगाळ करणे योग्य नाही जर त्यांच्यामध्ये गुर्मी असेल तर आम्ही त्यांना धडा शिकवू, यांच्यावर पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही तर आम्ही समाजाच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा भीमराज आव्हाड यांनी दिला. दारूच्या नशेमध्ये टेबलावर बसून वंजारी समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाच्या भावना दुखावल्या आहे. आज पोलीस प्रमुख यांची भेट घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. चितावणीखोर वक्तव्य करून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचे काम आबा सातपुते यांनी केले आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले जाईल असा इशारा वैभव ढाकणे यांनी दिला.

समाजातील संवेदना जागृक करण्यासाठी, निस्वार्थ सामाजिक कार्य पुढे आणण्याची गरज

सिद्धराम सालीमठ यांचे प्रतिपादन; ऋणानुबंध संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान

नगर – समाजात संवेदना बोथट होत चालल्या असून, निस्वार्थपणे समाजासाठी कार्य करत असलेल्यांचे कार्य पुढे आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे समाजाला एक प्रेरणा, दिशा व ऊर्जा मिळणार असल्याचे स्पष्ट करून, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी समाजातील संवेदनांची गऋणानुबंध बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा २०२३-२४ यावर्षीचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शहरातील माऊली सभागृहात पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. याप्रसंगी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, ऋणानुबंध संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी, सचिव प्रशांत बंडगर, सुफी गायक पवन नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सामाजिक कार्य करणाऱ्यांचा आदर्श समोर ठेवून, समाजातील संवेदना जागृक करण्याचे काम केले गेले पाहिजे. विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्यांची एक पुस्तिका तयार करून ती सर्वांपर्यंत पोहोचल्यास या कामाची व्याप्ती वाढणार आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते कुवत नसताना देखील संघर्षातून सामाजिक कार्य करत आहे, त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात अजित रोकडे यांनी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींचे काम लोकांसमोर आणून त्यांचा सन्मान करणे व नागरिकांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचविणे, हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश्य असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदी-मराठी गीतांची मैफल रंगली होती. यामध्ये शिर्डीवाले साईबाबा, बेखुदी ने सनम, देखा एक ख्वाब, तुमसे मिलकर ऐसा लगा आणि अन्य हिंदी-मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. रसिक श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थितांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पुणे येथील उद्योजक विजय मोरे, तृतीयपंथीय डॉ. आम्रपाली उर्फ अमित मोहिते, नाशिकचे महंत डॉ. रत्नाकर पवार, संदीप सोनवणे, लातूरचे कृषी क्षेत्रातील कार्य करणारे बाळासाहेब दाताळ, आरोग्य क्षेत्रातील डॉ. दीप्ती साळी, शिक्षण क्षेत्रासाठी शिशु संगोपन संस्थेचे दशरथ खोसे, इतिहास संशोधन आणि संवर्धन कार्यासाठी पत्रकार भूषण देशमुख व मराठी भाषा संवर्धनासाठी तुकाराम जगताप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, कृषी व ग्रामीण पत्रकारितेसाठी कै. अशोक तुपे यांना मरणोपरांत पुरस्काराने गौरविण्यात आले. याचबरोबर सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षापासून योगदान देत असलेले हेल्पिंग हॅन्ड्स फॉर हंगर्स ग्रुप, बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड, सावली संस्थेचे नितेश बनसोडे आणि श्रीगोंदा येथी पारधी आदिवासी मुलांसाठी संस्था चालवणाऱ्या शुभांगी झेंडे यांना विशेष सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यानंतर सभागृहात सोडत पद्धतीने भाग्यवान विजेत्यांना पैठणी साडीचे बक्षीस देण्यात आले. सूत्रसंचालन चारुता शिवकुमार यांनी केले. आभार सारिका रघुवंशी यांनी मानले.