३७ वर्षानंतर वाळकीमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगला स्नेहमेळावा

शालेय जीवनातील आठवणींना दिला उजाळा

नगर – वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन १९८८ च्या इयत्ता दहावी (एसएससी) च्या माजी
विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरात उत्साहात पार पडला. ३७ वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. स्नेहमेळाव्यानिमित्ताने एकत्र आलेल्या वर्ग मित्र-मैत्रिणींनी शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, क्रीडा स्पर्धा, वर्गात मिळालेली शिक्षा, स्नेहसंमेलनातील अनेक गोड आठवणी सांगितल्या. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या मित्रांबरोबर एकच धमाल करुन, आयुष्य घडविणार्‍या माजी
शिक्षकांसमोर नतमस्तक झाले. राज्याच्या विविध भागातून माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी कार्यक्रमासाठी हजर होत्या.
वाळकी मधील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील सन १९८८ च्या इयत्ता दहावी मधील माजी
विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एका व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सर्व जुने सवंगडी एकमेकांच्या संपर्कात असतात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेले माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमातून एकवटले होते.
कार्यक्रमास उपस्थित तत्कालीन शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोकरी व्यवसाय करत असताना कुटुंबातील
ज्येष्ठ व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, मुलांवर चांगले संस्कार करावेत, समाज हिताची कामे करावी, शरीर प्रकृती चांगली
राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे मौलिक मार्गदर्शन केले. माजी शिक्षिका जाधव मॅडमने यावेळी आपल्या विद्यार्थ्यांसाठी कविता सादर केल्या. तसेच माजी शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना जणू वर्गच भरविला होता. आपल्या लाडया शिक्षकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या. उपस्थित मित्रांनी आपल्या भावना व्यक्त करुन जुन्या चांगल्या-वाईट आठवणीचा इतिहास मांडताना सर्वच भारावले. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग, दत्तात्रय लाड, रवींद्र नाईक, राम मुनफन, योहान पंचमुख,
अरुण कुंजीर, बाळासाहेब भालसिंग, संगीता जपे, राजू माने, संगिता मते, रामदास इंगळे, महेश आसुदाणी, सुधीर कुलकर्णी, राजेंद्र खेडकर, रामभाऊ इंगळे, अनिल कजबे, राजू मुरूमकर, उज्वला राऊत-साळुंके, विद्या कोतकर-झिने, छाया भालसिंग- बागल, तानाबाई सातपुते-खामकर, नगमा शेख-पठाण, सुनीता कातोरे-पवार, निता गायकवाड, भारती भालसिंग, विद्या कोतकर यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी तत्कालीन शिक्षक प्रभाकर मुळे, रामभाऊ काटकर, अशोक बागल, सर्जेराव जगदाळे, अलका जगदाळे, उमाकांत महांडुळे, मीरा महांडुळे, उत्तम काळे, बाबुराव फळके, ज्ञानदेव बोठे, दिगंबर बोरुडे, साहेबराव अनभुले, छबुराव विलायते, पद्मा जाधव, मंगला लोखंडे, विजय टेमक, संपतराव जगदाळे आदी उपस्थित होते. सर्व माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला होता.

ख्रिस्ती समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आह

प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू : हर्षवर्धन सपकाळ; शिष्टमंडळाने घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची भेट, चंद्रकांत उजागरे यांनी मांडले शहरातील समाजाचे प्रश्न

