महिला दिनानिमित्त खास १ महिन्यासाठी नगरमध्ये बेसिक कॉम्प्युटर मोफत कोर्स

0
53

नगर – सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यामाने महिला दिना निमित्त १ महिन्यासाठी बेसिक कॉम्प्युटर मोफत कोर्स राज्यस्तरीय महिलांसाठी संगणक सक्षमीकरण राबवण्यात येत आहे. जिजाऊ ब्रिगेडच्या अहिल्या नगरच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती जाधव या राज्यस्तरीय महिला सक्षमीकरण करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. काळाची
गरज म्हणून संगणक किती महत्त्वाचे आहे. या गोष्टी समजावून संगणक साक्षरतेमध्ये संगणक व डिजिटल उपकरणांच्या वापराशी संबंधित अनेक कौशल्ये व क्षमतांचा समावेश होतो. यात केवळ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ऑपरेट करण्याची
क्षमता नाही तर फाईल व्यवस्थापन, इंटरनेट सुरक्षा आणि डिजिटल नागरिकत्व यासारख्या मूलभूत संकल्पना समजून घेण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. काळाचा ओघ पाहता महिला कोणावरतीही अवलंबून न राहता नवीन डिजिटल युगाकडे कशा वळतील त्याचे धोरण  सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशन व जिजाऊ ब्रिगेडने हाती घेतलेली आहे. या संगणक प्रशिक्षणातूनच महिलांना उदरनिर्वाहाचे साधन ही मिळणार आहे.  अहिल्यानगरमधील महिलांना सृष्टी कॉम्प्युटर टायपिंग, डौले हॉस्पिटल शेजारी, सावेडी, अहिल्यानगर येथे कॉम्प्युटर कोर्स मोफत देण्यात येणार आहे. तसेच राज्यातही विविध
ठिकाणी मोफत कोर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी स्वाती जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मो.९९२२२८९१७०