मुंबई पोलीसांची आशिया खंडामध्ये चांगली कामगिरी करणारी ओळख आहे

0
40

हनीफ शेख यांचे प्रतिपादन; प्रथमेश धिवर याची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधानाचे पुस्तक भेट देत सत्कार

नगर – विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरीसाठी खूप कष्ट घ्यावे लागते. हे काम प्रथमेश धीवर यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पूर्ण करून दाखवले सर्वसामान्य कुटुंबात वाढला असून आपले
शिक्षण पूर्ण करत पोलीस दलात जाण्याचे स्वप्न बाळगले होते आणि ते त्यांनी पूर्ण केले. त्याचे
वडील बाळासाहेब धीवर यांनी मोल मजुरी करून आपल्या मुलाला शिक्षण दिले त्यामुळेच तो पोलीस
दलात भरती झाला आहे. मुंबई पोलीसांची आशिया खंडामध्ये चांगली कामगिरी करणारी ओळख
आहे. त्याच्या हातून नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच देशाची चांगली सेवा घडावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संविधानाचे पुस्तक भेट देऊन प्रथमेश धीवर याचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष हनीफ
शेख यांनी दिली. मुंबई पोलीस सेवेमध्ये प्रथमेश धीवर याची निवड झाल्याबद्दल वंचित बहुजन आघाडी तर्फे संविधानाचे पुस्तक भेट देऊन सत्कार करताना शहराध्यक्ष हनीफ शेख, शहर महासचिव अमर निरभवने, जिल्हा संघटक सूधिर ठोंबे, पिनु भोसले, संजय शिंदे, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष बबलू भिंगारदिवे, बाबासाहेब धिवर,
जालू पाटोळे, आनंद धिवर, तेजस धिवर, आदित्य धिवर, श्रेयश धिवर, संकेत धिवर, सोमनाथ धिवर,
ईश्वर धिवर, किरण धिवर, बाळासाहेब धिवर, प्रविण ओरे आदी उपस्थित होते.
प्रथमेश धीवर म्हणाले की शालेय शिक्षण घेत
असताना पोलीस दलामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न
बाळगले होते ते मी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या
जोरावर पूर्ण केले आहे यासाठी आई-वडिलांचे
कष्ट कामाला आले. वंचित बहुजन आघाडी
पक्षातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यासमोर संविधानाचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला
या माध्यमातून पुढील चांगल्या कामासाठी मला ऊर्जा मिळाली
असल्याचे ते म्हणाले