श्री समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार अनंतराव चानसीकर व उमेश जोशी यांना प्रदान

समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार २०२५ वे.शा.सं. अनंतराव चानसीकर व वे.शा.सं. उमेश जोशी यांना श्री समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

नगर – ऋग्वेद भवन येथे समर्थ मंडळाचा आदर्श कुलोपाध्याय पुरस्कार २०२५ वे. शा. सं. अनंतराव चानसीकर व वे. शा. सं. उमेश जोशी (माजलगांवकर) यांना श्री समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, श्री समर्थ मंडळाचे अध्यक्ष सुरेश क्षीरसागर, विजय धर्माधिकारी, सत्कारार्थी वे.शा. सं. अनंतराव चानसीकर व वे.शा.सं. उमेश जोशी (माजलगांवकर) आदी उपस्थित होते. श्री समर्थ मंडळाच्या वतीने समर्थभक्त मंदारबुवा रामदासी यांचा त्यांच्या कार्याबद्दल मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष सुरेश अ. क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन यशवंत आंबेकर यांनी केले. पुरोहितांचा परिचय मिलिंद जोशी यांनी करून दिला. सौ. चानसीकर यांचा सत्कार सौ. सुरेखा कुलकर्णी यांनी केला. सौ. जोशी यांचा सत्कार सौ. प्रिया कुलकर्णी यांनी  केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समर्थ मंडळाचे सचिव महेश रा. कुलकर्णी यांनी करून दिला. मानपत्र वाचन सभासद कुलकर्णी ज्ञानेश यांनी केले. आभार महेश रा. कुलकर्णी यांनी मानले. श्रुतविंदा हिने पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी कार्यकारणी सदस्य उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, खजिनदार पुरुषोत्तम बेदरे, सुरेश टी. क्षीरसागर, रविंद्र कुलकर्णी, प्रदीप पतकी, संजय विप्रदास उपस्थित होते. कार्यक्रमास अरुणराव धर्माधिकारी, सचिन पारखी, अ‍ॅड. अच्युतराव पिंगळे, प्रद्युम्न जोशी, किशोर जोशी, सोमनाथ मुळे व धर्माधिकारी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

नगर – अहमदनगर जिल्हा तालीम संघ आणि पारनेर तालुका तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ९ मार्च रोजी बाबुर्डी (ता. पारनेर) येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन पारनेर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष पै. युवराज पठारे व नगर तालुका तालिम
सेवा संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा खजिनदार पै. नाना डोंगरे यांनी केले आहे. या निवड चाचणीतून जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडला जाणार असून, हा संघ कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणार्‍या ६६ वी वरिष्ठ गादी
व माती राज्यस्तरीय अजिंयपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२४-२५ मध्ये सहभागी होणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सदरची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २६ ते ३० मार्च दरम्यान होणार आहे. जिल्हा निवड चाचणी बाबुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी ९ वाजता प्रारंभ होणार आहे. खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुर्डीचे सरपंच प्रकाश गुंड आणि आरसीजी ग्रुपचे अध्यक्ष पै. लाला भोंडवे यांनी या निवड चाचणीचे आयोजन केले
आहे. कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागात ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो आणि महाराष्ट्र केसरी ओपन गटात पार पडणार आहे. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत नोंदणी होईल आणि दुपारी १२:३० नंतर कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालिम संघाचे नगर शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, पै. विलास चव्हाण, पै. मोहन हिरणवाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष पप्पू शिरसाठ, नेवासा तालुकाध्यक्ष प्रताप चिंधे, शेवगाव तालुकाध्यक्ष विक्रम बारवकर, अकोले तालुकाध्यक्ष सोमेश्वर धुमाळ, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पै. संदीप बारगुजे, कर्जत तालुकाध्यक्ष पै. ऋषीकेशे धांडे, राहुरी तालुकाध्यक्ष सुनिल अडसुरे, माजी नगरसेवक सुनिल भिंगारे, पै. बाळू भापकर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दिपक डावखर, जामखेड तालुकाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी श्रीधर मुळे, संगमनेर तालुकाध्यक्ष भागवत ठोंबरे आदी परिश्रम घेत आहे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश चिटणीसपदी अहिल्यानगरचे अनिल निकम

