फुले चित्रपट टॅस फ्री करून लाडया बहिणींना मोफत दाखवावा

नगर – देशात सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडविणार्‍या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित फुले हा चित्रपट स्त्रियांना नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे. हा चित्रपट सरकारने टॅस फ्री करावा व देशभरातील लाडया बहिणींना मोफत दाखवावा, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात यांनी केली आहे.

प्रकाश थोरात म्हणाले की, जगातील दुःख स्त्रीय्पुरुष विषमतेतून निर्माण झाले आहे. ही विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य झोकून दिले. दीडशे वर्षांपूर्वीच त्यांनी स्त्री व दलितांच्या शिक्षणासाठी संघर्ष करून सामाजिक न्यायाचा पाया घातला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू केल्या आणि वाचनालयांचे जाळे उभारले. १८५४ मध्ये त्यांनी देशातील साक्षरता अभियानाची सुरुवात केली. विधवांच्या
संगोपनासाठी १८६३ मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्याचबरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना करून हुंड्याशिवाय विवाहाची प्रथा रूढ केली. अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून जातिभेदाच्या विरोधात पहिले पाऊल उचलले. त्यांनी बालविवाह विरोधात आवाज उठवला आणि विधवांच्या पुनर्विवाहाला प्रतिष्ठा दिली. स्वतः च्या मुलाचा आंतरजातीय विवाह घडवून आणत जाती निर्मूलनाच्या चळवळीला स्वतःच्या घरातून सुरुवात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा आजच्या महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांच्या कार्याची गाथा फुले या चित्रपटात मांडली असून, तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे, असे प्रकाश थोरात यांनी सांगितले. या चित्रपटातून आजच्या महिलांना प्रेरणा व आत्मविश्वास वाढवणारी दिशा मिळेल आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला नवे
बळ मिळेल, असेही ते म्हणाले.

महिलांच्या पुढाकाराने केडगाव येथील हनुमाननगर परिसरात श्रीमद् भागवत कथा व शिवलीलामृत पारायण सोहळा उत्साहात

नगर – केडगाव येथील हनुमाननगर परिसरात विठ्ठलय्रुमिणी मंदिराच्या प्रांगणात ७ दिवस चाललेल्या श्रीमद् भागवत कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता २७ एप्रिल रोजी उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. या सप्ताहाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील महिलांनी पुढाकार घेऊन संपूर्ण सोहळ्याचे आयोजन व नियोजन केले होते.
हा धार्मिक सोहळा सलग तिसर्‍या वर्षी आयोजित करण्यात आला. सप्ताहात दररोज काकड आरती, ग्रंथ वाचन, हरिपाठ व
श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हालेला होता. या धार्मिक कार्यक्रमाची
सांगता ह.भ.प. बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. बाबाजी महाराजांनी राम व कृष्ण चरित्रातील साम्य व वैशिष्ट्ये प्रभावीपणे उलगडून दाखवली. विशेषत: तरुण-तरुणींना जीवनातील संस्कारांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी आजच्या काळातील दुष्ट शक्तींचा नाश करण्याची गरज अधोरेखित केली. यावेळी पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उपस्थितांनी निषेधही व्यक्त केला. या धार्मिक सप्ताहात ह.भ.प. केशव महाराज बाबर
देऊळगावकर यांच्या प्रभावी वाणीने भाविक मंत्रमुग्ध झाले. कथेमध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून कृष्णचरित्रातील क्रांतीकारक बाजू उलगडण्यात आली. काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून सप्ताहाची सांगता करण्यात आली. बाबाजी महाराज चाळक यांचा परिसरातील सर्व महिलांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी इंदुबाई कदम, सुनीता पवार, निर्मला इंगळे, भक्ती पवार, सरिता भगत, रोहिणी बनकर, शितल नाडे, अ‍ॅड. निलीमा मुसळे, नंदा नामदास आदी महिलांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमासाठी विजय भालसिंग, अ‍ॅड. गोरख मुसळे उपस्थित होते. या सप्ताहात ह.भ.प. गणेश महाराज गोंडे, विष्णु महाराज घुणे, दत्तात्रय महाराज तापकीर, उमेश महाराज माळी, दिलीप महाराज खळतकर, माऊली महाराज सौताडे यांनी संगीताच्या साथीसह वातावरण अधिक रंगतदार केले. शेवटी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण सप्ताह सोहळा हनुमाननगर येथील शिवभक्त युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने यशस्वीपणे पार पडला.

