शासनाच्या ‘मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमात’ नगर मनपाकडून गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी

नगर – राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमात अहिल्यानगर महानगरपालिका प्रभावी अंमलबजावणी करत
असल्याची नोंद क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या (टउख) शिष्टमंडळाने घेतली. नगरविकास विभागाच्या पहिल्या फेरीच्या
मूल्यांकनात राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांपैकी केवळ ६ महानगरपालिका शॉर्टलिस्ट करण्यात आल्या असून, त्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश करण्यात आला आहे.

या ६ महानगरपालिकांमध्ये पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उल्हासनगर आणि अहिल्यानगर यांचा समावेश आहे. या शॉर्टलिस्ट झालेल्या महापालिकांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या महत्वाकांक्षी १०० दिवस
कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्रयस्थ संस्था असलेल्या टउख QCI (Quality Council of India) मार्फत पथक नेमण्यात आले होते. या अनुषंगाने शुक्रवारी राजेश माहेश्वरी, वर्षा मिश्रा, दिनेश भट या अधिकार्‍यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेला भेट देऊन विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, उपायुक्त डॉ. संतोष टेंगले, मुख्य लेखाधिकारी सचिन धस, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे तसेच संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. महानगरपालिकेतून नागरिकांसाठी सुरू असलेल्या नवकल्पनाशील उपक्रमांची आणि सुधारित सेवा पद्धतींची माहिती आयुक्त डांगे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. यामध्ये शहरी पायाभूत सेवा, डिजिटल नागरी सेवा केंद्र, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील उपक्रम, कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठा यांसारख्या घटकांचा समावेश होता.

केंद्र सरकारशी संलग्न असलेल्या टउख संस्थेचे उद्दिष्ट सरकारी यंत्रणांमधील कामकाजाची गुणवत्ता तपासून शासनास अहवाल सादर करणे हे आहे. देशभरातील निवडक महापालिकांची निवड करून संस्थेमार्फत अशा प्रत्यक्ष पाहण्या केल्या जातात. विशेष तपासणी : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दोन्ही मजले  अधिकार्‍यांनी पाहिले. अभिलेखांचे
सुसूत्रीकरण, नागरिक बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, माहिती  फलक, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांगांसाठी सुविधा, शासनाच्या योजनांची माहिती अशा विविध बाबींचा समावेश होता. महापालिकेतील प्रत्येक विभागातील व परिसरातील स्वच्छता व टापटीपपणा पाहून पाहणी अधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील २९ महापालिकांमधून अहिल्यानगर महानगरपालिकेची निवड या पाहणीसाठी झाल्याने, महापालिकेच्या प्रशासनासाठी ही बाब अत्यंत गौरवाची आणि
प्रेरणादायी ठरली असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

हिंद सेवाचे मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत २५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकल

नगर – राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेचे २५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. इयत्ता दुसरी मधील सेजल शेळके व सर्वेश लाड यांनी १५० पैकी १४६ गुण मिळवत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. तर इयत्ता तिसरी मधील चिन्मय म्हस्के याने ३०० पैकी २९६ गुण मिळवत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. त्याच प्रमाणे जिल्हा गुणवत्ता यादीत समृध्दी पठारे इयत्ता पहिली (प्रथम), गीत जपे (पाचवी) आली. इयत्ता दुसरी मधील श्रावणी जाधव (प्रथम), विश्वजित गंगावणे (दुसरा), प्रेरणा केदारी (तिसरी), अरसलान शेख (चौथा), इयत्ता तिसरी मधील राजकुमार निसाद (तिसरा), इयत्ता चौथी मधील संचेती जपे (चौथी), श्लोक दोमल (चौथा), यांनी स्थान पटकावले.