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश राज्य चिटणीसपदी अहिल्यानगरचे अनिल निकम यांना निवडीचे पत्र देताना मंत्री छगनराव भुजबळ

नगर – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणीची बैठक नुकतीच नाशिक येथे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्यातील विविध पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये अहिल्यानगरच्या अनिल निकम यांची प्रदेश राज्य चिटणीसपदी निवड  करुन त्यांना नियुक्त पत्र छगनराव भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले. राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा
फुले समता परिषदेची ताकद अधिक वाढवण्यासाठी समता परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी जोमाने काम करावे. राज्यातील सर्व ओबीसींचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी ही निवड करण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, कार्याध्यक्ष दिलीप खैरे, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर तसेच स्वीय सहाय्यक रविभाऊ सोनवने, महेश आण्णा पैठणकर, सत्संग मुंडे, शंकरराव लिंगे, प्रचार प्रमुख मुकुंद सोनटक्के, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, सर्व समता परिषद प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय बाल रोग तज्ञ संघटनेचा स्थापना दिन उत्साहात

नगर – भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचा स्थापना दिन अहिल्यानगर शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. भारतीय बालरोग तज्ञ संघटना अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख, सचिव डॉ. उज्वला शिरसाठ व खजिनदार डॉ. संदीप गायकवाड यांनी पदाची सूत्रे स्विकारली. भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे भारतीय बाल रोग तज्ञ संघटनेचे समन्वयक डॉ. अमोल पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महाराष्ट्र बाल रोग तज्ञ  घटनेचे खजिनदार डॉ. रविंद्र सोनवणे, डॉ. सुचित तांबोळी, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. श्याम तारडे, डॉ. सागर वाघ, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. अनिल कुर्‍हाडे, डॉ. सुभाष फिरोदिया, डॉ. दिपक कर्पे, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्रताप पटारे, डॉ. मकरंद धर्मा, डॉ. गणेश माने, डॉ. सचिन सोलट आदींसह बालरोग तज्ञ उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पेडियाट्रिक हेपॅटोलॉजी इन इंडिया: ए जर्नी ऑफ इनोवेशनण्ड एसलन्स या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. अमोल पवार यांनी बालरोग तज्ञ भारताच्या भावी पिढीचे आरोग्य जपण्याचे काम करत असून, भावी
पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी योगदान देत असल्याचे सांगितले. डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी बालकांच्या आरोग्यासाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, या चळवळीतून सशक्त भारताची निर्मिती होणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रविंद्र सोनवणे यांच्यासह उपस्थित ज्येष्ठ बालरोग तज्ञ यांनी बालकांचे विविध आजार
व अद्यावत उपाचर पध्दती यावर मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख यांनी संघटनेच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सचिव डॉ. उज्वला शिरसाठ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. खजिनदार डॉ. संदीप गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी बालरोग तज्ञ डॉटरांचा सन्मान
करण्यात आला.

शिवरंजन संगीतालयाच्या विद्यार्थ्यांचे तबला परीक्षेत यश

शिवरंजन संगीतालयाच्या विद्यार्थ्यांनी तबला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक लक्ष्मणराव डहाळे, प्रकाश शिंदे, सुरज शिंदे आदी.

