गाडगीळ पटांगणातील भाजी विक्रेत्यांची आमदार संग्राम जगताप यांच्यासमवेत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे मागणी
नगर अमरधाम समोरून कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात त्यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम होत असतो. तासनतास लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्याला सामोरे जावे लागते, महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये ओटे बांधून व्यवस्था करून दिली असताना देखील भाजीवाले रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसत आहे. सर्व भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसावे अन्यथा आम्हीही रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसू असा इशारा भाजी विक्रेत्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिला. यावेळी आयुक्त डांगे यांनी लाईट व स्वच्छता तसेच बसण्याची व्यवस्था करण्याचे व रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना भाजी बाजारात बसण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले
शहरातील गाडगीळ पटांगणमधील भाजी विक्रेत्यांनी आ. संग्राम जगताप यांच्या समवेत आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेत रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगण मध्ये बसवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी संतोष कानडे, अजय विधाते, अक्षय निमसे यांच्यासह भाजी विक्रेते उपस्थित होते.
गाडगीळ पटांगण मधील भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसवण्याची व्यवस्था करावी, या ठिकाणी अमरधाम असून येथे अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. वाहतूक कोंडीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये बसण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अशी मागणी आयुक्त यांच्याकडे
आ. संग्राम जगताप यांनी केली