नगर – ख्रिस्ती समाज हा शांतता प्रिय आहे. ख्रिश्चन मिशनरी सेवा संस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान देत असून, या समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील
राहणार असल्याची भावना काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. बुलढाणा येथील काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते व समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सतीश (दादा) मेहेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ख्रिस्ती
समाजाच्या राज्यातील शिष्टमंडळाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत
होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांचा समस्त ख्रिस्ती समाज महाराष्ट्र राज्याचे
पदाधिकारी यांच्या वतीने अहमदनगर ह्युम मेमोरियल चर्चचे विश्वस्त चंद्रकांत उजागरे यांनी त्यांचा सत्कार
केला. गेल्या काही दिवसापासून अल्पसंख्यांक समाजातील काही घटकांना विशेषतः ख्रिस्ती समाजाला आणि धर्माला
जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे. समाज माध्यमातून होणार्‍या चिथावणीखोर भाषणामुळे आणि लेखनामुळे
समाज चिंताग्रस्त आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील दिवसेंदिवस होत असलेले पीछेहाट समाजाचा
आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षापासूनची प्रलंबित स्वतंत्र महामंडळाची मागणी, काँग्रेस
कमिटीमध्ये ख्रिस्ती समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात समस्त ख्रिस्ती समाजाचे राज्याचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी सविस्तर चर्चा घडवून आणली. अ‍ॅड. प्रकाश संसारे, चंद्रकांत उजागरे, अनिल भोसले, प्रवक्ते प्रशांत केदारी, सोन्याबापू वाघमारे आदींनी ख्रिस्ती समाजाची सद्यपरिस्थिती व ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्या
संदर्भात बैठकीत आग्रही मागणी केली. सपकाळ यांनी अतिशय काळजीपूर्वक समाजाच्या भावना समजून घेऊन काँग्रेस पक्ष सदैव ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी उभा राहील असे आश्वासन दिले. या बैठकीमध्ये आर.सी. गावीत, जयंत पाडवी,
दीपक चंद्रशेखर, अनिल आगलावे आदींसह समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वृध्दाश्रमासाठी ‘सेवाप्रीत’ने बांधून दिला १५ हजार लिटरचा हौद

प्रयागराज येथील गंगाजल हौदेत टाकून आजी-आजोबांनी केली आंघोळ

नगर – शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी रांजणगाव, फत्तेपूर (ता. नेवासा) येथील शरणपूर वृध्दाश्रमासाठी १५ हजार लीटर क्षमतेचा हौद बांधून दिला. त्याचा लोकार्पण नुकताच पार पडला. प्रयागराज येथील कुंभ
मेळयातून आणलेले गंगाजल या हौदेत टाकून वृध्दाश्रमातील सर्व आजी-आजोबांना आंघोळीसाठी ते पाणी देण्यात आले होते. तर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृध्दाश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी
सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, कोषाध्यक्ष अर्चना खंडेलवाल, प्रकल्प प्रमुख तथा संचालिका गीतांजली माळवदे, सोनीया कुंद्रा, वंदना गोसावी, दीपा रोहिडा, रोहिणी दयानंद पाटील, दिपाली देवदूतकर, अंजली विजय  गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व शरणपूर वृद्धाश्रमाचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब मुटकुळे, संस्थेच्या सचिव सुरेखा मगर, स्मिता देशमुख, सुनिता लेकुरवाळे, नूतन भोसले, नीशा पाटील, भारती यादव, पूजा गोंडाळ, मनीषा कंक, वर्षा
शेकटकर, तृप्ती कोठारी, माधुरी येळाई, सोनी पाठक, वैशाली उत्तेकर आदींसह ग्रुपच्या महिला सदस्या,
वृध्दाश्रमातील आजी-आजोबा आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.  जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, वृध्दाश्रमातील सर्व
ज्येष्ठ आजी-आजोबा हे निराधार नसून, सेवाप्रीतच्या सर्व महिला सदस्या त्यांच्या नाती आहेत. त्यांच्या सुखय्दु:खात कायम बरोबर राहून त्यांच्याशी कुटुंबाप्रमाणे ऋणानुबंध जोडले जाणार आहे. तुम्ही शरीराने कमजोर  असू शकता, पण मनाने कधीही कमजोर होऊ नका. जीवनात आनंदी आणि उत्साही राहण्याचे त्यांनी सांगितले. हा फक्त जलप्रकल्प नसून,  माणुसकीशी  नाते जोडणारा सोहळा आहे. ज्येष्ठ नागरिक कुटुंबातील संपत्ती असून, त्यांच्या मार्गदर्शनाने सुखी
जीवनाची यशस्वी वाटचाल होणार असल्याचेही ओबेरॉय म्हणाल्या. गीतांजली माळवदे म्हणाल्या
की, शरणपूर वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न बिकट बनल्यानंतर मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या हौद मध्ये १५ हजार लीटर क्षमतेचे पाणी साचवून ठेवण्यात येणार असल्याने, ज्येष्ठ नागरिकांची
सोय होणार आहे. या कार्याने ज्येष्ठांचे जीवन सुखी करण्यासाठी व त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलविण्याचे समाधान मिळत
असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब मुटकुळे यांनी सेवाप्रीतच्या कार्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळून वृध्दाश्रमातील ज्येष्ठांचे जीवन सुखी करण्यासाठी हातभार लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. सेवाप्रीतच्या महिलांनी जवळपास पन्नास हजार रुपये खर्च करुन वृध्दाश्रमासाठी हौद बांधून दिला आहे. या कार्यक्रमात सर्व महिलांनी ज्येष्ठ आजी-आजोबांना
मिष्टान्न भोजनाचे वाटप केले. तर त्यांच्या मनमोकळे गप्पा मारुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.