नगर – अ. भा. गां. म. मंडळातर्फे सत्र नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सांगितिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर  झाला. या परीक्षेमध्ये तबला वादन विभागात शिवरंजन संगीतालयाच्या सर्व विद्यार्थांनी उज्वल यशाची  परंपरा कायम ठेवली. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक लक्ष्मणराव डहाळे, प्रकाश शिंदे, सुरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
निकाल पुढील प्रमाणे प्रारंभिक- यश साळी, प्रवेशिका प्रथम- दर्श ठाकूर, प्रवेशिका पूर्ण -रजत आकडे, सुमित परदेशी, भास्कर गिरवले, हर्षद गायकवाड, विनय ओहोळ, मयुरेश कुलकर्णी. मध्यमा प्रथम- ईशांत तुंगार, (केंद्रात सर्वप्रथम), माध्यमा पूर्ण -तन्मय कार्ले, अनुराग  आचार्य, ओंकार चौकटे.(केंद्रात द्वितीय) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह या संपादन
केले आहे. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे शिवरंजन संगीतालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

‘अयोध्या व काशी धाम’ साठी नगरचे ६१ यात्रेकरु रवाना

नगर – अहिल्यानगरचे ६१ यात्रेकरू अयोध्या धाम व काशीधाम यात्रेकरिता रवाना झाले आहेत. रेल्वेस्थानक येथे जाणार्‍या यात्रेकरूंचे नगरकरांनी स्वागत केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ओबीसीचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ,
बन्सी महाराज मिठाईवाले, हरिभाऊ डोळसे, अखिल भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष निलेश चिपाडे, विश्व हिंदू परिषदेचे गजेंद्र सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर, रमेश शेरकर, चंद्रकांत सखाराम पुंड,  सुर्यकांत कांडेकर, विनोद पुंड, मनोज भुजबळ, रोहित पठारे, बाळासाहेब जावळे, नारायण इवळे, प्रकाश इवळे आदी उपस्थित होते. ग्वाल्हेर किल्ला येथे अहिल्यानगर येथील भाविकांनी जावून माहिती घेतली. या नंतर यात्रेकरूंनी आयोध्या धाम, सिद्धपीठ, श्री हनुमान गढ़ी, श्री राम मंदिर, कनक महाल, दशरथ महल, शिप्रा घाट, श्री काशी विश्वेश्वर  मंदिर, श्री कालभैरव मंदिर, श्री ढुंडिविनायक गणपती मंदिर, श्री काशीविश्वेश्वर मंदिर, श्री माता अन्नपूर्णा मंदिर, श्री
संकटमोचन हनुमान मंदिर, श्री महामृत्युंजय मंदिर, श्री गंगा महाआरती करण्यात येणार आहे.

 

‘द बौद्ध गया टेम्पल अ‍ॅट १९४९’ च्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करा

बिहारच्या महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी सहकार्याची केली अपेक्षा : खा. निलेश लंके यांना निवेदन

नगर – बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी द बौद्ध गया टेम्पल अ‍ॅट १९४९ च्या कायद्यात सुधारणा होण्यासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याची मागणी जिल्ह्यातील बौध्द समाजाच्यावतीने खा. निलेश लंके यांच्याकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळाने खा. लंके यांची हंगा (ता. नगर) येथील निवासस्थानी भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. खा. लंके यांनी महाबौध्दि बुद्धविहारमध्ये त्यांच्या धर्मगुरुंना विधीवत पूजा करण्याचा हक्क मिळण्यासाठी सदर प्रश्न संसदेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले. बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार येथे द बौद्ध गया टेम्पल अ‍ॅट १९४९ लागू आहे. त्यामध्ये चार बौद्ध व चार हिंदू व एक जिल्हाधिकारी हिंदू सदस्य आहेत. भारतीय  संविधानानुसार पाहिले तर संविधानानुसार सर्व समाजाला व धर्माला त्यांच्या धर्मानुसार आपल्या धार्मिक स्थळात पूजा करण्याचा अधिकार आहे. मंदिरामध्ये ब्राह्मण पुजारी, मस्जिदमध्ये मौलवी, चर्चमध्ये पादरी आणि गुरुद्वारामध्ये शिख धर्मगुरू आपल्या धर्माप्रमाणे पूजा करत असतात. मात्र परंतु या बौद्ध विहार मध्ये बौद्ध धर्मगुरुंना विधीवत पूजेचा
अधिकार दिला जात नसून, हा एक प्रकारे अन्याय असल्याचे बौद्ध समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
बौद्ध समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा धार्मिक स्थळ बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची गरज आहे. त्यामुळे तेथे दररोज बौद्ध धर्मगुरु विधीवत पूजा करु शकतील. यासाठी संसद भवनामध्ये प्रश्न मांडला, तर कायद्यामध्ये बदल
करता येऊ शकणार असल्याचे म्हंटले आहे. महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी १२ फेब्रुवारीपासून बौद्ध भिखू व समाज बांधव शांततेने आंदोलन करत आहेत. मात्र या न्याय हक्काच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन बिहार राज्य सरकार आंदोलकांना त्रास देण्याचे काम करत आहे. बौद्ध धम्म हे शांतीचे प्रतीक आहे, तरीसुद्धा सरकार यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रश्न संसदेत लावून धरल्यास या बुद्धविहार मुक्तीसाठी महत्त्वाचे कार्य ठरणार असल्याची भावना समाजबांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