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरवापसीसाठी तिप्पट पैसे मोजावे लागल

घर वापसीसाठी शासनाने मोफत सेवा द्यावी; पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

नगर – काश्मीर खोर्‍यातील पहेलगाम जवळील बायसरण परिसरात झालेल्या अमानवी व भ्याड दहशतवादी हल्ल्याचा
तृतीयपंथी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला व या हल्ल्यात बळी पडलेल्या २६ निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन करून प्र. निवासी जिल्हाधिकारी अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु समवेत लैला गुरु, सना, गौरी, फिजा, दिया, मीनाक्षी, मोहिनी, अदा, शिवण्या, रिजवाना, सुलताना, मीरा, आयत, रोशनी, तेजू, मनू, मीना, संध्या गुरु, मोहनी, साधना, शुभांगी,
आकांक्षा आदीसह तृतीयपंथी समाज उपस्थित होता. पुढे निवेदनात म्हटले आहे की, जम्मू काश्मीर पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेलेले नागरिक हे महाराष्ट्र व विविध राज्यातून आले होते मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडले व त्यांना घर वापसीसाठी काही विमान कंपन्यांकडून ४० ते ५० हजार रुपये तिकिटासाठी घेतले. हे तिप्पट पैसे वसूल करण्यात आले ही दुर्दैवी बाब असून ही दुसरी लूट आहे. या लुटारू विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व
याच्याहून पुढे शासनाने मोफत सुविधा देण्यात यावी. तसेच या संपूर्ण मनमानी तिकीट दर वाढीला निर्बंध लावण्यात यावे
या मागणीसाठी व दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. पुढे काजल गुरु म्हणाले की, आम्ही जम्मू काश्मीर येथे सहा तृतीयपंथी अडकून पडलो त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधून यांनी मदत केली व जम्मू काश्मीर येथे गिरीश महाजन यांनी भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आम्ही परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच विविध राज्यातून आलेले पर्यटक यांना तिप्पट मनमानी तिकीट दर घेतले. याकडे देखील शासनाने लक्ष घालावे कारण सर्वसामान्य कुटुंबाला
इतका खर्च परवडणारा नसून शासनाने मोफत सेवा दिली पाहिजे होती अशी भावना व्यक्त केली.

ईस्ट इंडिया फर्टिलिटी कॉन्व्हलेव २०२५ मध्ये नगरमधील डॉ. हृषीकेश पंडित यांचा सहभाग

गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रियेचे यशस्वी सादरीकरण

नगर – पश्चिम बंगालमधील कोलकता येथील नामांकित आयएलएस हॉस्पिटलमध्ये नुकतीच ईस्ट इंडिया फर्टिलिटी कॉनलेव्ह २०२५ ही वैद्यकीय कॉन्फरन्स पार पडली. यामध्ये अहिल्यानगर येथील डॉ.हृषीकेश पंडित यांनी सहभाग घेवून लॅप्रोस्कोपीव्दारे अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. कॉन्फरन्समध्ये फर्टिलिटी एनहान्सिंग एंडोस्कोपिक सर्जरी कार्यशाळा झाली. यात डॉ. पंडित यांनी एक अत्यंत लिष्ट व गुंतागुंतीची लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीपणे सादर केली. संबंधित रूग्णाची पूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली होती. आता पुन्हा गर्भधारणा होण्यासाठी ट्युबचे रिव्हर्सल आवश्यक असल्याने लेप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अनेक कारणांमुळे आव्हानात्मक होती. डॉ.पंडित यांनी हे आव्हान स्विकारून आपला अनुभव, कौशल्य वापरुन शस्त्रक्रिया
अतिशय कुशलतेने व अचूक पार पाडली. यावेळी उपस्थित डॉटरांनी त्यांचे कौतुक केले. परिषदेत या शस्त्रक्रियेचे थेट
प्रक्षेपण करण्यात आले होते. देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ, एंडोस्कोपिक सर्जन यावेळी उपस्थित होते. डॉ.अमत बसू,
डॉ.पुषन कुंडु, डॉ.अभिनीबेश चॅटर्जी, डॉ.अरूण टांटिया, डॉ.रूची पिपारा अशा अनेक डॉटरांनी डॉ.पंडित यांचे
कौतुक केले. डॉ.हृषीकेश पंडित हे भिंगार येथील पंडित हॉस्पिटलचे संचालक असून इंडियन असोसिएशन ऑफ गायनेकॉजीस्ट एडोस्कोपिस्टस संघटनेचे मॅनेजिंग कमिटी सदस्य आहेत. ते नगरमधील पहिले ३ डी लेप्रोस्कोपी
सेंटर पंडित हॉस्पिटलचे संस्थापक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जटील व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत.

डांबून ठेवलेल्या तीन युवकांची वेठबिगारीच्या विळख्यातून सुटका

नगर – पारनेर तालुयातील हंगा गावात मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. श्री  मृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांना ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

२५ एप्रिल रोजी मध्यरात्री श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, जिल्हा समन्वयक सिराज शेख व मंगेश थोरात यांनी हंगा गावात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा  करून त्यांनी वेठबिगारीच्या गुलामगिरीत अडकलेल्या तीन युवकांची माहिती मिळवली. प्रकाश साळुंके या व्यक्तीने अहिल्यानगर रेल्वेस्थानक परिसरातून दुर्बल, परावलंबी व असंघटित अशा तीन युवकांना फसवून पळवून नेले होते आणि त्यांच्याकडून घरकाम, लोहारकाम, घोडे सांभाळणे व शेण उचलण्याचे काम बळजबरीने करून घेत होते.

या युवकांना कोणताही मोबदला न देता, काम न केल्यास त्यांना शिवीगाळ व मारहाण केली जात होती. युवकांच्या पाठीवर झालेल्या मारहाणीच्या जखमा पाहून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिराज शेख यांनी तातडीने सुपा पोलीस स्टेशनला संपर्क साधला. सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे व पो. कॉ. विकास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी तत्काळ कारवाई करत युवकांची सुटका केली. सुटका केलेल्या युवकांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून, त्यांचे संरक्षण व पुनर्वसनाकरिता त्यांना श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आरोपी प्रकाश साळुंके याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय न्याय
संहिता (बी.एन.एस) २०२३ चे कलम ११५, ३५१(२), ३५२, १२७(२) आणि बंदबिगार पद्धती अधिनियम १९७६ अंतर्गत कलम १६ व १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, सिराज शेख, मंगेश थोरात, संध्या कुलकर्णी, मयुरी वनवे, ऋतिक बर्डे तसेच आंतरराष्ट्रीय न्याय मिशन (आयजेएम) च्या लिला नंदा व गोरख जाधव यांनी महत्वाची भूमिका बजावली.