ज्येष्ठांचे अनुभव हे विश्वाचे विद्यापीठ

डॉ.सुधा कांकरिया यांचे प्रतिपादन; सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘ज्ञानविज्ञान’ पुरस्कार

नगर – ज्ञान म्हणजे आपण निरळनिराळ्या क्षेत्रात प्रगती करतो. म्हणजे हे ज्ञान लौकिक व व्यवहारीक ज्ञान होय. परंतु अध्यात्मिक ज्ञान म्हणजे सत्य ईश्वरी ज्ञान होय. विज्ञानाने आज प्रगती केली. या विज्ञानाला दोन बाजु आहेत, तर ज्ञानाला
एकच बाजु आहे. म्हणुनच जसा जसा माणूस वृद्ध होत जातो, तसा तसा तो अनुभवाने समृद्ध होत असतो. जेष्ठांचे अनुभव हे विश्वाचे विद्यापीठ आहे. म्हणून त्यांच्या हातुन मला ज्ञानविज्ञान पुरस्कार दिला गेला हे माझे भाग्यच आहे, असे प्रतिपादन
डॉ.सुधा कांकरिया यांनी केले. सावेडी जेष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ.सुधा कांकरिया यांना
प्रदान करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, अदिनाथ जोशी, मोरेश्वर मुळे, बाजीराव जाधव, शरद कुलकर्णी, बलभिम पांडव, शोभा ढेपे, ज्योती केसकर, पुष्पा चिंताबर, स्नेहन वेलणकर, लिलाताई गोविलकर,
सुप्रिया सोनटक्के आदी उपस्थित होते. डॉ.सुधा कांकरिया पुढे म्हणाल्या की, स्त्री भु्रणहत्या हे महापाप आहे. स्त्री भु्रणहत्या म्हणजे केलेला आत्मघातकी हल्ला आहे. आई आहे म्हणून जगात माणूसकी आहे, प्रेम आहे. ती दोन्ही
कुळाचा उद्धार करते. यावेळी अध्यक्ष आदिनाथ जोशी म्हणाले की, समाजात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना
दरवर्षी सावेडी जेष्ठ नागरिक मंचाच्यावतीने ‘ज्ञानविज्ञान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीचा पुरस्कार डॉ.सुधाताई कांकरिया यांना देण्यात आला. पुरस्कार मानपत्राचे वाचन बाजीराव जाधव यांनी केले. तर परिचय ज्योतीताई केसकर यांनी
केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बलभिम पांडव यांनी केले. तर आभार मोरेश्वर मुळे यांनी मानले.

महापालिका शाळेच्या मैदानावरच तुटल्या वीज वाहिनीच्या ‘हाय व्होल्टेज’ च्या तारा

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, महावितरणच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार करुनही दखल नाही, पालक शिक्षकांनी केली तारा हटवण्याची मागणी