कायनेटिक चौकात आगीचा थरार, कारने अचानक घेतला पेट

कायनेटिक चौक येथे रिनॉल्ट डस्टर गाडीने अचानक पेट घेतला अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी वेळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला अग्निशमन पथकातील कर्मचारी शुभम गावडे, फायरमन अशोक
चितळे, युवराज रासकर, सागर जाधव, रोहन रासकर, आतेश भापकर.

नगर – नगर दौंड रोडने वाळकी कडून  नगरकडे येणार्‍या डस्टर कार ने अचानक पेट घेतला. या आगीत कारचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ही घटना नगर पुणे रोडवरील कायनेटिक चौक येथे २ मार्च
रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. वाळकी येथून नगर कडे येणार्‍या चार चाकी डस्टर कारने (क्र. एम एच १६ ए एम ९३९३) कायनेटिक चौकात पुण्याकडे वळणार्‍या कॉर्नरवर अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेताच वाहन
चालकाने प्रसंगावधान राखून गाडीच्या बाहेर उडी मारली. त्यामुळे तो बचावला. गाडीला आग लागताच घटनास्थळाजवळ असलेल्या नागरिकांनी गाडीकडे धाव घेतली. कोणीतरी अग्निशमन पथकास घटनेची माहिती कळविल्यानंतर
अग्निशामक दलाचा बंब तातडीने घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन पथकातील शुभम गावडे, युवराज रासकर, सागर जाधव, अशोक चितळे, रोहन रासकर व अनेश भापकर यांनी पाण्याचा मारा करून आग आटोयात आणली. या आगीत
गाडीचे इंजिन जळाल्याने सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे अमोल रामदास गव्हाणे (रा. वाळकी, ता. नगर) यांनी सांगितले.

रात्रीच्यावेळी रस्त्यावर कचरा टाकल्यास बाजारपेठेतील व्यापार्‍यांना ‘दंड’ करणार

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा; मध्यवर्ती शहरात महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहभागातून स्वच्छता मोहीम

नगर – बाजारपेठेतील दुकानदार रात्री दुकाने बंद केल्यानंतर जाताना कचरा रस्त्यावर टाकून जातात. महापालिकेची घंटागाडी या भागात नियमित येते. त्यामुळे व्यापार्‍यांनी घंटागाडीतच कचरा टाकणे आवश्यक आहे. यापुढे व्यापार्‍यांनी
घंटागाडीतच कचरा टाकावा, रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे. रविवारी सकाळी मध्यवर्ती शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या  सदस्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बाजारपेठेतील कचर्‍याची पाहणी करून व्यापार्‍यांना कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन केले आहे. शहरात अप्पू चौक ते सबलोक पंप ते भिंगारवाला चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, शहाजी रोड, तेलीखुंट, नवीपेठ परिसरात स्वच्छता
मोहीम राबविण्यात आली. यात रस्त्यावरील कचर्‍यासह प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आला. प्रशासक यशवंत डांगे यांच्यासह महापालिका कर्मचारी, प्रतिष्ठानचे सभासद, नागरिक सहभागी झाले होते. मोहिम
ेवेळी बाजारपेठ परिसरातील दुकानदारांनी रस्त्यावर टाकलेला कचरा पाहून यशवंत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली. या भागात नियमित घंटागाडी येत आहे. तरीही व्यापारी दुकान बंद केल्यानंतर रात्रीच्या वेळी कचरा दुकानासमोर रस्त्यावर टाकतात. अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकल्यास व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यशवंत डांगे यांनी दिला आहे.

