छावा’ चित्रपटाच्या स्वागतासाठी सावेडी गावातून छत्रपती संभाजी महाराज यांची काढली मिरवणूक

0
53

 

तरुणांचा मोठा सहभाग; शासनाने ट्रॅस फ्री करावा शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा : सावेडी ग्रामस्थांची मागणी

नगर – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात
छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमाचा इतिहास व जीवन चरित्राचे दर्शन घडविण्यात आले आहे. तरुणांना छत्रपती संभाजी
महाराजांचा प्रेरणादायी खरा इतिहास समजावा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या पिढीसमोर यावा. यासाठी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने छावा चित्रपटाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अश्वारूढ छत्रपती संभाजी महाराज, भालदार चोपदार, मावळे, भगवे झेंडे, पारंपरिक तुतारी व संबळ वाद्यांचा निनादात सावेडी गावातील तरुणांनी भगवा पंचा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती
संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत सावेडी गावातून मोठ्या थाटामाटात छत्रपती संभाजी महाराजांची मिरवणूक काढली. यानंतर मिरवणूक कोहिनूर मॉल येथे आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे
औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली. छावा चित्रपट बघण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा अमोल बारस्कर यांनी केली होती.
छावा चित्रपट पाहिल्याच दिवशी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील छत्रपती संभाजी
महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास पाहून प्रेक्षक भारावून गेले. छावा चित्रपट शासनाने
ट्रॅस फ्री करावा. तसेच शालेय विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखविण्यात यावा, अशी
मागणी सावेडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.