नगर – केडगाव अयोध्यानगर मनपाची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेच्या मैदाना वरती विद्युत विभागाची ’हाय  ल्टेज’ च्या तारा गेल्या असून सकाळी शाळा भरण्याच्या आधी  तारा तुटून मैदानावरती पडल्या होत्या. शिक्षक शाळेत आले असता निदर्शनात आल्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क साधला आणि कर्मचारी आल्यानंतर विद्युत पुरवठा बंद केला. जर शाळा सुरू असताना किंवा विद्यार्थी मैदानावर खेळत असताना ’हाय व्होल्टेजच्या’ तारा पडल्या
असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही विद्युत विभागाने तारा तुटण्याच्या अगोदर उपायोजना करणे गरजेचे होते, आता तरी विद्युत विभागाच्या अधिकार्‍याने तातडीने लक्ष घालून
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवाव्यात अशी मागणी पालक शिक्षकांनी केली. शाळेच्या मैदानावरील ’हाय व्होल्टेजच्या’ तारा हटवण्याची मागणी नगर व केडगाव विद्युत विभागाच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता.
मात्र त्यांनी दखल न घेता आम्हालाच उडवा उडवी ची उत्तरे दिली. ते म्हणाले होते की शाळा आधी कि विद्युत तारा, त्यांच्या हलगर्जी पणामुळे तारा तुटून शाळेच्या मैदानावरती पडल्या, आता तरी तारा हटवण्यात याव्यात अशी मागणी पालक व शिक्षकांनी केली.

‘अहमदनगर’ऐवजी ‘अहिल्यानगर’ नामकरणासाठी बँकेसमोर निदर्शन

नगर – केंद्र व राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे केले असताना देखील छत्रपती शिवाजी
महाराज चौक येथील एच.डी.एफ. सी बँकेने अजून पर्यंत फलकावरती अहमदनगर असाच उल्लेख
असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने बँकेसमोर आंदोलन करत प्रशासनाला तातडीने नाव बदलून
अहिल्यानगर करण्याच्या सूचना दिल्या असून, जेवढा वेळ नाव बदलायला लागेल तेवढ्या वेळातच
अहिल्यानगर करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा देताच प्रशासनाने
नाव बदलण्याचे हालचाली सुरु केल्या. तसेच नगर शहरातील ज्या दुकानदाराने अजून पर्यंत अहिल्यानगर
हे नाव टाकले नसेल त्यांनी तातडीने फलक बदलून घ्यावे अन्यथा तोडफोड आंदोलन केले जाईल, असा इशारा शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एच.डी.एफ.सी बँकेच्या फलकावरती
अहमदनगर असाचं उल्लेख असल्यामुळेनिदर्शने करताना संपत बारस्कर, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा,
महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, मंगेश खताळ, युवराज शिंदे, सागर गुंजाळ,  केतन क्षीरसागर, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, लताताई पवार, रेणुका पुंड, अंजली
आव्हाड, सुरज शिंदे, सागर पंधाडे, सोनू घेमुंड, दिनेश जोशी, राजेश भालेराव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बँकेसमोर आंदोलन सुरू असताना प्रशासनाने तातडीने फलकावरील नाव बदलून अहिल्यानगर केले जाईल असे
सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले

 

आरक्षणाची तरतूद डावलून नोकर भरती करणार्‍या जिल्हा बँक विरोधात बेमुदत धरणे आंदोलन; निदर्शन

नगर – आरक्षणाची तरतूद डावलून अहिल्यानगर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत होत असलेल्या भरतीला विरोध दर्शविण्यासाठी ३ मार्च पासून जिल्हा बँकेसमोर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. आंदोलकांनी निदर्शने करुन, बँकेत आरक्षण डावलून होत असलेल्या भरतीच्या निषेधार्थ बोंबा मारल्या. या आंदोलनात आघाडीचे केंद्रीय सदस्य तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते अ‍ॅड. अरुण जाधव, राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांच्या प्रमुख उपस्थितीत,  जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या अध्यक्षतेखाली, अनिल जाधव, संतोष चोळके, शहराध्यक्ष हनीफ शेख, प्यारेलाल शेख, सुधीर ठोंबे, देविदास भालेराव, प्रसाद भिवसने, मारुती पाटोळे, पोपट शेटे, युवा जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, संजय शेलार, महेश पवार, पोपट सरोदे, अ‍ॅड. योगेश गुंजाळ, राजीव भिंगारदिवे, लता भांड, अनिता जगधने, पी. के. गवारे, साळवे मॅडम, विठ्ठल माळी, विलास माळी, चंद्रकांत नेटके, प्रवीण ओरे, किरण
पाटोळे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हा सहकारी बँकेच्या जाहीर