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत इयत्ता पहिली मधील अमृता बेरड (प्रथम), अम्मारा शेख (दुसरी), अल्तमश शेख (चौथा), दिव्या कदम (पाचवी), इयत्ता दुसरी मधील शेख शायान (दुसरा), तन्वी कलंके (चौथी), इयत्ता तिसरी मधील जिविका ताकपिरे (नववी), अर्णवी कांबळे (अकरावी), इयत्ता चौथी मधील प्रांजल केदारी (सहावी), आयत शेख (अकरावी), माहेरा शेख (बारावी), प्रतिक्षा पारधे (तेरावी) यांनी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक सौ. पोतदार विद्या, सौ.परभणे अर्चना, सौ.धाडगे अरुणा, श्रीमती जंगम मनिषा, सौ. साळी मनिषा, पठाण मुदस्सिर, सौ.सासवडकर अंजली यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण यश मिळवत शाळेने
आपली परंपरा राखली असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक यांनी काढले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करताना कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, संस्थेच पदाधिकारी अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, प्रा.ज्योती कुलकर्णी, सौ.अनुरीता झगडे, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे उपस्थित होते.

सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर केले पक्ष्यांप्रती भूतदया जोपासण्याचा संस्कार

नगर – ओंजळभर पाणी, मूठभर दाणे, ठेवाल का कुणी, आमच्यासाठी? या पक्ष्यांच्या आर्त हाकेला साद घालत सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

अहिल्यानगरसह आजूबाजूच्या परिसरात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान पोहचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला
आहे. या जाणिवेतून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी घराच्या अंगणात, गच्चीवर प्राणी-पक्ष्यांसाठी पाणी ठेवून आपल्या अनोख्या उपक्रमातून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सर्वच ठिकाणी तीव्र उष्णतेच्या झळा लागत आहेत. मुया प्राण्यांची, पक्ष्यांची तहान भागली जावी यासाठी शाळेतच टाकाऊ पासून टिकाऊ या उपक्रमाअंतर्गत पक्षांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी छोटेसे मॉडेल विद्यार्थ्यांकडून करून घेतले. आणि घराच्या आसपास, झाडांवर, इमारती वरती घराच्या खिडयांजवळ त्या वस्तू ठेवून निसर्गाप्रती आपली जबाबदारी काय? याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रदूषणामुळे नैसर्गिक व्यवस्थेचा र्‍हास होत आहे. पशुपक्ष्यांना दाणा-पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अन्न व पाण्याशिवाय कोणीही राहू नये हा हेतू डोळ्यासमोर ठेवा व पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची व्यवस्था करा, हीच आपली संस्कृती आहे. असे मत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष राम में घानी, उपाध्यक्ष
रूपचंद मोटवानी, सचिव गोपाल भागवानी, खजिनदार दामोधर माखिजा, विश्वस्त महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, राजकुमार गुरुनानी, हरेष मध्यान तसेच शाळेच्या प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका सौ. गोदावरी किर्तानी तसेच
उपप्राचार्या सौ.कांचन पापडेजा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना दररोज पक्षांच्या क्षुधा शांतीसाठी दाणापाणी ठेवण्याचे आवाहन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आबासाहेब सोनवणे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव

नगर – हिंगणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे राज्य कोअर कमिटी अध्यक्ष
आबासाहेब सोनवणे पाटील यांचा युवा महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार २०२५ ने गौरव
करण्यात आला. ग्रामीण भागात कायापालट करण्याच्या उद्देशाने केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुणे, शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल सभागृहात सिने अभिनेत्री साराह मोतीवाला यांच्या हस्ते सोनवणे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, संस्थेचे राज्य
सचिव गणेश विटकर, उद्योजक एस.एस. सावंत आदी उपस्थित होते.

