सुवर्णकार समाजाच्यावतीने संत नरहरी महाराज पुण्यतिथी सप्ताहाची सांगता
नगर – आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येक जण प्रचंड वेगाने धावताना आमचा मनुष्य जन्माचा नेमका हेतू काय ? हेच विसरत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये संत न नरहरी महाराज यांनी निस्पृहपणे केलेलली विठ्ठल भक्ती,
त्यांचे विचार, त्यांचे कार्य जाणून घेतले आणि ते कृतीत आणले तर आपल्या जीवनाचा खर्या अर्थाने
उद्धार होईल. संत नरहरी महाराजांचे कार्य खर्या अर्थाने आजही समाजाला प्रेरणादायी ठरेल, असा विचार
ह.भ.प. जनार्दन महाराज माळवदे यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर येथील लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने संत
शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कोर्ट गल्ली येथील विठ्ठल रुमिणी मंदिरात आयोजित सप्ताहाच्या समारोपप्रसंगी काल्याचे किर्तन करताना ते बोलत होते. त्याप्रसंगी नगर शहर व जिल्ह्यातील समाज बांधव, भक्त मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून लाड सुवर्णकार समाजाच्या विश्वस्त पदी नेमणूक झालेल्या नूतन सदस्य
शरद कुलथे (भिंगार), गणेश डहाळे (केडगाव), विनोद लिंबीकर (नगर), योगेश नागरे (केडगाव) यांचा समाजाचे विश्वस्त
सचिन देवळालीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सप्ताह निमित्त स्वर्गीय राधाबाई निफाडकर यांच्या स्मरणार्थ महाप्रसादाची सेवा देणारे विश्वस्त मुकुंद निफाडकर आणि परिवाराचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी लाड सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजय देवळालीकर, मुकुंद निफाडकर, प्रकाश देवळालीकर, सचिन देवळालीकर, सुरेश मैड, जगदीश देडगावकर, श्याम मुंडलिक आदीसह समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाड सुवर्णकार युवा संघटना, लाड सुवर्णकार समाज, हरिओम भजनी
मंडळ व शहरकर परिवार यांचे सहकार्य लाभले. स्वागत अध्यक्ष संजय देवळालीकर यांनी तर आभार सुरेश मैड
यांनी मानले