झालेल्या भरतीमध्ये विविध समाज घटकांच्या आरक्षणाची तरतूदीची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सरळ भरतीने
संविधानाच्या कलम ३४०, ३४१, ३४२ कडे दुर्लक्ष करून सामाजिक न्याय तत्त्वाचा भंग केला जात आहे. सदर भरती बेकायदेशीरपणे संविधानाचे उल्लंघन करून होत असून, समाजातील वंचित घटकावर अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जिल्हा बँक हा शासनाचा उपक्रम आहे. त्यामुळे बँकेला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटया
विमुक्त जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग यांच्याकरिता त्यांच्या सेवकांमध्ये ५२ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे.जिल्हा बँकेचे सेवक भरतीचे जे नियम सहकार खात्याकडून मंजूर करून घेतलेले आहेत, त्यात राखीव जागेची तरतूद आहे. या नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नसताना जिल्हा बँक यांनी आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याचा घाट घातला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आला आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या
नव्याने जाहीर केलेल्या भरतीमध्ये आरक्षणाची तरतूद रद्द करण्यात आलेली असून, बँकेकडे पाठपुरावा
करून देखील कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बँक प्रशासनकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील
कुठलाही खुलासा आणि कुठलीही चर्चा न केल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याचे म्हंटले आहे.
आंदोलन स्थळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सिताराम गायकर व संचालक माधवराव कानवडे यांनी
आंदोलकांशी चर्चा करुन चेअरमन शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी यासंदर्भात चर्चेचे आमंत्रण दिले.
मात्र आंदोलकांनी त्यांचे आमंत्रण नाकारुन आंदोलन सुरु ठेवले. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
रावसाहेब वर्पे आणि सहाय्यक निबंधक गणेश औटी यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आरक्षणाच्या
तरतुदीप्रमाणे जिल्हा सहकारी बँकेत भरती प्रक्रिया राबविण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत
आंदोलन सुरु ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत धरणे चालू
राहणार असून, प्रत्येक तालुयातील पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार आहेत.

चित्रकुट गुरूकुल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक उपकरणे प्रदर्शन

चित्रकुट गुरूकुल येथील आधुनिक विज्ञान युगातील शिक्षण पद्धती कौतुकास्पद : ज्योत्स्ना अमोल भारती

नगर – सोलर सिस्टीम, बोलणारे कप, बीजारोपण, मॅजिक इंक, पंचेद्रीय, पाणी शुद्धीकरण, जंतू रोधक यंत्रणा अशा विविध वैज्ञानिक आविष्कार आहे. उत्तम प्रोजेट चित्रकुट गुरूकुलच्या चिमुरड्यांनी सादर करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. चित्रकूट गुरूकुलमधील या विज्ञान प्रदर्शनास सौ. ज्योत्स्ना अमोल भारती, संस्थेचे संचालक संजय चव्हाण, प्राचार्या सारिका आनंद आदी उपस्थित होते. ज्योत्स्ना अमोल भारती म्हणाल्या की, अतिशय कमी वयात मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात
केला आहे हे या प्रदर्शनातून दिसून येते. चित्रकुट गुरूकुल येथे प्राचीन भारतीय संस्कृती आणि आधुनिक विज्ञान युगाचा अनोखा संगम आहे. चिकित्सक वृत्ती असेल तर नवनवीन संशोधन निर्माण होते. मुलांचा भावी आयुष्याचा भक्कम पाया
रचण्याचे काम गुरूकुलमध्ये होत आहे. संजय चव्हाण म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रोजेटचे सादरीकरण करताना त्याची अतिशय प्रभावीपणे मांडणी केली. त्यांच्या मनातील संकल्पना अतिशय स्पष्टपणे मांडल्या. अगदी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत या प्रती स्कूल मधील मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात केला आहे. प्राचार्या सारिका आनंद म्हणाल्या, चित्रकूट
गुरूकुल येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यांच्यात संस्कार रुजवतानात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. विज्ञान दिनानिमित्त मुलांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रोजेट सादर केले
आहेत. या सर्व उपक्रमांना पालकांचेही चांगले सहकार्य लाभते. यावेळी शिक्षिका तेजल आव्हाड, हर्षदा गायकवाड
यांचाही सन्मान करण्यात आला. चित्रकुट गुरूकुल मधील अवंतिका चव्हाण, अयांश गोंदणे, अर्णव शेंडे, देवांश जगधने, प्रियांशू क्षीरसागर, राजेश्वरी काळे, अक्षत पानसरे, आयत खिलजी, तीर्थराज गायकवाड, अविरा टेके, शिवाज्ञा नाईकवाडे, श्रेयस मरकड, श्रेयांश मरकड, ईश्वरी नवले, अद्वैक हारदे, कियांश गाडे, कृष्णा देशमुख, हिंदवी चव्हाण, स्वरांग देशमुख,  इंशा खिलजी, आयुष गांधी, केतन पाटील, श्रीशा गवळी, हर्षिता हंगे, विश्वजा कोईनारे या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रोजेट सादर केल