आबासाहेब सोनवणे यांचे वडील नगरपंचायत समिती माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक कै. भास्करराव पाटील सोनवणे यांनी ३५ वर्ष सरपंचपद भूषविले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आबासाहेब सोनवणे गावाच्या विकासासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मागील २५ वर्षात अथकपणे केलेल्या जपसंधारणाच्या कामामुळे दुष्काळी गावाची ओळख पुसून त्यांनी गाव पाणीदारकेले आहे. हिंगणगावमध्ये ११ बंधारे बांधून नदीचे ९
किलोमीटर पर्यंत खोलीकरण केले आहे. कुरणमळा या ठिकाणी नदीजोड प्रकल्प राबवून शिवारातील वाहून जाणारे पाणी एकत्रित करून बंदपाईपद्वारे बंधार्‍यात सोडले आहे. जलयुक्त शिवार योजनेचे काम त्यांनी गावात सक्षमपणे राबविले. नदी व बंधारे गाळमुक्त करून पाणीदार गावाचे स्वप्न यशस्वीपणे पूर्ण केले. स्मशानभूमीचे नूतनीकरण, झाडांची लागवड, रस्ते
मजबुतीकरण, डांबरीकरण, शाळा व अंगणवाड्यांसह गावातील विविध मुलभूत प्रश्न सोडवून गावाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. रयत शिक्षण संस्थेवर ३० वर्षापासून सदस्य म्हणून काम करत आहे. गावाबरोबर तालुयातील सरपंच, उपसरपंच यांना एकत्रित करून सरपंच परिषदेच्या तालुका अध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात केली. शासन दरबारी अनेक प्रश्न मांडून त्याची सोडवणूक केली. त्याच माध्यमातून ते महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर त्यांना नाशिक येथील ब्लू स्टार इव्हेंटचा राष्ट्रीय दिव्य प्रतिभा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे.

पुरस्कार स्वीकारण्यासाठी सौ. स्मिता सोनवणे, घोडगंगा कारखान्याचे संचालक कैलास पाटील सोनवणे, नाबार्ड बँकेचे बबनराव सोनवणे, उद्योजक अमोल सोनवणे, संतोष सोनवणे, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जयंतराव नलावडे, निसार पठाण उपस्थित होते. ज्या जनतेने सलग २५ वर्षे काम करण्याची संधी दिली, त्यामुळे गावामध्ये विकास कामे करू शकलो.
गावाचा चेहरा-मोहरा बदलून गावाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे भाग्य लाभले. हा पुरस्कार एकट्याचा नसून संपूर्ण ग्रामस्थांना समर्पित आहे, अशा भावना आबासाहेब सोनवणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या.

जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास

नगर – जैन समाज व जैन धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिले व एकमेव राज्य आहे. जैन आर्थिक
विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक संरक्षण, तीर्थक्षेत्र विकास जैन धर्मग्रंथांचे जतन व पुनर्निमान करणे, साधुसंतांसाठी विहार धाम निर्माण करणे, युवकांना व्यापार उद्योगासाठी बिनव्याजी कर्ज, परदेशी शिक्षणासाठी
जाणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, महिला बचत गटांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत बिनव्याजी गृह कर्ज, निराधार व विधवा महिलांसाठी तीन हजार रुपये मासिक पेन्शन या आर्थिक विकास महामंडळाला २०० कोटींचा दरवर्षी निधी मिळणार आहे. तसेच एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडोदा, कोटक बँक, पंजाब नॅशनल बँक अशा अनेक बँकांनी जैन समाजातील व्यापार व उद्योगासाठी २००० कोटींपर्यंत निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. अशा विविध योजनांमधून जैन आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास होणार आहे. सरकारने जैन समाजासाठी शक्तिशाली महामंडळाचे निर्माण केले आहे, असे प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ललित गांधी यांनी केले आहे. धार्मिक परीक्षा बोर्ड आनंद धाम येथे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित महा संमेलनात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी म.सा., सेवाभावी अलोकऋषीजी म.सा., नामदार ललित गांधी, अल्पसंख्यांक योजना ऑलइंडिया जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीकुमार जैन, श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय मंत्री वसंत लोढा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश लोढा, राष्ट्रीय समन्वयक ईश्वर बोरा, राष्ट्रीय संचालक राजेंद्र बलदोटा, पेमराज बोथरा, राजेंद्र चोपडा, सुभाष मुथा, संतोष गांधी, सुरेंद्र गांधी, अनिल कटारिया, संजय कोठारी, नंदकुमार भटवेरा, रमेश लोढा, समीर बोरा, नितीन पटवा, रोशन चोरडिया, पवन कटारिया, शरद शिंगवी, गौतम मुनोत महाराष्ट्र चतुर्थ झोन पदाधिकारी धनेश कोठारी, धनराज संचेती, सुनील मालू, सचिन कटारिया, ईश्वर भंडारी, सुदर्शन डुंगरवाल, पोपट लोढा, संस्था प्रमुख
डॉ. प्रकाश कांकरिया, अ‍ॅड. नरेश गुगळे, किरण भंडारी, अमित मुथा, रवींद्र बाकलीवाल, तुषार कर्नावट, हर्षल बोरा, नितीन शिंगवी, रसिकलाल बोरा, संतोष गांधी, प्रतीक बोगावत, पोपट लोढा, कमलेश गुंदेचा, चंदन भळगट, सचिन देसर्डा, नितीन बाफना, महेश चुत्तर, अशोक गांधी, बालचंद गांधी, कमलेश चोरडिया, तुषार सुरपुरीया, कुणाल भंडारी,  पोपट भंडारी, धनंजय गांधी, अ‍ॅड. रोहित बलदोटा, राजेश बाठीया, नितीन भंडारी, विजय गुगळे, मनीष शिंगवी, अरुण दुगड, ज्योती गांधी, लता कटारिया, सरोज कटारिया, डॉ.सुधाताई कांकरिया, वैशाली चोपडा, नूतन गांधी, अपेक्षा संकलेचा, मनीषा मुनोत, सिमरन मुनोत, प्रतिभा गांधी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात वसंत लोढा म्हणाले, जैन समाजातील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची
स्थापना करून त्या माध्यमातून विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. या महासंमेलनात जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबवल्या जाणार्‍या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार
कर्ज, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या योजनांचा जैन समाज बांधवांनी लाभ घ्यावा. या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहेत. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शहरात व तालुयात प्रत्येक ठिकाणी जैन अल्पसंख्यांक योजनांच्या
माहितीसाठी कार्यालय उभारण्यात येणार आहे. यावेळी कांतीकुमार जैन, अ‍ॅड.नरेश गुगळे, राजेंद्र चोपडा यांनी मार्गदर्शन केले. ईश्वर बोरा यांनी स्वागत केले. सूत्रसंचलन राजेंद्र बलदोटा व संतोष गांधी यांनी केले. सतीश लोढा यांनी आभार मानले. आनंद गुरुभक्त मंडळाने गौतम प्रसादाची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जैन  समाज बांधव उपस्थित होते.

विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे आरोग्य क्षेत्रात सरस्वती हॉस्पिटलने वेगळा ठसा उमटवला

नगर – आई व बाळाची परिपूर्ण काळजी घेत आरोग्यसेवेत बांधिलकीचा नवा मापदंड निर्माण करणार्‍या माळीवाडा येथील
सरस्वती हॉस्पिटलचा ८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात  आला. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अमोल जाधव व डॉ.प्राजक्ता जाधव यांनी या कालावधीत सामाजिक जाणीव ठेवून अत्याधुनिक रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला. त्याला नगरसह जिल्ह्यातून रूग्णांचा प्रतिसाद मिळाला आहे. विश्वासार्हता, प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीमुळे आरोग्य क्षेत्रात सरस्वती हॉस्पिटलने ठसा उमटवला आहे. आरोग्य सेवेचा हा नंदादीप असाच तेवत राहील, असा विश्वास यानिमित्त डॉ. अमोल जाधव यांनी व्यक्त केला आहे.

डॉ.जाधव यांनी सांगितले की, ८ वर्षांपूर्वी एक ध्येय समोर ठेवून हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली होती. या काळात नेहमीच सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या महानगरांमध्ये मिळणार्या आरोग्य सुविधा नगरमध्ये तुलनेने कमी दरात उपलब्ध करून दिल्या. हॉस्पिटलच्या प्रवासात सुमारे ६ हजार डिलिव्हरी आणि २० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. ९०० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरे घेतली आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजनेंतर्गत अनेक महिलांच्या मोफत
तपासणी केल्या. याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी जोडी तुझी माझी, दिल ये जिद्दी है, पत्र लेखन, प्रेगनन्सी
फॅशन शो, अहमदनगर फॅशन शो असे अनेक उपक्रम राबवून महिलांना निखळ आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न
केला आहे. रूग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांना आनंदी जीवनाचा मंत्र देण्याचा प्रयत्न असतो. रूग्णांना उच्च दर्जाच्या सेवेची हमी देणारे नॅशनल क्रेडीशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (एनएबीएच) या संस्थेचे मानांकन हॉस्पिटलला प्राप्त झाले आहे. हॉस्पिटलमध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी, वेदन विरहित प्रसूती, किशोरवयीन समुपदेशन, लग्नापूर्वी व गर्भधारणेपूर्वीचे समुपदेशन सल्ला केंद्र, अनियमित पाळी व पीसीओडी उपचार, मेनोपॉज मार्गदर्शन तसेच वंध्यत्व निवारण आदी उपचार सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय दुर्बिणीव्दारे शस्त्रक्रिया, टाका विरहीत पिशवी
काढण्याची शस्त्रक्रिया, शासनमान्य कुटुंब कल्याण व गर्भपात केंद्र, लैंगिक समस्या मार्गदर्शन, कर्करोग निदान व उपचार, सोनोग्राफी व कलर डॉपलर सेंटर, पॅथॉलॉजी लॅब, कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत. अत्याधुनिक सोनोग्राफी मशिन सरस्वती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध असल्याने अनेक रूग्णांना याचा लाभ होत
आहे. लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रियेमुळे रूग्णाला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये डमिट राहण्याची गरज राहत नाही. तसेच
तो लवकर आपले दैनंदिन जीवन जगू शकतो. याचाही लाभ रूग्णांना होत आहे. विविध शाळा, कॉलेज,
महिला संस्थांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून डॉ.जाधव आरोग्याचा व महिला सक्षमीकरणाचा मंत्र देत असतात. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.प्राजक्ता जाधव यांनी वंध्यत्व निवारणावर विशेष अनुभव मिळवला असून त्याचा अनेक महिलांना लाभ होत आहे. विविध कारणांमुळे सध्या विवाहित जोडप्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले आहे. मूल होत नसल्याने दाम्पत्याच्या जीवनात निराशा येते. अशा दाम्पत्यांसाठी हॉस्पिटलमध्ये आवश्यक तपासण्या, समुपदेशनाची विशेष सुविधा उपलब्ध आहे.
त्याचा अनेकांना लाभ झाले आहे. अनेक दाम्पत्यांच्या संसारवेलीवर अपत्य सुखाचा फुल फुलले आहे. आरोग्यसेवेतील आधुनिक तंत्रज्ञान सरस्वती हॉस्पिटलमध्ये आणून त्याव्दारे रूग्णसेवा देण्यावर  कायम भर देण्यात आला आहे. या जोडीलाच डॉ.जाधव यांनी आनंदी समाजाच्या निर्मितीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहे. आरोग्यसत्ताक चळवळीतून त्यांनी संपूर्ण नगर शहर निरोगी, आरोग्यसंपन्न आणि आनंदी राहिल यादृष्टीने महत्वाचे पाउल उचलले आहे. या
अंतर्गत महापालिकेच्या सहकार्यातून विशेष जनजागृती करण्यात आली. कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच योग्य उपचार, तपासण्या करून घेण्याचे आवाहन ते करतात. आजारावर उपचार करतानाच मुळाच आजार होवूच नये यासाठी जीवनशैलीत कोणते बदल करावेत यासाठीही हॉस्पिटलतर्फे सातत्याने विविध उपक्रमातून जागृती केली जात

मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा झेंडा

पहेलगाम हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र, केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी : किरण काळे

