नगर – काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने नुकताच होमिओपॅथी, फार्मसी आणि नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, परिक्षा, इंटर्नशिप, लेचर आदींबाबत
चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संबंधित विद्यापीठांना कॉलेजबाबत घडलेल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिली असून विद्यापीठ पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठांसोबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सुचना करेल त्यानूसार विश्वस्त आणि व्यवस्थापन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू देणार नसल्याचे सांगण्यात आले. काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या बोल्हेगाव फाटा येथील शैक्षणिक संकुलात १७ एप्रिल रोजी जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेदरम्यान कॅम्पसमध्ये गोंधळ निर्माण होवून चुकीच्या अफवा पसरल्या गेल्या. विशेषत: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र व्यवस्थापन याबाबत सकारात्मक दृष्टीने मार्ग काढत असून
एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होवू दिले जाणार नसल्याची ग्वाही पुन्हा एकदा काकासाहेब म्हस्के
मेमोरियल मेडिकल फाउंडेशनचे सीईओ समीर ठाकरे यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत
आणि सुरळीतपणे पार पडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुल व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या विद्यार्थी संवाद
कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्राचार्य
डॉ.विवेक रेगे, उपप्राचार्या डॉ.पुनम गायकवाड, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.संदीप
बडधे, पार्वतीबाई म्हस्के नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य अजित चवरदार, प्रा.डॉ.निलिमा भोज, प्रा.नितीन ठुबे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
सीईओ ठाकरे पुढे म्हणाल्या की, महाविद्यालयाच्या आवारात घडलेल्या घटनेबाबत तातडीने संबंधित विद्यापीठांना कल्पना
दिली गेली असून त्यांनी परिस्थिती समजून घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टीने सहकार्याची भावना दर्शविली आहे. यासाठी ते लवकरच बैठकीचे आयोजन करणार असून यात सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या जाणार असून चर्चेतून मार्ग काढला जाणार आहे. फार्मसीच्या परिक्षांबाबत पर्यायी परिक्षा केंद्र विद्यापीठांनी उपलब्ध करुन दिल्याने परिक्षा व्यवस्थितपणे व ठरलेल्या वेळेत पार पडत आहेत. आगामी काळातही इतर शाखांच्या परिक्षाही व्यवस्थित
पार पडल्या जातील. विविध विद्यापीठांशी आमच्यासोबत बैठक होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या
विविध समस्या मांडल्या जाणार आहेत. त्यानंतर विद्यापीठांद्वारे दिल्या जाणार्या मार्गदर्शक सुचनांचे
पालन आम्ही करणार आहोत, असेही ते म्हणाले.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. यामध्ये परिक्षा, सबमिशन,
इंटर्नशिप, लेचर आदींबाबत प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे काम
व्यवस्थापन आणि प्राचार्यांनी केले. काही अडचणी असल्यास संबंधित विषयांच्या शिक्षकांशी संपर्कात
राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यापीठासोबतच्या बैठकीनंतर त्यांनी दिलेल्या
सुचनांबाबत विद्यार्थ्यांना शिक्षक माहिती देतील असेही सांगण्यात आले. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी
कॉलेजने आमच्या भविष्याचा विचार करून योग्य ती पावले उचलण्याचे आवाहन केले. तुमच्या भविष्याच्या
दृष्टीने आम्ही सकारात्मक आणि सक्षमपणे पावले उचलत असून तुमचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होवू
दिले जाणार नसल्याचे व्यवस्थापनाने सांगितले.
याप्रसंगी अनेक विद्यार्थीनींनी आपले महाविद्यालय खूप चांगले असून या महाविद्यालयाचे विद्यार्थी
असल्याचा अभिमान वाटत असल्याचे म्हटले. तर अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधत
या संकटकाळात तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.