महिला दिनानिमित्त खास १ महिन्यासाठी नगरमध्ये बेसिक कॉम्प्युटर मोफत कोर्स

नगर – सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यामाने महिला दिना निमित्त १ महिन्यासाठी बेसिक कॉम्प्युटर मोफत कोर्स राज्यस्तरीय महिलांसाठी संगणक सक्षमीकरण राबवण्यात येत आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्या नगरच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती जाधव या राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. काळाची
गरज म्हणून संगणक किती महत्त्वाचे आहे. या गोष्टी समजावून संगणक साक्षरतेमध्ये संगणक व डिजिटल उपकरणांच्या वापराशी संबंधित अनेक कौशल्ये व क्षमतांचा समावेश होतो. यात केवळ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ऑपरेट करण्याची
क्षमता नाही तर फाईल व्यवस्थापन, इंटरनेट सुरक्षा आणि डिजिटल नागरिकत्व यासारख्या मूलभूत संकल्पना समजून घेण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. काळाचा ओघ पाहता महिला कोणावरतीही अवलंबून न राहता नवीन डिजिटल युगाकडे कशा वळतील त्याचे धोरण  सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेडने हाती घेतलेली आहे. या संगणक प्रशिक्षणातूनच महिलांना उदरनिर्वाहाचे साधन ही मिळणार आहे.  अहिल्यानगरमधील महिलांना सृष्टी कॉम्प्युटर टायपिंग, डौले हॉस्पिटल शेजारी, सावेडी, अहिल्यानगर येथे कॉम्प्युटर कोर्स मोफत देण्यात येणार आहे. तसेच राज्यातही विविध
ठिकाणी मोफत कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी स्वाती जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मो.९९२२२८९१७०

सेंट विवेकानंद स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रोजेट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

नगर – सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी तब्बल २०० वैज्ञानिक प्रोजेट सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन
दाखवला. सोलर सिस्टीम, टोमेटिक झेब्रा क्रॉसिंग, कचरा संकलन, गन मशीन, वायरलेस चार्जिंग, मिसाईल, ग्रीन हाऊस,
बायोगॅस प्रकल्प, लायफाय अशा विविध विषयांवरील प्रोजेटचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता देवगावकर, परीक्षक डॉ. दत्ता पोंदे, सुभाष पाडगावकर, संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, खजिनदार दामोदर मखिजा, सचिव गोपाल भागवानी, विश्वस्त महेश मध्यान, राजकुमार गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरेश मध्यान, प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, तसनीम हकीमजीवाला, प्रियंका मंगलारप, ईशरत शेख आदी उपस्थित होत्या. उपप्राचार्या कांचन पापडेजा यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या व महेश मध्यान यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दत्ता देवगावकर म्हणाले,
मुलांनी उत्कृष्ट असे प्रोजेट सादर करून आपली कुशलता दाखवून दिली आहे. शाळेमध्ये विविध दिनानिमित्त साजरे केले
जाणारे उपक्रम विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस दिशा देणारे व  कलाटणी देणारे ठरतात. सुभाष पाडगावकर म्हणाले,
विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले प्रोजेट सादर केले असून त्यामध्ये नाविन्य दिसून येते. त्यांच्या कल्पनाशक्ती मध्ये
प्रचंड वाढ झाल्याचे हे प्रदर्शन पाहिल्यानंतर जाणवले. विद्यार्थ्यांचे विविध गुण विकसित होण्यास हे माध्यम उपयुक्त ठरते. या माध्यमातून मुलांमध्ये संभाषण कौशल्य गुण विकसित होतो. संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी यांनीही विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन पार्थ पुप्पाल व गौरी गिरी यांनी केले तर आभार इशरत शेख यांनी मानल