अहिल्यानगर शहरातील पीठ गिरणीच्या दळण भावात १ जूनपासून वाढ

नगर – अहिल्यानगर मनपा हद्दीतील पीठ गिरणी संघटनेची वार्षिक सभा दत्त मंदिर पाईप लाईन रोड येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुडे होते. सभेच्या प्रारंभी काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने भाव वाढ करणे, सर्वांनी एकचभावाने दळणे, दर शनिवारी प्रत्येकाने गिरणी बंद ठेवणे,
एमएसईडीसीएल (चडएइ) ला घर घंटी व प्रीपेड मीटर बद्दल अर्ज देणे, सदस्य समिती कार्यान्वित करणे, प्रत्येक
सदस्याने सभासद फी दर वर्षी जमा करणे व त्याचे हिशोब ठेवणे याची अंमलबजावणी सभेमध्येच सुरु करण्यात आली.
सभेमध्ये दळणाचे भाव वाढविण्यावर सर्वच गिरणी चालक मालक व कारागिर यांचे एकमत झाले व १ जूनपासून
दळणाचे भाव खालीलप्रमाणे राहतील असे ठरले. गहू, ज्वारी, बाजरी : ७ रुपये किलो, डाळी, तांदुळ, नाचणी : १२ रुपये किलो, रवा, भरडा, एस्सर : १५ रुपये किलो. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पंडित खरपुडे यांनी सभासदांना सांगितले की, एकजुटीने काम करणार्‍यांचा नेहमीच विजय होत असतो व संघटना नेहमीच पीठ गिरणी चालक, मालक व कारागिर यांच्यासाठी काम करत आलेली आहे व यापुढेही सभासदांसाठी काम करणार आहे. कार्याध्यक्ष अकबर पठाण यानी सांगितले की, सर्व गिरणी व्यवसायिकांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा, भूलथापांना व अफवांना बळी पडू नये.

सल्लगार हाजी जमीर शेख यानी सांगितले की, आपण अहिल्यानगर शहराचे आठ प्रभाग केलेले असून, प्रत्येक
प्रभागात सहा समिती सदस्य नेमलेले आहेत. या सर्व समिती सदस्यंची बैठक लवकरच घेण्यात येणार असून, यावेळी सर्व
समिती सदस्यांनी हजर रहावे.

यावेळी रूपेश मिश्रा, निखिल गुज्जर, शिवाजी बोरुडे या सभासदांनी समस्या मांडल्या. या सर्व समस्यांचे निवारण
संघटनेचे अध्यक्ष रामकिसन सुपेकर यानी केले. यावेळी संघटनेचे, पदाधिकारी, उपाध्यक्ष अरुण गिरम, चंद्रकांत ताठे, खजिनदार वीरेंद्र शिंदे, सहसचिव समीर पठाण, बजरंग गव्हाणे, संघटक गणेश अडसरे, महिला सदस्या श्रीमती अलका तागड आदी उपस्थित होते. संघटनेचे सचिव वैभव मुळे यानी सूत्रसंचालन केले. शेख मुश्ताक यांनी स्वागत केले तर आभार संघटक शंकर म्हस्के यांनी मानल

तर नगरमधील इंग्रजी शाळेत हनुमान चालीसा पाठ करणार

नगर – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा मनमानी कारभार व सुरू आहे. याबाबत अनेकदा मनविसेने शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या शाळांमध्ये हिंदू धर्मविरोधी कारवाया सुरु आहेत. तसेच पालकांची सर्रास आर्थिक पिळवणूक केली जात आहे. त्यावर शिक्षण विभाग थातूरमातूर एखादं पत्र काढून शांत
बसतं आणि या सर्व शाळांचा मनमानी कारभार सुरूच राहतो. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या कार्यालयात घेराव
घातला. शाळांमधील हा गैरकारभार थांबला नाहीतर इंग्रजी शाळेत हनुमान चालीसा पाठ करण्यात येईल,
असा इशारा त्यांनी दिला.

