सेंट विवेकानंद स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

0
93

सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक प्रोजेट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

नगर – सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी तब्बल २०० वैज्ञानिक प्रोजेट सादर करून वैज्ञानिक दृष्टिकोन
दाखवला. सोलर सिस्टीम, टोमेटिक झेब्रा क्रॉसिंग, कचरा संकलन, गन मशीन, वायरलेस चार्जिंग, मिसाईल, ग्रीन हाऊस,
बायोगॅस प्रकल्प, लायफाय अशा विविध विषयांवरील प्रोजेटचे उपस्थितांनी कौतुक केले. या प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता देवगावकर, परीक्षक डॉ. दत्ता पोंदे, सुभाष पाडगावकर, संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, खजिनदार दामोदर मखिजा, सचिव गोपाल भागवानी, विश्वस्त महेश मध्यान, राजकुमार गुरुनानी, सुरेश हिरानंदानी, हरेश मध्यान, प्राचार्या गीता तांबे, उपप्राचार्या कांचन पापडेजा, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, तसनीम हकीमजीवाला, प्रियंका मंगलारप, ईशरत शेख आदी उपस्थित होत्या. उपप्राचार्या कांचन पापडेजा यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या व महेश मध्यान यांनी मुलांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दत्ता देवगावकर म्हणाले,
मुलांनी उत्कृष्ट असे प्रोजेट सादर करून आपली कुशलता दाखवून दिली आहे. शाळेमध्ये विविध दिनानिमित्त साजरे केले
जाणारे उपक्रम विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस दिशा देणारे व  कलाटणी देणारे ठरतात. सुभाष पाडगावकर म्हणाले,
विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले प्रोजेट सादर केले असून त्यामध्ये नाविन्य दिसून येते. त्यांच्या कल्पनाशक्ती मध्ये
प्रचंड वाढ झाल्याचे हे प्रदर्शन पाहिल्यानंतर जाणवले. विद्यार्थ्यांचे विविध गुण विकसित होण्यास हे माध्यम उपयुक्त ठरते. या माध्यमातून मुलांमध्ये संभाषण कौशल्य गुण विकसित होतो. संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी यांनीही विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन पार्थ पुप्पाल व गौरी गिरी यांनी केले तर आभार इशरत शेख यांनी मानल