मनपाच्या गाळेधारकांना रेडिरेकनर दरानुसारच भाडे भरावे लागणार; वसुलीसाठी मोहीम सुरू; पुढील आठवड्यापासून गाळे ‘सील’ करणार

नगर – महानगरपालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक व शाळांच्या वर्ग खोल्यांना शासनाच्या नियमानुसार
रेडिरेकनरद्वारे भाडे आकारणी करण्यात आलेली आहे. गाळेधारकांना याच दरानुसार भाडे भरावे लागणार आहे. ज्यांनी
अर्धवट व जुन्या दराने भाडे भरले असेल, त्यांनी उर्वरित रक्कम तत्काळ जमा करावी. गाळेधारकांनी थकीत भाडे जमा न
केल्यास सदर गाळे सील करून त्याचा पुन्हा लिलाव करण्यात येईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी
दिला आहे. शहरात महानगरपालिकेची ३३ व्यापारी संकुले आहेत. यात ७४२ गाळे भाड्याने दिलेले आहेत. तर, सात शाळांना ८२ वर्ग खोल्या भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. सुमारे २५ टक्के गाळेधारक नियमित भाडे भरत आहेत. अनेक गाळेधारक रेडिरेकनरचा दर जास्त असल्याचे कारण देऊन भाडे भरत नाहीत अथवा कमी रक्कम भारतात. या संदर्भात शुक्रवारी गाळेधारकांसमवेत झालेल्या चर्चेत शासनाचे निर्देश निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. त्यामुळे, रेडिरेकनर दरानुसारच सर्वांना भाडे भरावे लागणार आहे. यापुढे ज्यांनी अर्धवट भाडे भरले असेल, त्यांनी उर्वरित रक्कम भरावी. अनेक गाळेधारक सदरचे गाळे महानगरपालिकेचे असल्याने भाडे भरण्यास टाळाटाळ करतात. याच गाळ्यांच्या परिसरात
मात्र १० ते १५ पट जास्त भाडे देऊन खासगी गाळे घेतले जातात. तेथे व्यवसाय करून नियमित भाडे देतात. केवळ
महानगरपालिकेचे गाळे असल्याने वेगळ्या दृष्टीकोनातून भाडे न भरणे, रेडिरेकनर दरानुसार भाडे देण्यास नकार देणे असे
प्रकार सुरू आहेत. मात्र, यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही. भाडे न भरल्यास सदर गाळा सील करण्यात येईल. पुढील आठवड्यात ही मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या वसुली पथकाने वसुली मोहीम सुरू केली आहे. केडगाव, सिद्धीबाग, प्रोफेसर चौक, दाणे डबरा या ठिकाणी महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता, गाळेधारकांनी रेडिरेकनर दरानुसार सर्व भाडे भरण्याची तयारी दर्शविली आहे. मार्च अखेरपर्यंत पैसे जमा करण्यासाठी अनेकांनी चेक जमा केले आहेत. त्यामुळे ज्या गाळेधारकांकडे भाडे थकीत आहे, त्यांनी तत्काळ थकीत भाडे भरावे व कारवाई टाळावी, असे आवाहनही यशवंत डांगे यांनी केले आहे.