नगर – जम्मू कश्मीरच्या पहेलगाममध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणार्‍या  अतिरेयांचे, पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत
जाळण्यात आले. मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… अशा घोषणा देण्यात आल्या. हा हल्ला पाकिस्तानचेच षडयंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी, अशी मागणी शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत्युमुखींना श्रद्धांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पादत्राणे काढली नव्हती. या प्रकाराचा देखील शिवसेनेने निषेध केला.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्रा.अंबादास शिंदे, कामगार सेनेचे विलास उबाळे, उपशहर प्रमुख जेम्स आल्हाट, उपशहर प्रमुख दीपक भोसले, किरण बोरुडे, माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, माजी नगरसेवक पप्पू ठुबे, सावेडी उपनगराचे उपप्रमुख प्रशांत पाटील, सुनील भोसले, सचिन शेंडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी शहर जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा
भगत, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी कामगार सेना विभाग शहरप्रमुख गौरव ढोणे, युवासेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड, किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, केशव दरेकर, गणेश आपरे, महावीर मुथा, अमित शिंदे, विनोद दिवटे, अमोल सानप, रमेश आव्हाड, जयराम आखाडे, नितीन जगधने, महावीर मुथा, महादेव बुरा, दीपक गांगुर्डे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले, दहशतवाद्यांनी अगोदर रेकी करून पूर्वनियोजित कट आखून हल्ला घडवून आणला. धर्म विचारून हिंदू असल्याची खात्री करत निष्पापांचे बळी घेतले. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र मागील अकरा वर्षांपासून हिंदूंचेच सरकार असूनदेखील हिंदुस्थानातील ’हिंदू खतरे मे आहे’ हे भयाण वास्तव आहे. संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी चेक पोस्टवर बंदोबस्तच नव्हता, असे पर्यटक सांगत आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कट शिजत असताना काय करत होत्या? पुलवामा हल्ल्यावेळी देखील यंत्रणा अपयशी ठरल्या होत्या. पंतप्रधान, गृहमंत्री,
संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री यांना प्रचंड संरक्षण, कडेकोट बंदोबस्त आहे. तसंच संरक्षण सामान्य भारतीयांना केव्हा मिळणार? असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, पाकिस्तानचे उत्तर छप्पन इंचाच्या छातीने दिले पाहिजे. एवढा मोठा देशाच्या सुरक्षेवर हल्ला झाला तरीदेखील बिहारमध्ये राजकीय धुरळा सुरूच आहे. ती प्रक्रिया स्थगित केली पाहिजे. आयपीएलचा उत्सव बंद करून तिथे बंदोबस्तासाठी तैनात असणार्‍या हजारोंच्या संख्येची पोलीस फौज जम्मू-काश्मीरमध्ये
संरक्षणासाठी धाडली पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत ठोस कारवाई करावी.

अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु यांच्यासह जिल्ह्यातील काही पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना लवकर अहिल्यानगरमध्ये सुखरूप आणण्यासाठी प्रशासन, राज्यसरकारने तातडीने पावले उचलण्याची  मागणी किरण काळे यांनी केली आहे.

राजेंद्र दळवी म्हणाले, महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी पुरविण्यात आलेल्या विशेष विमानांचा खर्च हा राज्य सरकारला करावा लागला. केंद्र सरकारने अशा कठीणप्रसंगी तरी महाराष्ट्रातील पर्यटकांना सपत्नीक वागणूक द्यायची नव्हती. राष्ट्रवादीचे अनिकेत कराळे म्हणाले, हा हल्ला कुठल्या राज्याच्या नागरिकांवर नसून भारतीयांवर,
देशाच्या सार्वभौमत्वावर भ्याड हल्ला आहे. काँग्रेसच्या उषा भगत म्हणाल्या, एक महिन्यांनी अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. त्याआधी घडलेल्या या हल्ल्यामुळे भाविक, पर्यटकांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण आहे. केंद्र सरकारने जोरदार प्रत्युत्तर द्यावे.

पहलगाम हल्ल्यातील हिंदू बंधू भगिनींना शहर भाजपाची श्रद्धांजली वाहून घटनेचा केला निषेध