शासनाच्या आदेशाचे पालन जर शिक्षण विभागाला करता येत नसेल तर आम्ही समर्थ आहोत. आम्ही त्या धर्मांध शाळांच्या मनमानी कारभारास विरोध करणार आहोत. या शाळांमध्ये गंध लाऊ न देणे, पैंजण घालू न देणे, हिंदू सणावाराला मेहेंदी काढू न देणे या सर्व फतव्यांना विरोध करणार आहोत. तसेच या शाळांमधून विशिष्ट धर्माच्या प्रार्थना जर थांबल्या
नाहीत तर आम्ही या शाळांमध्ये जाऊन हनुमान चालीसा पाठ करू, असे सांगितले. त्यावर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी तात्काळ शहरातील २० इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सर्व्हे करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि दोषी शाळांवर मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, युवती जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहराध्यक्ष अनिकेत शियाळ सहभागी झाले होते.

काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फौंडेशनने साधला संवाद; विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणार

नगर – काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने नुकताच होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक समस्या, परिक्षा, इंटर्नशिप, लेचर आदींबाबत
चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबंधित विद्यापीठांना कॉलेजबाबत घडलेल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली असून विद्यापीठ पदाधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठांसोबत लवकरच  बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सुचना करेल त्यानूसार विश्वस्त आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू देणार नसल्याचे सांगण्यात आले. काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या बोल्हेगाव फाटा येथील शैक्षणिक संकुलात १७ एप्रिल रोजी जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर  प्रक्रियेमुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण होवून चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या. विशेषत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र व्यवस्थापन याबाबत सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असून
एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू दिले जाणार नसल्याची ग्वाही पुन्हा एकदा काकासाहेब म्हस्के
मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे सीईओ समीर ठाकरे यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत
आणि सुरळीतपणे पार पडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुल व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद
कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य
डॉ.विवेक रेगे, उपप्राचार्या डॉ.पुनम गायकवाड, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदीप
बडधे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार, प्रा.डॉ.निलिमा भोज, प्रा.नितीन ठुबे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

सीईओ ठाकरे पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या आवारात  घडलेल्या घटनेबाबत तातडीने संबंधित विद्यापीठांना कल्पना
दिली गेली असून त्यांनी परिस्थिती समजून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टीने सहकार्याची भावना दर्शविली आहे. यासाठी ते लवकरच बैठकीचे आयोजन करणार असून यात सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या जाणार असून चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे. फार्मसीच्या परिक्षांबाबत पर्यायी परिक्षा केंद्र विद्यापीठांनी उपलब्ध करुन दिल्याने परिक्षा व्यवस्थितपणे व ठरलेल्या वेळेत पार पडत आहेत. आगामी काळातही इतर शाखांच्या परिक्षाही व्यवस्थित
पार पडल्या जातील. विविध विद्यापीठांशी आमच्यासोबत बैठक होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या
विविध समस्या मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर विद्यापीठांद्वारे दिल्या जाणार्‍या मार्गदर्शक सुचनांचे
पालन आम्ही करणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. यामध्ये परिक्षा, सबमिशन,
इंटर्नशिप, लेचर आदींबाबत प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम
व्यवस्थापन आणि प्राचार्यांनी केले. काही अडचणी असल्यास संबंधित विषयांच्या शिक्षकांशी संपर्कात
राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यापीठासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या
सुचनांबाबत विद्यार्थ्यांना शिक्षक माहिती देतील असेही सांगण्यात आले. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी
कॉलेजने आमच्या भविष्याचा विचार करून योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले. तुमच्या भविष्याच्या
दृष्टीने आम्ही सकारात्मक आणि सक्षमपणे पावले उचलत असून तुमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू
दिले जाणार नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
याप्रसंगी अनेक विद्यार्थीनींनी आपले महाविद्यालय खूप चांगले असून या महाविद्यालयाचे विद्यार्थी
असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. तर अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत
या संकटकाळात तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.

पहलगाम येथील हल्ल्याचा मुस्लिम समाजाकडून निषेध

दहशतवादाला धर्म नसतो, ते माणुसकीचे शत्रू; काळ्या फिती लावून केला संताप व्यक्त; शुक्रवारच्या नमाजनंतर मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली

नगर – काश्मीर खोर्‍यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहरातील मुस्लिम
समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप २६ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात
आली. शुक्रवारी (दि. २५ एप्रिल) दुपारी सर्जेपूरा येथील तांबोळी कब्रस्तान मरकज येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी काळ्या फिती लावून या भ्याड हल्ल्याचा विरोध दर्शवला.