नगर – काश्मीरमधील पहेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर अतिरेयांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बंधू, भगिनींना अहिल्यानगर शहर भाजपाच्या वतीने श्रद्धांजली वाहून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. बुधवारी सायंकाळी शहरातील चौपाटी कारंजा चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापुढे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सरचिटणीस सचिन पारखी, प्रशांत मुथा, वसंत लोढा, दामोदर बठेजा, बाळासाहेब गायकवाड, मयूर बोचूघोळ, कुणाल भंडारी, विलास नंदी, गोकुळ काळे, राजेंद्र काळे, महेश नामदे, तुषार पोटे, सागर शिंदे, प्रवीण ढोणे, राहुल जामगावकर, गोपाल वर्मा, अनिल सबलोक, कालिंदी केसकर, श्वेता पंधाडे, रेणुका करंदीकर, रेखा आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, पाकिस्तानमधील अतिरेयांनी क्रूरतेने हिंदू बंधू, भगिनींची हत्या केली आहे. अशा दहशतवादी प्रवृत्ती वेळीच ठेचल्या पाहिजेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे नक्कीच योग्य कारवाई करून या घटनेचा बदला घेतील. हिंदू समजाविरोधात या अपप्रवृत्ती वाढत आहेत. त्यांना केंद्र शासन निश्चित पायबंद घालेल, असा विश्वास व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजेंद्र काळे, दामोदर बठेजा, प्रिया जानवे आदींनी या घटनेचा निषेध केला.

‘वकील आघाडी’कडून पहेलगाम हल्ल्याचा निषेध

नगर – जम्मू-काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी
निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला करत अनेक भारतीय नागरिकांवर
बेछूट गोळीबार केला. यामध्ये २६ लोकांचा बळी गेला तर अनेक
पर्यटक जखमी झालेले आहेत. अशा दहशतवादी हल्ल्याचा भाजपा
वकील आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. चंदन बारटक्के, अ‍ॅड. संदीप
काळे, अ‍ॅड. संदीप शेळके, अ‍ॅड. वर्धमान भंडारी, अ‍ॅड. अमित
गाडेकर, अ‍ॅड. सचिव घावटे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. रविंद्र लगड,
अ‍ॅड. अविनाश साखला, अ‍ॅड. देवेंद्र बंब, अ‍ॅड. व्यंकटेश शिरसुल,
अ‍ॅड. हरिश कल्याणी आदी उपस्थित होते

सिव्हिल हडको येथील ओढ्यामध्ये मैलामिश्रित पाणी सोडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात

ड्रेनेजचे पाणी बंद न झाल्यास महापालिकेसमोर उपोषणाला बसणार, आयुक्तांनी केली ओढ्याची पाहणी

नगर – सिव्हिल हडको येथील ओढ्यामध्ये नागरिकांनी मैल मिश्रित पाणी सोडल्यामुळे सिव्हिल हडको येथील ओढ्या
शेजारी मोठ्या प्रमाणात नागरिक राहत असून त्यांना तेथे दुर्गंधीचे साम्राज्य व डास मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे सोडलेले ड्रेनेजचे पाणी बंद करण्याच्या मागणीसाठी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी तत्काळ दखल घेत सिव्हिल हडको भारत चौक येथील ओढ्याची पाहणी करून नागरिकांना या समस्येतून मार्ग काढू असे आश्वासन दिले. यावेळी प्रशांत सराईकर, राजेंद्र कचरे, अशोक कर्डिले, विजय आवटी, मुकुंद पालवे, अक्षय सूर्यवंशी, शेखर शेंडे, प्रकाश मारवाडे, उमेश पाठक, शिवम देवगुणे, अमित कचरे, राहुल दरेकर, संजय कचरे, रमेश कांबळे, दिलीप हातवळणे, श्रीकांत नाईक, अलका गाडे, शोभा रणखांब, यशोदा राठोड, उमा सुंबे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

सिव्हिल हडको परिसरात मोठी रहदारी असून पारिजात चौक पाईपलाईन रोड येथील नागरिकांनी ड्रेनेज लाईनचे पाणी ओढ्यामध्ये सोडल्याने मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिव्हिल हडको परिसरात राहणार्‍या नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारखे आजार मोठ्या प्रमाणात होत आहे. ओढ्यामध्ये सोडलेल्या ड्रेनेजच्या पाण्याची योग्य प्रमाणे विल्हेवाट लावून नागरिकांनी सदरचे मैल मिश्रित पाणी ओढ्यात सोडलेले बंद करून त्यांना ड्रेनेजची स्वतंत्र लाईन टाकण्यात यावी अशी मागणी सिव्हिल हडको येथील नागरिकांनी महापालिकेच्या आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे. ७ दिवसांमध्ये ओढ्यामधील ड्रेनेज लाईनचे पाणी बंद न केल्यास महापालिकेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.