या श्रद्धांजली सभेला अब्दुल सलाम खोकर, हाजी मन्सूर शेख, मौलाना अफजल, हाजी अकिल शेख, हाजी रऊफ टायरवाले, हामजा शेख, शाहरुक शेख, अब्दुल रहेमान सौदागर, आसिफ शेख, साजिद शेख, रफिक वेल्डर आदींसह शहरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकत्र येत दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करुन या भ्याड हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत सहवेदना व्यक्त केली.

अब्दुल सलाम खोकर म्हणाले की, दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. हे माणुसकीच्या तत्वांना पायदळी तुडवणारे कृत्य आहे. बायसरनमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानवजातीच्या विरोधात आहे. अशा भ्याड हल्ल्यांमुळे समाजात दहशतीचं वातावरण निर्माण होतं. केंद्र सरकारने अशा प्रवृत्तींना उखडून टाकण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत.  इस्लाम धर्म कुठल्याही निरपराध व्यक्तीच्या हत्येची परवानगी देत नाही. धर्माच्या नावावर दहशतवाद करणार्‍यांचा इस्लामशी काहीही
संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. हाजी मन्सूर शेख म्हणाले की, ईस्लाम हा शांती, प्रेम, सहिष्णुता व मानवी मूल्यांचा
धर्म आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन इस्लाम करत नाही. धर्माविरोधातील हे कृत्य असून, निष्पाप लोकांचे प्राण घेणार्‍यांना मानवी समुदायात जागा नाही. मुस्लिम समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व भारतीय खंबीरपणे उभे असल्याचे त्यांणी सांगितले.

माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी भवानीनगर येथील नागेश्वर मंदिरात लघु रुद्राभिषेक व महाआरती

नगर – माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, काकांच्या प्रकृतीत
सुधारणा व्हावी. यासाठी भवानीनगर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथील नागेश्वर मंदिरात ज्ञानेश्वर रासकर, सौ.कल्पना रासकर, ईशान रासकर व रासकर परिवाराच्यावतीने नागेश्वर मंदिरात लघु रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी महादेवाला साकडे घातले. तसेच भगवान श्री नागेश्वराची महाआरती केली. याप्रसंगी सौ.सुवणाताई
सचिन जगताप, संगिता चौरे, प्रा.माणिकराव विधाते, प्रा.अरविंद शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, डॉ.विजय भंडारी, राजेंद्र चोपडा, सुमतीलाल कोठारी, पप्पु मुंदडा, राजेंद्र छाजेड, राजु शेटीया, बाळासाहेब धाडिवाल, किशोर डागा, किशोर मुथा, अण्णा आंबेकर, राजु सांगळे, राजू कचरे, डॉ.दत्तात्रय लोडे, डॉ.ठाकूर, डॉ.ए.टी.देशमुख, डॉ.सौ. म्हसे आदी उपस्थित होते.

ज्ञानेश्वर रासकर म्हणाले, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथील नागेश्वर मंदिर हे महादेवाचे जागृत देवस्थान आहे. सावित्रीबाई फुले नगर परिसरातील भाविकांनी काकांच्या उत्तमआरोग्यासाठी भगवान श्री नागेश्वराला साकडे  घातले आहे. यावेळी रासकर परिवारासोबतच काकांचा मित्रपरिवार उपस्थित होता. यावेळी भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली आहे. परमेश्वर
निश्चितच सर्वांच्या प्रार्थनेला बळ देईन. लवकरच काकांच्या तब्येतीत सुधारणा होऊन नागरिकांच्या सेवेत काका पुन्हा दाखल होतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.